MSRTC Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून याबाबतच्या ठरावाला महामंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव आता शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
Maharashtra State Transport Corporation will soon be acquiring 25,000 new buses, and the necessary manpower will also be recruited soon. Approximately 50,000 drivers and conductors will be required for the 25,000 new buses. |
सध्या एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. भविष्यात पीपीपी तत्त्वावर विकसित होणाऱ्या महामंडळाच्या जागेबाबत एसटीच्या बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासणार आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये नवीन 25000 बस घेण्यात येणार आहेत यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ सुद्धा लवकरच भरण्यात येणार आहे 25000 नवीन बसेस साठी अंदाजे 50000 च्या आसपास चालक व वाहक लागणार आहेत लवकरच एमएसआरटीसी कडून जाहिरात काढण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री यांनी दिलेले आहे.
तुम्ही सुद्धा कंडक्टर किंवा ड्रायव्हर पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे बिल्ला अगोदरच काढून ठेवावा जेणेकरून भरती निघाल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ वाया घालवण्याची गरज पडणार नाही.
भरतीला स्थगिती
यापूर्वी आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन एसटीतील नोकर भरतीला 2024 पर्यंत उच्च न्यायालयाने मनाई केली होती. तथापि, येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची खूप जास्त संख्या आहे. या कर्मचाऱ्यांसह अभियंत्यांची रिक्त पदे करार पद्धतीने आणि सरळसेवा भरतीच्या माध्यमांतून भरण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात 25 हजार बस घेण्यात येणार आहेत. त्यासाठी चालक, वाहक पदाबरोबरच अन्य पदे भरण्याच्या ठरावाला संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. |
- मुंबई उच्च न्यायालयामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु;पगार 49100 रुपये | Bombay High Court Vacancy
भविष्यात वाढत्या बस संख्येनुसार कर्मचाऱ्यांच्या नवीन आकृतीबंधालाही शासनाकडून मंजुरी घेण्यात येईल. या अनुषंगाने प्रत्येक विभागाने स्वतःकडील रिक्त पदांचा आढावा घेऊन आवश्यक पदांच्या भरतीसंदर्भात एकत्रित मागणी सादर करावी, असे निर्देश देण्यात आल्याचेही सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
एसटीच्या सक्षमीकरणासाठी कुशल मनुष्यबळाबरोबरच तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यांची भविष्यात एसटीला गरज भासणार आहे. त्या अनुषंगाने आता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |