दि.08 व 09 जुलै रोजीची सुट्टी राज्यातील सर्वच शाळांना मिळणार का ? वाचा सविस्तर वृत्त !

Clarification regarding holidays for schools in the state on July 8th and 9th: 📢 दिनांक 08 व 09 जुलै 2025 रोजी राज्यातील शाळांना विशेष सुट्टी

विविध मागण्यासाठी सरकारी शाळांमधील अनुदानित तसेच अंशतः अनुदानित शाळातील शिक्षक आंदोलन करणार आहे हे आंदोलन आठ व नऊ जुलै रोजी आझाद मैदानावर होणार असून यासाठी सर्व सरकारी शाळेतील मुख्याध्यापकांनी पाठिंबा दिला आहे त्यामुळे या दिवशी शाळांना सुट्टी दिली जाऊ शकते या आंदोलनामध्ये विनाअनुदानित किंवा खाजगी शाळांचा समावेश राहणार नाही.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

राज्यातील विविध माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेली बातमी नुसार, 08 व 09 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना विशेष सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हि सुट्टी नियोजित वार्षिक शैक्षणिक कॅलेंडरनुसार नसून ती शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आहे.

🪧 आंदोलनामागील कारणे व सहभाग

महाराष्ट्रातील शिक्षक संघटना, संयुक्त मुख्याध्यापक, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ तसेच इतर विविध संघटनांनी बिनशर्त पणे समर्थन दर्शवलेले हे आंदोलन शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे. या संपाचे आयोजन शिक्षकांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुदानवाढीच्या मागण्यांसाठी करण्यात आले आहे.

हे ही वाचा … पुणे महानगरपालिकेमध्ये लॅब टेक्निशियन व इतर पदांसाठी मेगा भरती सुरु! PMC Recruitment 2025

📌 मुख्य मागण्या

शिक्षकांनी दिनांक 08 व 09 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन आयोजित केले असून, त्यामध्ये खालील प्रमुख मागण्या मांडण्यात येत आहेत:

  • अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांच्या टप्प्यांमध्ये वाढ करणे
  • विद्यमान अनुदानवाढीसाठी निर्गमित केलेल्या GR चा त्वरित अंमल करणे
  • शिक्षक व शाळा व्यवस्थापनास वित्तीय सवलतींचा लाभ मिळवून देणे

🙏 सरकारी निर्णयाची प्रतीक्षा

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

जरी अनुदानवाढीसंबंधीचा GR आधीच निर्गमित झालेला असला तरी त्याच्या अंमलबजावणीस सरकारकडून विलंब होत असल्याने शिक्षक संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. यामुळे त्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जाईल अशी आशा आहे.

🏫 शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

सदर आंदोलन अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांच्या शिक्षकांद्वारे आयोजित करण्यात आले असल्याने, या प्रकारच्या शाळांना 08 व 09 जुलै रोजी सुट्टी असेल. तसेच आंदोलनास पाठिंबा दर्शवणाऱ्या संघटनांच्या संलग्न शाळाही या काळात बंद राहतील.

Leave a Comment