Created by Adarsh, 05 July 2025
BMC Vacancy 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणा-या गर्भधारणा व प्रसूतिपुर्व निदान तंत्र कार्याक्रमाअंतर्गत खालील दिलेली पदे भरण्याकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करायचे आहेत.
Advertisement has been published for filling the following posts under the Pregnancy and Prenatal Diagnostic Techniques Program implemented by the Family Welfare Office under the Public Health Department of the Brihanmumbai Municipal Corporation. |
◾भरतीचा विभाग : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : शिपाई,संगणक चालक व इतर पदांसाठी भरती
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून कमीत कमी १०वी पास उमेदवार अर्ज करू शकतील.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
1. वैद्यकीय अधिकारी – 01 जागा
▪️शिक्षण : मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी प्राप्त असावी
▪️अनुभव : किमान 3 वर्षांचा पीसीपीएनडीटी कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
2. विधी सल्लागार – 01 जागा
▪️शिक्षण : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एल. एल. वी ची पदवी प्राप्त असावी अथवा कायद्यातील इतर कोणताही पदव्युत्तर अभ्यासक्रम
▪️अनुभव : किमान 3 वर्षांचा पीसीपीएनडीटी कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
3. संगणक चालक – 02 जागा
▪️शिक्षण : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त असावी, मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनट वेगमर्यादेचे व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनट वेगमर्यादेचे शासकीय प्रामपत्र धारण केलेले असावे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
▪️अनुभव : किमान 3 वर्षांचा पीसीपीएनडीटी कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
4. शिपाई – 01 जागा
▪️शिक्षण : दहावी पास आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
▪️अनुभव : किमान 3 वर्षांचा पीसीपीएनडीटी कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
इतर आवश्यक माहिती
◾निवड प्रक्रिया : शैक्षणिक अर्हता व कामाचा अनुभवावरुन निवड यादी बनविण्यात येईल.
◾नोकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
◾अर्ज करण्याची तारीख : ऑनलाईन अर्ज दिनांक 01 जुलै 2025 ते 10 जुलै 2025 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत.
◾मासिक वेतन : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 15500 ते 55000 रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://portal.mcgm.gov.in/
महत्वाच्या सूचना (BMC Vacancy 2025)
◾उमेदवारानं विहित नमुन्यातील अर्ज, मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित सत्यप्रतीसह थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
◾अर्जाच्या छाननीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचीच मुलाखत / चाचणी परिक्षा घेण्यात येईल.
◾पुर्ण भरलेला अर्ज व कागपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती व मूळ कागदपत्रे घेऊन अर्जदाराने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मुलाखतीच्या स्थळी हजर रहावे, अर्ज कार्यालयात पाठवू नयेत, अशा अर्जाच्या भरतीप्रकीयेत विचार केला जाणार नाही.
◾आवश्यक तेवढे उमेदवार प्राप्त झाल्यानंतर वेळाप्रत्रकामध्ये नमूद केल्यानुसार त्याच दिवशीच्या दुपारच्या सत्रातील भरती प्रक्रिया बंद करण्यात येईल.
◾सदर जाहिरातीमधील पदांमध्ये बदल, पदे कमी किंवा जास्त करणे तसेच ऐनवेळी जाहिरात भरती प्रक्रियेला स्थगित किंवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचे सर्व अधिकार या कार्यालयाने राखून ठेवले आहेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |