Created by Aditya, 02 June 2025
ZP Solapur Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, जिल्हा परिषदेमार्फत हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.जिल्हा परिषद अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
A golden opportunity has come for candidates seeking government jobs. This recruitment has been announced by the Zilla Parishad. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications offline along with all the required documents as soon as possible.
◾भरतीचा विभाग : जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : आरोग्य सेविका,बहुउद्देशीय कामगार, स्टाफ नर्स,प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर पदे
◾शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12वी,पदवीधर व पदव्युत्तर उत्तीर्ण आवश्यक.
◾अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️आरोग्य सेविका,बहुउद्देशीय कामगार, स्टाफ नर्स,प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर पदे – 112 जागा
◾नोकरीचे ठिकाण : सोलापूर, महाराष्ट्र
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 10 जून 2025 पूर्वी ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 18000 ते 75000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर
◾अधिकृत संकेतस्थळ : https://solapur.gov.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांस एकापेक्षा जास्त पदाकरीता अर्ज सादर करायचा असल्यास, प्रत्येक पदाकरीता स्वंतत्रपणे अर्ज सादर करावा. पंरतू वेळप्रसंगी एकाच वेळी मुलाखत/परिक्षा घेतली गेल्यास कोणत्या तरी एका पदाकरीता उपस्थित रहावे लागेल. ज्यास उपस्थिती राहील त्या पदाकरीता संबधित उमेदवार ग्राहय धरुन, दुसऱ्या पदाकरीता गैरहजरी ग्राहय धरण्यात येईल.
◾वरील सर्व पदे ही कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधनावरील असल्याने, सदर पदाकरीता असलेले ५ नियम, अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही. त्याचसोबत यावरील सर्व पदाकरीता शासनाकडील सेवा नियम लागू होत नाहीत.
◾उमेदवारांनी अर्जासह जोडलेल्या सर्व कागदपत्रावर पृष्ठ क्रमांक टाकण्यात यावेत. अर्ज सादर केल्याची पोहोच घेणेकरीता अर्जाच्या वरील पृष्ठभागाची झेरॉक्स घेऊन येणे.
◾उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदांचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार असलेला प्रवर्ग आणि बँकेचे नाव व डिमांड ड्राफट क्रमांक अर्जामध्ये स्पष्टपणे नमुद करावे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |