Created by Aditya, 05 July 2025
ZP Jalgaon Bharti 2025 : जिल्हा परिषद जळगाव मार्फत १५ वा वित्त आयोग अंतर्गत नागरी आरोग्यवर्धीनी केंद्र व हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत जळगांव जिल्हयासाठी रिक्त असलेल्या पदांच्या पदभरती प्रक्रियेसाठी खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खालील पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहेत.
Applications are invited from eligible candidates for the following posts as shown in the table below for the recruitment process of vacant posts under Hindu Hridaysamrat Balasaheb Thackeray Apna Dawakhana for Jalgaon District. |
◾भरतीचा विभाग : जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : नर्स व बहुउद्देशीय कामगार
◾शैक्षणिक पात्रता : कमीत कमी बारावी पास उमेदवार अर्ज करू शकतील.
◾अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
1. बहुउद्देशीय कामगार पुरुष (MPW) – 68 जागा
▪️शिक्षण : विज्ञान शाखेत १२ वी उत्तीर्ण + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
▪️वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 18000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
2. स्टाफ नर्स (स्त्री/पुरुष) – 59 जागा
▪️शिक्षण : जीएनएम/बीएससी नर्सिंग + कौन्सिल नोंदणी
▪️वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 20000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
◾नोकरीचे ठिकाण : जळगाव, महाराष्ट्र
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 16 जुलै 2025 पूर्वी ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव
◾अधिकृत संकेतस्थळ: https://zpjalgaon.gov.in/
◾अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु.१५०/- व राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी रु.१००/- चा डिमांड ड्राफट जोडणे आवश्यक आहे व डिमांड ड्राफट च्या मागे स्वतःचे नांव स्वहस्ताक्षरात लिहावे, सदरचा डिमांड ड्राफट “District Integrated Health & Family Welfare Society, Jalgaon” यांचे नावे देय असावे. पोस्टल ऑर्डर ग्राहय धरण्यात येणार नाही.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (ZP Jalgaon Bharti 2025)
◾अर्ज सादर करतांना ज्या उमेदवारांच्या गुणपत्रकावर टक्केवारी दर्शविलेली नसेल व ग्रेड सिस्टिीम असेल अशा उमेदवारांनी गुणपत्रकाची दोनही बाजुची छायांकीत प्रत जोडावी. तसेच जे उमेदवार रिपीटर असून पास झालेले असल्यास अशा उमेदवारांनी सर्व गुणपत्रक जोडणे आवश्यक राहील.
◾शासकीय, निमशासकीय तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणा-या अनुभवाचाच विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल. ज्या कार्यालयाचे अनुभव प्रमाणपत्र प्राप्त आहे अशाच कार्यालयाचा तपशील फॉर्म मध्ये नमुद करावा.
◾एकापेक्षा अधिक पदांकरीता किंवा संवर्गाकरीता अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदाकरीता स्वतंत्र अर्ज सादर करावा. उपरोक्त कंत्राटी पदांकरीता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल.
◾उमेदवारांची निवड ही फक्त गुणांकन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्याबाबत उमेदवाराने कुठल्याही दबावतंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |