जिल्हा परिषद जळगाव येथे स्टाफ नर्स व बहुउद्देशीय कामगार पदांसाठी मोठी भरती सुरु

अटी व शर्ती –
१) उपरोक्त पदे ही निव्वळ कंत्राटी स्वरुपाची असून नियुक्ती दिनांक २९/६/२०२६ पर्यंत राहील.
२) अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपुर्ण भरलेला असावा. अर्जामध्ये माहिती अथवा कागदपत्र अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. याबाबत कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. समांतर आरक्षणाबाबत शासनाने दिलेल्या शासन परिपत्रकानुसार कागदपत्रे जोडणे बंधनकारक राहील
३) केंद्र / राज्य शासनाने संबधित पदे नामंजुर केल्यास उमेदवारांची सेवा कोणतीही पुर्वसुचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल. जाहीरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पदे आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा, नियम लागू नाही, तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावुन घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
४) अर्ज सादर करतांना ज्या उमेदवारांच्या गुणपत्रकावर टक्केवारी दर्शविलेली नसेल व ग्रेड सिस्टिीम असेल अशा उमेदवारांनी गुणपत्रकाची दोनही बाजुची छायांकीत प्रत जोडावी. तसेच जे उमेदवार रिपीटर असून पास झालेले असल्यास अशा उमेदवारांनी सर्व गुणपत्रक जोडणे आवश्यक राहील.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा