महाराष्ट्र शासन : महसूल सेवक (कोतवाल पदांसाठी मोठी भरती सुरु | शिक्षण – 04थी पास आवश्यक | Kotwal Bharti 2025

Kotwal Bharti 2025 : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तुमच्या साठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे, अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कोतवाल संवर्गाची पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज खालील दिलेल्या लिंकवरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 18 जुलै 2025 पर्यंत सादर करायचे आहेत.

A good job opportunity has been made available for you through the District Collector’s Office, a new advertisement has been published to fill the posts of Kotwal cadre in the District Collector’s Office of Ahilyanagar.

 

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

भरतीचा विभाग : हि नोकरी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर अंतर्गत सर्व तालुक्यात घेण्यात येणार आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : महसूल सेवक (कोतवाल)
शैक्षणिक पात्रता : महसूल सेवक (कोतवाल) पदासाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक अर्हता 4 थी पास इतकी असावी.
अर्ज करण्याची पद्धत : खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

 

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता (Kotwal Bharti 2025)

▪️महसूल सेवक (कोतवाल) – 103 जागा

(1) उमेदवाराची किमान शैक्षणिक अर्हता 4 थी पास इतकी असावी.
(2) अर्जदार यांनी ज्या सजेतील पदासाठी अर्ज सादर केला आहे, त्याच सजातील अंतर्भूत असलेल्या गावांमधील अर्जदार रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याबाबतचा पुरावा अर्ज भरतेवेळी आवश्यक राहील.
(3) अर्जदार हा महसूल सेवक (कोतवाल) पदाची कर्तव्ये पार पाडण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

नोकरीचे ठिकाण : अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुके.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने 18 जुलै 2025 पूर्वी अर्ज सादर करावेत.
वयोमर्यादा : महसूल सेवक (कोतवाल) भरतीसाठी उमेदवारांचे वय दिनांक 07/07/2025 रोजी 18 ते 40 या वयोगटातील असावे.
अधिकृत संकेतस्थळ : https://nagar.govbharti.org/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾अर्जदार व्यक्ती विरुद्ध कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नसावी अथवा उमेदवारास कोणत्याही न्यायालयाने कोणत्याही प्रकारचा दंड अगर शिक्षा झालेली नसावी. याबाबत संबंधित पोलीस स्टेशनचा दाखला छाननी वेळी सादर न केल्यास उमेदवाराचा अर्ज नाकारण्यास योग्य समजला जाईल.
◾महसूल सेवक (कोतवाल) पदासाठी नियुक्ती देण्याकामी उमेदवारास लेखी परीक्षेत किमान 40 गुण
मिळवणे आवश्यक असेल.
◾उमेदवारांना लेखी परिक्षेला व कागदपत्रे पडताळणीकामी उपस्थित राहण्यासाठी कोणताही प्रवास खर्च वा इतर खर्च दिला जाणार नाही.
◾अर्जदार उमेदवारास वर नमुद केलेल्या पात्रतेसह लेखी किमान गुणवत्ता प्राप्त करावी लागेल.
◾लेखी परिक्षा, कागदपत्रे छाननी, इ. करिता प्रवेशपत्र, कार्यक्रम, विविध सूचना या केवळ संकेत स्थळावरुनच उपलब्ध करण्यात येतील. पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार नाहीत. सबब सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहिती/कार्यक्रमा बाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहिल.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

Leave a Comment