04 थी पासवर अहिल्यानगर जिल्ह्यात कोतवाल पदांसाठी मोठी भरती सुरु

Ahilyanagar kotwal bharti 2025 : मा. शासनाकडील पत्र क्र. संकीर्ण-2023/प्र.क्र.17/ई-10 दि.17 मे 2023 अन्वये सन 2025-महसूल सेवक (कोतवाल) पदभरती बाबत महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या 80 टक्के मयदित पदे भरण्यास एक विशेष बाब म्हणन शासनाने मान्यता दिलेली आहे.

महसूल सेवक (कोतवाल) भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहीरात https://nagar.govbharti.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपुर्ण माहीती काळजीपुर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरुन विहित ऑनलाईन पध्दतीने भरलेले अर्ज व विहित चलनाद्वारे भरलेले परिक्षा शुल्क ग्राहय धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहिती बाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहिल.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा