Adani Gyan Jyoti Scholarship 2024-25 : अदानी ग्रुपचं नाव तुम्ही ऐकलंच असेल अदानी ग्रुप अंतर्गत आता स्कॉलरशिप 2024-25 साठी शिष्यवृत्ती दिल्या जात आहे, विविध अभ्यासक्रमासाठी अदानी ग्रुप अंतर्गत शिष्यवृत्ती दिल्या जाते.
ही शिष्यवृत्ती जे विद्यार्थी आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, ओडिसा आणि छत्तीसगड मध्ये राहतात व बीए इकॉनॉमिक, बीएससी इकॉनॉमिक्स, बॅचलर ऑफ इकॉनॉमिक्स, बीटेक इंटिग्रेटेड एमबीबीएस किंवा एलएलबी या अभ्यासक्रमांमध्ये अभ्यास करतात त्यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती लागू असेल.
या शिष्यवृत्ती अंतर्गत दरवर्षी साडेतीन लाख रुपये एवढी रक्कम आर्थिक सहाय्य म्हणून दिल्या जाते विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोणताही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी अदानी ग्रुप हे सहकार्य करते, अदानी ग्रुप वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करते त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, एनर्जी, लॉजिस्टिक, ऍग्री व रिअल इस्टेटच्या बिझनेस चा समावेश आहे.
एसइझेड लिमिटेड व इतर वेगवेगळ्या पोर्ट नेटवर्क अंतर्गत अदानी ग्रुप कामे करतात विविध अभ्रासक्रमांसाठी हि शिष्यवृत्ती दिली जाते.
Updated on 26.11.2024 – या शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.
शिष्यवृत्ती चे प्रकार
- अदानी ज्ञानज्योती स्कॉलरशिप फॉर इंजीनियरिंग स्टुडन्ट
- अदानी ज्ञानज्योती स्कॉलरशिप फॉर मेडिकल स्टुडन्ट
- अदानी ज्ञानज्योती स्कॉलरशिप फॉर इकॉनॉमिक्स स्टुडन्ट
- अदानी ज्ञानज्योती स्कॉलरशिप स्टुडंट्स लॉ स्टुडन्ट
आवश्यक पात्रता
- हि शिष्यवृत्ती ज्या विद्यार्थ्यांना दिली जाते त्यासाठी आवश्यक ती पात्रता धारण करणे आवश्यक आहे, आवश्यक पात्रता खालील प्रमाणे.
- अर्ज करणारा अर्जदार हा आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, उडीसा व छत्तीसगड या राज्यांमधील रहिवासी असावा व तो संपूर्ण भारतात कुठेही शिक्षण घेत असावा.
- अर्जदाराने शिक्षण उपक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेला असावा व ही पदवीधर किंवा पदव्युत्तर असावे तसेच इतर वेगवेगळ्या डिग्री साठी सुद्धा ही शिष्यवृत्ती आहे.
- अर्जदाराने मध्ये संपूर्ण भारतातून JEE मध्ये एक लाखाच्या आतील रँक मिळवलेली असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न साडेचार लाखापेक्षा जास्त नसावे.
- आदानी ग्रुप व बडी फर्स्ट स्टडी चे जे कर्मचाऱ्यांचे पाल्य या शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.
- डिप्लोमा तसेच बीई, बी टेक आणि बी अर्क मध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र नसतील.
शिष्यवृत्तीची रक्कम
जास्तीत जास्त अडीच लाखापर्यंतची शिक्षण फी या शिष्यवृत्ती मार्फत दिल्या जाते.
आवश्यक कागदपत्रे
- सरकारी ओळख प्रमाणपत्र (ज्यामध्ये आधार कार्ड,वोटिंग कार्ड, ड्रायविंग लायसन, पॅन कार्ड इत्यादींचा समावेश आहे.)
- प्रवेश घेतलेल्या कॉलेजचा पुरावा (फी भरल्याची पावती, प्रवेश पत्र, ओळखपत्र किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट)
- उत्पन्नाचा पुरावा (मागच्या तीन महिन्याच्या सॅलरी स्लिप किंवा मागील वर्षाचे ITR
- मागच्या वर्षीच्या मार्कशीट
- बँक अकाउंट ची डिटेल्स
- अलीकडच्या काळातले पासपोर्ट फोटोग्राफ
- इयत्ता बारावीची मार्कशीट
- एंट्रन्स रँक सर्टिफिकेट
- कौन्सिलिंग लेटर
- उत्पन्नाचा दाखला
- बोनाफाईड सर्टिफिकेट
- कॉलेजने दिलेले कॉलेजचे फी स्ट्रक्चर व पालकांचे सहमतिपत्र येथे अपलोड करावे लागेल
अर्ज कसा करावा
- या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम https://www.buddy4study.com/page/adani-gyan-jyoti-scholarship या लिंक वर जायचं आहे.
- त्या लिंक वर गेल्यानंतर सविस्तर माहिती तुम्हाला वाचावी लागेल त्यानंतर अप्लाय नाऊ (Apply Now) हे बटन खाली दिलेल आहे त्या बटनाला क्लिक करायचा आहे.
- बडी फोर स्टडीचे अकाउंट लॉगिन करायचे आहे हे अकाउंट लॉगिन केल्यानंतर एप्लीकेशन फॉर्म या पेजवर तुम्ही जाल.(जर तुम्ही या अगोदर रजिस्ट्रेशन केले नसेल तर तुम्हाला सर्वप्रथम मोबाईल नंबर किंवा गुगलचा अकाउंट टाकून नोंदणी करावी लागेल)
- अदानी ज्ञानज्योती स्कॉलरशिप 2024-25 एप्लीकेशन फॉर्म पेजवर जाल
- तिथे गेल्यानंतर स्टार्ट अप्लिकेशन (Start Application) बटनाला क्लिक करून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करू शकता.
- विचारलेली सर्व आवश्यक माहिती ऑनलाईन एप्लीकेशन फॉर्म मध्ये भरायची आहे
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
- त्यानंतर खाली दिलेल्या प्रीविव् (Preview) या बटनाला क्लिक करून अर्जाचा प्रीविव् पाहायचा आहे.
- तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरलेली आहे की नाही हे प्रीविव् स्क्रीन मध्ये चेक करायचे आहे जर तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित भरली असेल तर सबमिट (Submit) या बटनाला क्लिक करून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
- तुम्ही सुद्धा या शिष्यवृत्तीसाठी इच्छुक असाल तसेच आर्थिक सहाय्य तुम्हाला मिळावे असे वाटत असेल तर संपूर्ण पात्रता तपासा आणि तुम्ही पात्रता धारण करत असल्यास लगेच अर्ज सादर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न?(FAQ’s)
1.या शिष्यवृत्तीचे रक्कम कशा प्रकारे दिली जाते ?
Ans: या शिष्यवृत्तीची रक्कम निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या नमूद केलेल्या बँक अकाउंट वर पाठवली जाते ही दरवर्षी दिली जाते.
2.ही शिष्यवृत्ती सर्व वर्षांसाठी दिली जाते का?
Ans: हो. आदानी ज्ञानज्योती स्कॉलरशिप हे दरवर्षी दिली जाणारी स्कॉलरशिप आहे एकदा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाल्यानंतर दरवर्षीही स्कॉलरशिप रिन्यू केल्या जाते आणि त्याप्रमाणे रक्कम विद्यार्थ्यांना दिले जाते.
3.कोणत्याही कॉलेजमधील विद्यार्थी अर्ज करू शकता का?
Ans : हो., विद्यार्थ्यांनी शासन मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतील.
4.माझी फी भरण्याची क्षमता नसेल तर किंवा मी फी भरली नसेल तर मला ही स्कॉलरशिप मिळेल का?
Ans: तुम्हाला कॉलेजची फी भरण्यासाठी अडचण येत असेल तर तुम्ही या ठिकाणी शाळेकडून ठरवलेल्या अमाऊंटचं पत्र घेऊन ॲडव्हान्स स्वरूपात ही शिष्यवृत्ती घेऊ शकता, यासाठी तुम्हाला शाळा कडून पत्र घेणं गरजेचे आहे, हे सर्व शिष्यवृत्ती देणाऱ्या वर अवलंबून असून पूर्णता शिष्यवृत्ती मिळेल याची खात्री खूप कमी आहे.

मागील 5 वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे. नोकरी, नवीन योजना व बँकिंग क्षेत्रातील माहिती मी या ब्लॉगद्वारे देतो.सर्व माहिती ऑनलाईन स्रोतापासून मिळवून तुम्हाला देण्यात येते, काही अडचण असल्यास संपर्क साधावा.