सरकारकडून मोफत पत्रा स्टॉल चे वाटप सुरु; अर्ज डाउनलोड करून सबमिट करा | Gatai Stall Yojna 2025

Created By Advaith, 14 June 2025

Gatai Stall Yojna 2025 : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने एक चांगली योजना आणलेली आहे महाराष्ट्र शासन व समाज कल्याण विभाग विविध योजना राबवत असते. या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायला लागतात विविध प्रकारचे योजनांचा तपशील आपल्याला वारंवार सरकारी वेबसाईटवर दिला जातो.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अशीच एक योजना आहे गटई स्टॉल योजना या योजनेसाठी अर्ज सुरू झालेले असून ते कशा पद्धतीने करायचे आहेत, त्यासाठी काय कागदपत्र लागणार आहेत तसंच या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची सुद्धा माहिती आपण खाली पाहणार आहोत.

महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी, वृद्ध नागरिकांसाठी तसेच राज्यातील तरुण वर्गासाठी त्याबरोबर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते. राज्यातले छोटे मोठे व्यवसाय करणारे रस्त्याच्या बाजूला असणारे, छोटेसे दुकान मांडून बसणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकार विविध योजना राबवत असते.

अशीच एक योजना म्हणजे गटई कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली गटई स्टॉल योजना होय. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील गटई कामगारांना मोफत पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहे त्याविषयीची माहिती आपण खाली पाहणार आहोत.

गटई स्टॉल योजनेचा अर्ज डाउनलोड करा

ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे चालवले जाते या योजनेचे उद्देश आहे की महाराष्ट्र राज्यातील गट्टे कामगारांचा आर्थिक व सामाजिक विकास करणे या योजनेचा लाभ चर्मकार समाज घेऊ शकणार आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

या योजनेतून मोफत पत्र्याचे स्टॉल देणे जाणार आहेत या योजनेचे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन नसून ऑफलाइन पद्धतीनेच राहणार आहे त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत.

अर्ज सोबत जोडायचे कागदपत्रे

  • अर्जदाराचा स्वतःचा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला.
  • चालू आर्थिक वर्षातील उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • रेशन कार्ड ची झेरॉक्स
  • अर्जदार ज्या जागे स्टॉल मागत आहे ती जागा ग्रामपंचायत/ नगरपालिका /महानगरपालिका व छावणी क्षेत्र यांनी भाड्याने कराराने खरेदीने स्वमालकीची असल्याबाबतचे भाडे चिट्ठी /कराराचे पत्र किंवा खरेदी खताची साक्षांकित प्रत.
  • गटई काम करत असल्याचा दाखला व गटई काम करतानाचे छायाचित्र इत्यादी कागदपत्रे तुम्हाला अर्ज सोबत जोडायचे आहे.

अर्ज कसा करावा

खालील लिंक वरून अर्जाची पीडीएफ जोडलेली आहे ती पीडीएफ डाउनलोड करावी व्यवस्थित रित्या त्याच्यामध्ये माहिती भरावी आणि जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज जमा करायचा आहे. यासारखेच विविध योजनांसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ची लिंक दिलेली आहे त्या लिंक वरून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि विविध योजनांची माहिती मिळवू शकता.

गटई स्टॉल योजनेचा अर्ज डाउनलोड करा

0 thoughts on “सरकारकडून मोफत पत्रा स्टॉल चे वाटप सुरु; अर्ज डाउनलोड करून सबमिट करा | Gatai Stall Yojna 2025”

  1. काही समजत नाही. कसा कुठे अर्ज केला पाहिजे

    Reply
  2. Me ek gruhini ahe.. ani mala ya yojane cha labh ghyaycha ahe.. mala he kam karayche ahe.. pls help me..

    Reply

Leave a Comment