Created by Ashish, 01 July 2025
PMC Recruitment 2025 : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याकडील पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था मध्ये विविध पदे भरायचे असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. खालील पदाकरीता शैक्षणिक पात्रता, अनुभव व इतर बाबींची पूर्तता करणा-या पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून पुढील 8 दिवसांपर्यंत सोमवार ते शुक्रवार (शासकीय सुट्टी वगळून) सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत समक्ष अर्ज सादर करावयाचा आहे. या व्यतिरिक्त दुस-या पध्दतीने कलेले अर्ज तसेच विहित दिनांकानंतर व वेळेनंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Eligible candidates who fulfill the educational qualifications, experience and other requirements for the following posts are required to submit their applications in person at the following address within 8 days from the date of publication of the advertisement from Monday to Friday (excluding government holidays) between 11.00 am to 5.00 pm. |
◾भरतीचा विभाग : हि पुणे महानगरपालिकेच्या एड्स नियंत्रण संस्था मार्फत निघाली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती
◾शैक्षणिक पात्रता : कमीत कमी पदवीधर व पदव्युत्तर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन अर्ज सादर करावा.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️समुपदेशक – 11 जागा
▪️शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण व मास्टर ऑफ सोशल वर्कची (MSW) पदवी उत्तीर्ण.
▪️अनुभव : एच.आय.व्ही. एड्स विषयक समुपदेशनाचा किमान 3 वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक.
▪️प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 01 जागा
▪️शैक्षणिक पात्रता : मान्यता विद्यापीठाची शास्त्र शाखेची पदवी (बी.एस.सी.) व डि.एम.एल.टी. उत्तीर्ण
▪️अनुभव : एच.आय.व्ही. रक्तचाचणी कामाचा लॅबोरेटरी मधील किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. |
◾नोकरीचे ठिकाण :पुणे , महाराष्ट्र
◾वयोमर्यादा : उमेदवारांनाच वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षे असावे. (शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : आवश्यक त्या कागदपत्रासह 16 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : पुणे शहर एड़ स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र. 1 ला मजला, 663. शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे 411002
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 23100 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.pmc.gov.in/
◾उमेदवारांसाठी अटी व शर्ती (PMC Recruitment 2025)
◾पात्र उमेदवारांची यादी व मुलाखतीचे ठिकाण, तारीख, वेळ, इ. पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल. उमेदवारांना स्वतंत्ररित्या फोन, मॅसेज, ईमेल, इ. केले जाणार नाहीत.
◾पात्र उमेदवारांनी तोंडी मुलाखतीकरीता येताना मूळ कागदपत्रांसह मुलाखतीच्या ठिकाणी स्वखर्चाने व वेळेपूर्वी 1 तास अगोदर उपस्थित रहावे. उमेदवारास कोणताही भत्ता दिला जाणार नाही.
◾अपात्र उमेदवारांच्या बाबतीत कोणत्याही प्रकाराचा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
◾निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार विहीत अर्हता धारण करीत नसल्याचे आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दबाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास, त्याची उमेदवारी आपोआप रद्दबातल होईल तसेच नियुक्ती झालेल्या उमेदवाराने दिलेली माहिती अगर कागदपत्रे खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवन ठेवल्याचे निदर्शनास आल्यास उमेदवाराची नियुक्ती कोणतीही पूर्व सूचना न देता कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |