Jalsampada Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता गट ‘ब’ पदाच्या 1685 आणि सहाय्यक अभियंता पदाच्या 545 जागा रिक्त आहेत. विभागातील कर्मचाऱ्यांवर विविध प्रकल्पांचा वाढता ताण असल्याने या जागांची भरती तातडीने करावी, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ही पदभरती झाली नसल्याने लाखो उमेदवार चिंतेत आहेत.