DBSKKV Bharti 2026 : डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत काही रिक्त जागा भरण्याकरता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- ट्रॅक्टर चालक (कर्षित्र चालक)
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण 4 थी पास असणे आवश्यक आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
- विभागीय परिवहन अधिकारी यांचे ट्रॅक्टर्स-एल.एम.व्ही. टी.टी. (LMV-Tractor Trl) आणि एल.एम.व्ही. टी. आर. (LMV-Transport) चालविण्याचा परवाना आवश्यक तसेच शासकीय संस्थेत अथवा विद्यापीठात सेवेत तात्पुरत्या /रोजंदारी स्वरुपात काम केले असल्यास प्राध्यान्य.
आरोग्य विभागामार्फत 80 जागांवर विविध पदांसाठी नवीन भरती सुरु !
पगार DBSKKV Bharti 2026
- यामध्ये उमेदवारांना पगार हा 18000 रुपये पर्यंत देण्यात येणार आहे.
निवड प्रक्रिया
- पात्र उमेदवारांची निवड ही समितीद्वारे मुलाखत घेऊन करण्यात येणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी – ४१५ ६१२.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 27 जुलै 2026 आहे.
अधिकृत वेबसाईट
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराने अर्ज जाहिराती दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातच सादर करायचा आहे इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचा आहे,अर्ज अर्धवट असलेले अर्ज रद्द केले जातील.
- मुलाखतीसाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- निवडलेल्या उमेदवाराने शंभर रुपये किमतीच्या स्टॅम्प पेपरवर नियुक्ती कालावधी दरम्यान तो नोकरी सोडणार नाही आणि नेमून दिलेले काम पूर्ण करेल आणि तो नियमित नियुक्तीसाठी दावा करणार नाही असे हमीपत्र देणे आवश्यक आहे.
- उमेदवाराचा अर्ज नाकारण्याचा अधिकार विद्यापीठाकडे आहे.
- कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केल्यास उमेदवाराची नेमणूक रद्द होऊ शकते.
- कोणत्याही टपाल विलंबासाठी विद्यापीठ जबाबदार राहणार नाही.
- शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात,अर्जावर उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
| PDF जाहिरात | येथेक्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?
- ट्रॅक्टर चालक (कर्षित्र चालक)
2.शेवटची तारीख काय आहे?
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2026 आहे.
3.अर्ज कसा करायचा आहे?
- ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
