Central Bank Education Loan : सेंट्रल बँकेकडून विनातारण 4 लाख ते 2 कोटीपर्यंत शैक्षणिक कर्ज दिल्या जाते;पहा संपूर्ण अटी व शर्ती आणि पात्रता

Central Bank Education Loan : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत विद्यार्थी एज्युकेशन लॉन्स किमान अंतर्गत तब्बल दोनशे लाखापर्यंत विद्यार्थ्यांना भारतात किंवा भारताच्या बाहेर शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्जाचा पुरवठा केला जातो सर्वात जुनी असलेली सेंट्रल बँक ऑफ इंडिया कोणतेही मार्जिन न ठेवता चार लाखापर्यंत कर्जाचा पुरवठा करते.

चार लाखाच्या वर जर कर्ज लागत असेल तर त्यामध्ये पाच टक्के मार्जिन अप्लिकेबल राहणार आहे भारताबाहेर शिक्षण घेण्यासाठी कर्ज घेत असाल तर यावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया 15% मार्जिन हि बँक ठेवते.

शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत अति जलद गतीने शैक्षणिक कर्जाचा पुरवठा केला जातो, उच्च शिक्षणासाठी भारतात किंवा भारताच्या बाहेर भरपूर प्रमाणात खर्च येतो हा खर्च भरून काढण्यासाठी पालक शक्यतोवर शैक्षणिक कर्जाचा पर्याय अवलंबतात.

हे शैक्षणिक कर्ज सहजरीत्या मिळते असे नाही भरपूर प्रक्रिया पार पाडल्यानंतर शैक्षणिक कर्ज आपल्याला मिळते परंतु सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत सहजरीत्या तुम्ही या शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकतात व शैक्षणिक कर्ज लवकरात लवकर मिळवू शकता.यासाठी काही पात्रता दिलेली आहे, सेंट्रल बँकेच्या काही अटी आहेत त्या अटी आपण जाणून घेऊयात.

शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक पात्रता

  • अर्जदार हा भारतीय नागरिक असावा
  • विद्यार्थ्यांनी मागील शिक्षणामध्ये चांगल्या प्रकारे गुण मिळवलेले असावे व हे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून झालेले असावे.
  • ज्या शिक्षणासाठी तुम्ही कर्ज घेतात त्यासाठी तुम्ही एंट्रन्स टेस्ट दिलेली असावी किंवा मेरिट बेस सिलेक्शन तुमचं झालेला असाव.
  • हे शिक्षण बारावी नंतरच असेल अशाच विद्यार्थ्यांना कर्जाचा पुरवठा केला जातो.
  • जर विद्यार्थी प्रवेश घेत असलेल्या कॉलेजमध्ये कोणत्याहि प्रकारची एंट्रन्स टेस्ट किंवा मेरिट सिलेक्शन नसेल असे विद्यार्थी सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात त्यांना मागच्या वर्षी मिळालेले गुण या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येतील.
  • विद्यार्थ्यांनी कमीत कमी 50 टक्के गुण मिळवलेल्या असणे आवश्यक आहे. यामध्ये जर विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती मधून येत असेल तर त्यासाठी गुणामध्ये 10 टक्के सूट देण्यात आलेली आहे.

शैक्षणिक कर्जाचे फायदे

  • हे शैक्षणिक कर्ज सहजरीत्या तुम्हाला उपलब्ध होते हे शैक्षणिक कर्ज जास्तीत जास्त 200 लाखापर्यंत तुम्हाला मिळते.
  • 4 लाखापर्यंत कोणतेही मार्जिन ठेवले जात नाही चार लाखाच्या वर पाच टक्के मॅार्जिन आहे आणि भारताच्या बाहेर शिक्षण घेण्यासाठी कर्ज घेत असाल तर हे मार्जिन 15% पर्यंत जाते.
  • बँक शिक्षणाच्या कालावधीमध्ये एक टक्के एवढे व्याज आकारते बाकी शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला कर्जाची परतफेड करायला लागते त्यामध्ये बँकेच्या नियमानुसार व्याज आकारले जाते.
  • शैक्षणिक कर्जाच पेमेंट थेट कॉलेज, होस्टेल, मेस किंवा इतर खर्च करणाऱ्या संस्थेला दिले जात काही प्रमाणात हे पैसे अर्जदाराच्या अकाउंटला पाठवले जातात.
  • साडेसात लाखापेक्षा जास्त लोन घेत असाल तर पालक किंवा आई-वडील यासाठी सह कर्जदार म्हणून लागणार आहेत, काही केसेस मध्ये तुम्हाला बँकेकडे गहाण ठेवावे लागते.
  • रिपेमेंट पिरेड एकूण पंधरा वर्षाचा आहे कोर्स संपलेल्या कालावधीपासून पंधरा वर्षाच्या आत तुम्हाला हे कर्ज फेडावं लागतं.
  • हे कर्ज घेत असताना तुमचा लाईफ इन्शुरन्स काढला जातो जोपर्यंत कर्ज आहे तोपर्यंत ही लाइफ इन्शुरन्स राहणार आहे.

या कर्जामध्ये खालील खर्च तुम्ही करू शकता

  1. कॉलेज शाळा किंवा होस्टेल ची शुल्क, परीक्षा, लायब्ररी किंवा लॅबोरेटरीचे खर्च, ट्रॅव्हल, एअरलाईनचे खर्च.
  2. विद्यार्थ्यांचा किंवा कर्जदाराचा इन्शुरन्स.
  3. कॉलेजचे बिल्डिंग फंड किंवा डिपॉझिट असतील तर त्यासाठी सुद्धा वापर करू शकता.
  4. पुस्तके, कोणत्या वस्तू आणि युनिफॉर्म खरेदी करण्यासाठी याचा वापर करू शकता.
  5. कॅम्पुटर किंवा लॅपटॉप घेण्यासाठी सुद्धा तुम्ही या खर्चाचा उपयोग करू शकतो.
  6. या सोबतच कोणत्या स्टडी टूर्स असतील, प्रोजेक्ट असतील यासाठी सुद्धा तुम्ही या कर्जाचा वापर करू शकता.
आवश्यक कागदपत्रे

बँक हे कर्ज प्रकरण करताना विविध कागदपत्राची मागणी करू शकतो जे कागदपत्र बँकेने मागितले आहे ते कागदपत्रे तुम्हाला द्यावे लागतील, या कागदपत्रांमध्ये खालील काही कागदपत्रांचा समावेश आहे.

पगारदार वर्गांसाठी

  1. मागच्या दोन वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न
  2. मागच्या वर्षीचे फॉर्म 16A
  3. मागील तीन महिन्याच्या सॅलरी स्लिप
  4. मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट ज्यामध्ये तुमची इन्कम क्रेडिट झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
  5. दहावी बारावीचे गुणपत्रक
  6. शाळेच्या फी ची संपूर्ण माहिती दिलेले फी स्ट्रक्चर
  7. शाळा कॉलेजमध्ये पेमेंट केलेल्या च्या पावत्या
  8. एंट्रन्स एक्झाम असेल तर त्याचे रँक सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

इतर वर्गांसाठी

  1. मागच्या दोन वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न
  2. ऑडिटेड बॅलन्स शीट
  3. मागच्या वर्षाचे बँक स्टेटमेंट
  4. शाळेमध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा (त्यामध्ये ऍडमिशन लेटर, ऑफर लेटर किंवा आयडेंटी कार्ड)
  5. दहावी बारावीचे गुणपत्रक
  6. शाळेच्या फी ची संपूर्ण माहिती दिलेले फी स्ट्रक्चर
  7. शाळा कॉलेजमध्ये पेमेंट केलेल्या च्या पावत्या
  8. एंट्रन्स एक्झाम असेल तर त्याचे रँक सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा (Central Bank Education Loan)

  1. पात्रता धारक अर्जदाराने https://www.centralbankofindia.co.in/en/cent-education-loans या लिंक वर जाऊन अप्लाय नाऊ या बटनावर क्लिक करावे अगोदर नोंदणी केली असल्यास लॉगिन करावे.
  2. नोंदणी नसेल केली तर रजिस्टर या बटनाला क्लिक करायचे आहे त्यानंतर अप्लाय नाऊ या बटनाला क्लिक करायचं आहे.
  3. आवश्यक ते विचारलेले सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे व अकाउंट क्रिएट करायचा आहे.
  4. सर्व डिटेल्स सबमिट केल्यानंतर स्टुडन्ट लॉगिन हा पर्याय येईल तिथे ईमेल आयडी, पासवर्ड टाकून, कॅपच्या कोड टाकून लॉगिन करायचा आहे.
  5. लॉगिन केल्यानंतर दिलेलं संपूर्ण अर्ज व्यवस्थित रित्या भरायचा आहे त्यामध्ये नाव ईमेल आयडी, फोन नंबर आणि इतर इम्पॉर्टंट कागदपत्राची माहिती तुम्हाला भरावी लागेल.
  6. नंतर सबमिट केल्यानंतर एप्लीकेशन फॉर्म तुम्हाला डाऊनलोड करून स्वतः जवळ ठेवावा लागेल.
  7. यासाठी कर्जासाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता
  8. त्यासाठी तुम्हाला सेंट्रल बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये भेट द्यायची आहे.
  9. त्यांच्याकडून कर्जाचा अर्ज घ्यायचा आहे अर्ज व्यवस्थित रित्या भरायचा आहे.
  10. त्यानंतर सांगितलेले सर्व कागदपत्रे व अर्ज जवळच्या बँकेमध्ये जाऊन चेक करून घ्यायचा आहे.
  11. अर्ज व्यवस्थित असल्यानंतर तो अर्ज तुम्हाला बँकेच्या रिप्रेझेंटेटिव्ह कडे सबमिट करायचा आहे.
  12. जर तुमचं कर्ज प्रकरण मान्य झालं तर तुम्हाला रक्कम काही दिवसांमध्ये अकाउंटला जमा होईल किंवा त्या त्या इन्स्टिट्यूटला दिलय जाईल त्यांच्याकडून तुम्ही ही रक्कम घेऊ शकता. सेंट विद्यार्थी एज्युकेशन लोन ऑफलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतेही प्रकारांमध्ये अर्ज सादर करू शकतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.सेंट विद्यार्थी एज्युकेशन लोन साठी किती वर्षात पैसे माघारी द्यावे लागतील?

Ans : याकरीता रे-पेमेंट कालावधी पंधरा वर्षाचा आहे.

2.सेंट विद्यार्थी कर्ज घेतल्यानंतर स्कॉलरशिप अंतर्गत मी अर्ज करू शकतो का?

Ans : हो, कोणत्याही प्रकारची फी माफ करण्यासाठी तुम्ही स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकता.

3.सेंट विद्यार्थी एज्युकेशन लोन चे पैसे कशा प्रकारे मिळतील?

Ans : हे कर्ज प्रकरण मान्य झाल्यानंतर हे पेमेंट डायरेक्ट कॉलेज, होस्टेल, मेस किंवा एअरलाइन ला दिल्या जाईल जे काही एज्युकेशनची बाकी अमाऊंट असेल ती विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या खात्यावर जमा केली जाईल.

4.या कर्ज प्रकारासाठी प्रक्रिया शुल्क किती लागू असेल?

Ans : तुम्ही भारतामध्ये जर शिक्षण घेत असंत यासाठी तुम्हाला एक टक्का प्रोसेसिंग शुल्क लागू असेल हे जास्तीत जास्त 15000 पर्यंत असू शकते.

5.या कर्जाचा व्याजदर किती असतो?

Ans : या कर्जाचा व्याजदर हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व त्याच्या कॉलेजच्या रेटिंग वर अवलंबून आहे हा व्याजदर 8.2% ते 11.50% पर्यंत असू शकतो व्याजदर हे कर्ज प्रकरण करते वेळेस तुम्हाला कळविण्यात येईल

Leave a Comment