07वी/10वी/12वी/पदवीधर उत्तीर्णांसाठी कृषी विद्यापीठामध्ये शिपाई,लिपिक व इतर पदांसाठी भरती | MPKV Rahuri Bharti 2025

MPKV Rahuri Bharti 2025 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी करिता विविध पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी गट क व गट ड संवर्गातील एकूण पदाच्या 50% रिक्त पदे भरायचे आहेत. त्यासाठी विद्यापीठाने जाहिरात प्रकाशित केलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 30 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

या पदभारतीमध्ये वरिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, लिपिक नि टंकलेखक, प्रमुख तालिकाकार ,निर्गमन सहाय्यक, कृषी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, सहाय्यक संगणक, आलेख, अनुरेखक, वरिष्ठ यांत्रिक, तांत्रिक सहाय्यक, यांत्रिकी प्रक्षेत्र, यांत्रिक, जोडारी,काटेरी,दृकश्राव्य चालक, तारतंत्री मिश्र, पशुवैद्यकीय छायाचित्रकार, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, नळकारागीर, मिस्त्री स्थापत्य, जुळणीकार, विजतंत्री, वाहन चालक, कृषी यंत्र चालक, संगणक चालक, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, गणक, गवंडी, माळी, सुरक्षा रक्षक, प्रयोगशाळा सेवक, शिपाई, पहारेकरी, मजूर इत्यादी पदे भरायचे आहेत.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

या पदासाठी रिक्त जागांच्या तपशील जाहिरातीमध्ये दिलेला आहे यासोबतच संवर्गानुसार आरक्षित जागेचा तपशील सुद्धा जाहिरातीमध्ये तुम्ही पाहू शकता. कमीत कमी 19900 रुपयांपासून 92300 रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. हे वेतन पदानुसार वेगवेगळे ठेवण्यात आलेले असून पदानुसार सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये तुम्ही पाहू शकता.

शिक्षण व इतर

कमीत कमी सातवी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत सातवी, दहावी, आयटीआय, बारावी तसेच पदवीधर उत्तीर्ण उमेदवार सुद्धा या पदभरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्यासाठी अर्ज चा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे हा अर्जचा नमुना व्यवस्थितरित्या भरून तुम्हाला कुलसचिव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर – 413 722 या ठिकाणी सादर करायचा आहे.

वयोमर्यादा

या पदभरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वया 18 वर्षे असावी व जास्तीत जास्त वय हे 38 वर्षे असावे, प्रवर्गानुसार वयामध्ये शिथिलता दर्शवण्यात आली असून शिथिलते विषयीची माहिती तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकणार आहात तसेच खेळाडू माजी सैनिक इत्यादीसाठीची मर्यादा सुद्धा जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आलेले आहे.

अर्ज कसा करावा

जाहिरातीची लिंक व अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी अर्ज करते वेळेस भरती प्रक्रिया शुल्क म्हणून खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये व मागास प्रवर्गासाठी 900 रुपये एवढे शुल्क तुम्हाला धनाकर्षद्वारे भरायचे आहे हा धनाकर्ष नियंत्रक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या नावाने काढणे गरजेचे असेल.

एकापेक्षा जास्त अर्ज करत असाल तर त्या सर्व अर्जासाठी वेगवेगळे शुल्क तुम्हाला भरावे लागेल व नमूद केलेल्या पदासाठी निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे होणार आहे परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड झाल्यानंतर निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल व त्यानुसार उमेदवाराला नेमणूक दिल्या जाईल.

अटी व शर्ती (MPKV Rahuri Bharti 2025)

अर्जदाराने जाहिरातीमधील विहित नमुनामध्ये अर्ज संगणकावर टंकलिखित करून आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या स्वसाक्षांकीत प्रति व शुल्कासह विहित मुदतीत सादर करावा, अर्जदार दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी आवश्यक शैक्षणिक अर्हता अनुभव धारण करीत असला पाहिजे तसेच वय, जात इत्यादी माहिती शासनाच्या अधिकृत अधिकाऱ्याने दिलेल्या नमुन्यातील जात प्रमाणपत्राच्या सत्यप्रती अर्ज सोबत जोडणे आवश्यक असेल.

प्रत्यक्ष पदे भरण्याच्या वेळी परिस्थिती विचारात घेऊन एखादे पद किंवा सर्व पदे भरणे न भरणे तसेच निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवाराचे नेमके बाबतचा अधिकार विद्यापीठाने राखून ठेवलेल्या आहेत. तसेच टपाल विलंबस विद्यापीठ कार्यालय जबाबदार राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

उमेदवाराची लेखी परीक्षा चाचणी परीक्षा व कागदपत्र पडताळणी करिता कोणत्या प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही. तसेच भरती प्रक्रिया दरम्यान उमेदवार कोणते कारणाने गैरहजर असेल तर अश्या उमेदवारास भरती प्रक्रियेतून अपात्र ठरवण्यात येईल. परीक्षा शुल्क ना परतावा राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

वर नमूद केलेली माहिती अपूर्ण असू शकते अर्ज करणाऱ्या अर्जदाराने खालील लिंक वरून व्यवस्थित रित्या पीडीएफ जाहिरात वाचावी व त्यानंतरच ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखे अगोदर अर्ज सादर करावा.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाउनलोड करा
व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Leave a Comment