IDFC First Bank Education Loan : आयडीएफसी बँकेमार्फत उच्च शिक्षणासाठी तब्बल 40 लाख रुपयांचे कर्ज मिळणार,वाचा अर्जाची सोपी प्रक्रिया

IDFC First Bank Education Loan : आयडीएफसी फर्स्ट बँके अंतर्गत विविध प्रकारच्या शिक्षणासाठी भारतात व भारताच्या बाहेर सुद्धा शिक्षण घेण्यासाठी कर्जाचा पुरवठा केला जातो या कर्जाची रक्कम तब्बल 40 लाखापर्यंत असते व त्याच्या व्याजदर कमीत कमी 9 ते 12 टक्क्याच्या दरम्यान आकारला जाते.

हे व्याजदर इन्स्टिट्यूटच्या कॅटेगरी आणि तुम्ही प्रवेश घेतलेल्या कोर्स वर अवलंबून आहे.या बँकेमार्फत विद्यार्थ्यांना जे कर्ज दिले जाते त्याचा व्याजदर सुद्धा कमी आहे आणि रक्कम आवश्यक तेवढी तुम्हाला मिळणार आहे.

या कर्जाची परतफेड सुद्धा तुम्ही तुम्हाला जमेल त्या कालावधीमध्ये करू शकता या कर्जावर तुम्हाला कोणत्या प्रकारचा टॅक्स सुद्धा करला जात नाही, उच्च शिक्षणासाठी तुम्ही भारतात किंवा भारताच्या बाहेर जात असाल तर या कर्जासाठी अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया आहे आयडीएफसी फर्स्ट बँक भरपूर शहरांमध्ये कार्य करते विविध बँका व त्यांचे शाखे अंतर्गत ही बँक संपूर्ण भारत भर कार्यरत आहे, बडी फोर स्टडी आणि आयडीएफसी फर्स्ट याच्या अंतर्गत मिळून आयडीएफसी फर्स्ट बँक एज्युकेशन लोन प्रोग्राम लॉंच केलेला आहे.

यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत अर्ज करायचा आहे त्यांच्या या अर्ज करण्यासाठी काय पात्रता आवश्यक अटी व शर्ती त्यांनी संकेतस्थळावर नमूद केलेले आहे त्या संकेतस्थळावरील डिटेल्स व खाली दिलेली माहिती तुम्ही पडताळून पाहून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.

आवश्यक पात्रता

  • आयडीएफसी फर्स्ट बँकेचे शैक्षणिक कर्ज तुम्हाला घ्यायचे असेल तर यासाठी तुम्ही भारतीय विद्यार्थी असणे गरजेचे आहे.
  • उच्च शिक्षण तुम्ही भारतात किंवा भारताच्या बाहेर घेत असल्यास तुम्हाला हे कर्ज मिळणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्षे असणे आवश्यक आहे 18 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वय असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.
  • आयडीएफसी फर्स्ट बँकेचे शैषणिक कर्ज प्रकरण तुम्ही कोर्स साठी ऍडमिशन घेतल्यानंतर लगेच सादर करायचे आहे.

शैक्षणिक कर्जाचे फायदे

  1. शैक्षणिक कर्जाचे विविध प्रकारचे फायदे खालील प्रमाणे
  2. कर्जाची मर्यादा चाळीस लाखापर्यंत आहे (कमीत कमी एक लाख रुपये लोन घ्यावे लागेल)
  3. व्याजदर 9. 00% पासून चालू होतो.
  4. अति जलद ऑनलाईन पद्धतीने अर्जाची प्रक्रिया
  5. री पेमेंट करण्याचे भरपूर पर्याय उपलब्ध
  6. फोर क्लोजर किंवा पार्ट पेमेंट साठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
  7. काही अटी शर्तीवर एक कोटी पर्यंत विनातारण कर्ज उपलब्ध.
  8. इन्कम टॅक्स अंडर सेक्शन 80E च्या नुसार कोणताही टॅक्स आकारला जात नाही.

कर्जामधून तुम्ही खालील खर्च करू शकता

कॉलेजची फी भरण्यासाठी, एक्झामिनेशन, लायब्ररी किंवा लॅबोरेटरी ची फी भरण्यासाठी, शाळेचे पुस्तके इक्विपमेंट्स, युनिफॉर्म खरेदी करण्यासाठी, तसेच राहण्यासाठी म्हणजे हॉस्टेलचा वगैरे खर्च यामधून भरू शकता. तुम्ही ट्रॅव्हल,कॅम्पुटर, लॅपटॉपची खरेदी, इन्शुरन्स कव्हर व हेल्थ इन्शुरन्स घेण्यासाठी सुद्धा या एज्युकेशन लोणचं वापर करू शकता.

आवश्यक कागदपत्रे
  1. उमेदवाराला अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करायचे आहेत जे आवश्यक कागदपत्र आहेत ते खालील प्रमाणे
  2. अलीकडील काळातील पासपोर्ट साईज फोटोग्राफ
  3. पत्त्याचा पुरावा (ज्यामध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट, वोटर आयडी कार्ड, नरेगा जॉब कार्ड पालकांचे इत्यादी देऊ शकता)
  4. प्रवेशाचा पुरावा (कॉलेजचे आयडी कार्ड, प्रवेश पत्रक, बोनाफाईड लेटर.
  5. शैक्षणिक कागदपत्रे (यामध्ये दहावी बारावीचे मार्कशीट, पीजी कोर्स करत असाल तर ग्रॅज्युएशनच्या मागील वर्षाच्या मार्कशीट सोबत जोडणे आवश्यक आहे)
  6. इन्स्टिट्यूट चे फी स्ट्रक्चर

अर्ज कसा करावा (IDFC First Bank Education Loan)

  1. कर्ज घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो https://www.buddy4study.com/page/buddy4study-idfc-first-bank-education-loan-programme या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.
  2. दिलेल्या लिंक वर गेल्यावर अप्लाय नाव या बटनाला क्लिक केल्यानंतर बडी फोर स्टडी चा रजिस्टर आयडीवरून तुम्ही अर्जाची सुरुवात करू शकता. तुम्ही बडी फार स्टडी च्या अकाउंट ची नोंदणी केली नसेल तर तुम्ही लॉगिन करून अर्जाची प्रक्रिया सुरू करू शकता जर नसेल केली तर तुम्हाला सर्वप्रथम ईमेल आयडी, मोबाईल किंवा जीमेलद्वारे बडी फोर स्टडीचे अकाउंट नोंदणी करावे लागेल.
  3. त्यानंतर आयडीएफसी फर्स्ट बँक एज्युकेशन लोन प्रोग्राम या पर्यायावर तुम्ही जाल तिथे गेल्यानंतर स्टार्ट अप्लिकेशन या बटनाला क्लिक करून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करायची आहे.
  4. अर्जामध्ये आवश्यक ती सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरायची आहे.
  5. वर नमूद केलेली सर्व कागदपत्रे विचारल्या त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत त्यानंतर बँकेच्या अटी आणि शर्ती एक्सेप्ट करून अर्जाचा प्रीविव् तुम्हाला बघायचा आहे.
  6. अर्जाचा प्रीविव् मध्ये तुम्ही भरलेली माहिती व्यवस्थित भरली आहे का याची खात्री करायची आहे आणि त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे, अर्ज सबमिट केल्यानंतर तुमची अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.आयडीएफसी फर्स्ट बँकेसाठी कोण पात्र असेल?

Ans : आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शैक्षणिक कर्जासाठी उमेदवार हा भारतीय असावा त्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे ते मान्यताप्राप्त विद्यापीठात शिक्षण घेत असावे व त्यांनी वर नमूद केलेली आवश्यक ती पात्रता धारण केलेली असावी.

2.या कर्जासाठी मार्जिन मनी देणे गरजेचे आहे का?

Ans : हि बँक 100% फायनान्स करते, मार्जिन मनी ही इन्स्टिट्यूटच्या व क्लासिफिकेशन वर अवलंबून आहे.

3.या कर्जासाठी मला काही तारण ठेवावे लागेल का?

Ans : हे कर्ज घेते वेळेस तारण ठेवणे गरजेचे नसून इतर कोणत्या कारणामुळे बँकेने तारण ठेवण्यास सांगितल्यास तुम्हाला ते ठेवावे लागेल.

4.या कर्जासाठी मला सहकर्जदाराची आवश्यकता आहे का?

Ans : हो, आयडीएफसी फर्स्ट बँकेचे कर्ज घेताना तुम्हाला सहकर्जदार देणे आवश्यक असेल.

5.सह कर्जदार कोण होऊ शकते?

Ans : सहकर्जदारांमध्ये तुमचे पालक, भाऊ-बहीण, पती-पत्नी, सासू-सासरे, आजी आजोबा सुद्धा सहकर्जदार होऊ शकतात.

6. कर्ज मिळण्यासाठी किती वेळ लागतो?

Ans : जलद गतीने तुम्हाला हे कर्ज मिळते यामध्ये जास्तीत जास्त 48 तासांमध्ये या कर्जाचा अप्रोवल तुम्हाला दिल्या जाते.

Leave a Comment