Forest Department Bharti 2025 : सरकारी विभागात जॉब शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे, महाराष्ट्राच्या वन विभागामध्ये विविध पदांवर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. इच्छुक व पात्र उमेदवाराने मिळालेल्या या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा.
Forest Department of Maharashtra has published a recruitment advertisement for various posts . For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and appear for the interview on the date given below along with all the required documents. |
◾भरतीचा विभाग : हि नोकरी वन विभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : या पदभरतीमध्ये वनसर्वेक्षक हे पद भरले जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : सदर पदांसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे त्याअगोदर अर्ज सादर करायचे आहे.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️वनसर्वेक्षक – 01 जागा
1] सर्वेक्षणाशी संबंधित पदवीधर
2] वनसर्व्हेक्षण कामाचा पूर्वानुभव असणे आवश्यक राहील.
3] GIS Software चे ज्ञान असणे आवश्यक राहिल.
◾नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर, महाराष्ट्र
◾वयोमर्यादा : वयोमर्यादेची माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2025
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक (बफर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, रामबाग वन वसाहत परिसर, मुल रोड, चंद्रपूर-442401 (महाराष्ट्र)
◾मुलाखतीची तारीख : निवड झालेल्या उमेदवाराला मोबाईलवर किंवा ईमेलवर कळविण्यात येईल.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 30000 रुपये वेतन देण्यात येईल.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://mahaforest.gov.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांचे आवेदन अर्जाची प्राथमिक छाननी नंतर पात्र उमेदवारांनाच (Shortlisted Candidates) वैयक्तिक मुलाखतीकरीता बोलाविण्यात येईल. मुलाखतीकरीता येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता (TA/DA) लागू राहणार नाही. उमेदवारांना मुलाखतीची तारीख, वेळ व स्थळ वेगळयाने कळविण्यात येईल.
◾वैयक्तिक मुलाखतीकरीता पात्र उमेदवारांच्या आवेदन अर्जातील नमुद भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी वरच या कार्यालयाव्दारे संपर्क केल्या जाईल. तसेच या कार्यालयामार्फत संपर्क करतांना उमेदवारांनी त्यांचे भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी वरुन प्रतिसाद न दिल्यास किंवा मुलाखतीस उमेदवार उपस्थित नसल्यास त्यांना मुलाखतीमध्येअपात्र ठरविण्यात येईल.
◾वरील पदाचे काम हे पूर्ण वेळ असल्याने नियुक्ती कालावधीत उमेदवाराला इतरत्र कुठेही काम/प्रॅक्टीस करता येणार नाही.
◾वनसर्वेक्षक पदाचे मुख्यालय चंद्रपूर निवड झालेल्या उमेदवारास उपसंचालक (बफर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांचे आदेशानुसार त्यांचे कार्यक्षेत्रामधील इतर कोणत्याही ठिकाणी काम करावे लागेल.
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |

मागील 5 वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे. नोकरी, नवीन योजना व बँकिंग क्षेत्रातील माहिती मी या ब्लॉगद्वारे देतो.सर्व माहिती ऑनलाईन स्रोतापासून मिळवून तुम्हाला देण्यात येते, काही अडचण असल्यास संपर्क साधावा.