Educational Schemes : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे शैक्षणिक योजने अंतर्गत पहिली ते सातवी अकरावी व बारावी तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना तब्बल एक लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.
बांधकाम कामगारासाठी ही योजना असून यासाठी तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे तुम्हाला दोन पेक्षा जास्त पाल्य असतील तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही तुम्हाला दोन पाल्य असतील तर या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता.
बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करायचे असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता आणि बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेऊ शकता. तब्बल एक लाख रुपये पर्यंत हा लाभ दिला जाणार असून यामध्ये विविध शैक्षणिक अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
शैक्षणिक अभ्यासक्रम व मिळणारे लाभ
या योजनेअंतर्गत पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या दोन पाल्यांना दरवर्षी अडीच हजार रुपये, आठवी ते दहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना दरवर्षी पाच हजार रुपये, दहावी ते बारावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना दहा हजार रुपये, अकरावी बारावी साठी शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना दहा हजार रुपये, दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी वीस हजार रुपये.
दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगारांच्या पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता एक लाख रुपये व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकरिता साठ हजार रुपये, दोन पाल्यांना शासनमान्य पदवीके करिता प्रतिवर्षी वीस हजार व पपदव्युत्तर पदविकेमध्ये 25000 एवढी रक्कम आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते. यासोबतच तुम्ही संगणकाचे शिक्षण घेत असाल तर त्या शिक्षणासाठी जे शुल्क भरावे लागते त्या शुल्काची प्रतिपूर्ती सुद्धा या मंडळाकडून केली जाते.
आवश्यक कागदपत्रे (BOCW Educational Schemes)
या योजनेमध्ये तुम्ही अर्ज करू इच्छित असाल तर तुमच्याकडे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ओळखपत्र, बँकेचे पासबुक, रहिवासी पुरावा ज्यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका, मागील महिन्याचे विद्युत देयक, ग्रामपंचायतीचा दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र असणे आवश्यक आहे. शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्यास त्याचा पुरावा म्हणून बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा शाळेचे ओळखपत्र तुम्ही जोडू शकता.
पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 75% टक्के हजेरी बाबत शाळेचा दाखला घ्यावा लागेल, दहावी बारावी साठी किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याचे गुणपत्रिका,अकरावी बारावी साठी दहावी व अकरावीची गुणपत्रिका व इतर अभ्यासक्रमासाठी मागील शैक्षणिक इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक प्रमाणपत्र व चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्या बाबतची पावती किंवा बोनाफाईड सोबत जोडणे आवश्यक असेल.
वर दिलेली कागदपत्र तुमच्याकडे असेल तर तुमच्या मुलांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकता जर तुमची नोंदणी झालेली नसेल तर खाली लिंक दिलेली आहे त्यावरून नोंदणी करू शकता तसेच या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी अर्ज चा नमुना सुद्धा दिलेला आहे तो नमुना सुद्धा खालील लिंक करून डाऊनलोड करू शकता.