Created by Aditya, 22 Jun 2025
Van Vibhag Bharti 2025 : सरकारी विभागात नोकरीची चांगली संधी !! महाराष्ट्र वन विभागामध्ये विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जिल्ह्यानुसार जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन अथवा ऑफलाईन जिल्हा नुसार सादर करावेत, महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
A new advertisement has been published for the recruitment of various posts in the Maharashtra Forest Department. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications online or offline along with all the necessary documents.
◾भरतीचा विभाग : हि भरती महाराष्ट्र वन विभागांतर्गत राबविण्यात येत आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक व महिला मानद वन्यजीव रक्षक
◾शैक्षणिक पात्रता : पदवी B.V.Sc. and A.H./M.V.Sc. (Wildlife preferably) उमेदवारास वनविभागामध्ये किंवा इतर शासकिय प्राधीकरणा अंतर्गत किमान 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. (शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी).
◾अर्ज करण्याची पद्धत : सदरचे अर्ज स्वहस्ते किंवा पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे सुध्दा खालील पत्त्यावर स्विकारण्यात येईल.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️पशु वैद्यकीय अधिकारी,
▪️पशुवैद्यकीय पर्यवेक्षक व महिला मानद वन्यजीव रक्षक
◾नोकरीचे ठिकाण : नाशिक, नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया
◾शेवटची तारीख : अर्ज करण्याची शेवटची तारीख जिल्ह्यानुसार वेगवेगळी असल्याने उमेदवारांनी जाहिरात डाऊनलोड करून पहावे.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 27000 ते जास्तीत जास्त 50000 रुपये देण्यात येणार आहे
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्ह्यानुसार अर्ज पाठवण्याचा पत्ता वेगवेगळा असल्याने उमेदवारांनी जिल्ह्यानुसार जाहिरात डाऊनलोड करून पहावे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://mahaforest.gov.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- सदर कंत्राटी पदाकरीता इच्छुक उमेदवारांनी त्यांचे नाव, गाव, पत्ता, पदाचे नाव, शैक्षणीक पात्रता, संपर्क क्रमांक, आधी केलेल्या कामाचा अनुभव इत्यादी सर्व आवश्यक माहिती नमुद करुन अर्ज सादर करावेत.
- मुलाखतीकरीता येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता (TA/DA) लागू राहणार नाही. उमेदवारांना मुलाखतीची तारीख, वेळ व स्थळ वेगळयाने कळविण्यात येईल.
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन तसेच ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
- भरतीचा कालावधी 11 महिन्याच्या कंत्राटी तत्त्वावर ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- या भरती प्रक्रियेमध्ये काही बदल झाल्यास उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळाला https://mahaforest.gov.in/ भेट द्यायची आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज करण्याची पद्धत तसेच सविस्तर जाहिरात जिल्हा नुसार डाऊनलोड करून पात्रता व अटी पूर्ण करत असल्यास अर्ज सादर करायचे आहेत तसेच इतर सविस्तर माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्धवट असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत तसेच दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकरण्यात येतील.
- उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवारी उमेदवारांची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- सदरचे अर्ज स्वहस्ते किंवा पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे सुध्दा खालील पत्त्यावर स्विकारण्यात येईल.
PDF जाहिरात (जिल्ह्यानुसार) | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |