USF Bank Transgender Scholarship : उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंकेअंतर्गत नववी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी 60,000 रुपये शिष्यवृत्ती;या पद्धतीने करा अर्ज

USF Bank Transgender Scholarship 2024.25 : तृतीयपंथीयासाठी शिष्यवृत्ती देणारी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Bank) हे आतापर्यंतची एकमेव बँक आहे, नववी ते बारावी आणि पदवी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तृतीय पंथीय विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.

या शिष्यवृत्तीसाठी तुम्ही सरकारी, निम सरकारी किंवा ओपन युनिव्हर्सिटी मधून जरी शिक्षण घेत असाल तरीही या शिष्यवृत्तीचा लाभ तुम्ही घेऊ शकता.

उज्ज्वल स्मॉल फायनान्स बँक मर्यादित ही स्मॉल फायनान्स क्षेत्रातील अग्रगण्य बँक आहे, विविध प्रकारच्या सुविधासह ही बँक संपूर्ण भारतभरात कार्य करते.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ट्रांसजेंडर स्कॉलरशिप 2024-25अंतर्गत ही बँक ६०००० रुपयापर्यंत तृतीयपंथी विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य देते यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.

शिष्यवृत्तीसाठी पात्रता

  • नववी ते बारावी पदवी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या कोणत्याही तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती असेल.
  • मागील वर्षात कमीत कमी 35 टक्के मार्कसह पास झालेले विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.
  • जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न असावे दहा लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेले विद्यार्थी येथे अर्ज करू शकणार नाहीत.
  • भारतातील सर्व तृतीयपंथी विद्यार्थी येथे अर्ज करू शकतात.
  • उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि बडी फोर स्टडी मध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचे पाल्य या शिष्यवृत्तीसाठी पात्र नसतील.

शिष्यवृत्ती चे फायदे

  1. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी – 24000 रुपयापर्यंत शिष्यवृत्ती
  2. पदवीधर व पदवीधर साठी – 60000 रुपये पर्यंत शिष्यवृत्ती

या शिष्यवृत्तीमध्ये मिळणारे रक्कम तुम्ही शैक्षणिक खर्चासाठी वापरू शकता ज्यामध्ये एक्झाम फी,ऍडमिशन फी किंवा ट्युशन फि चा समावेश असेल.

आवश्यक कागदपत्रे (USF Bank Transgender Scholarship)

  • या शिष्यवृत्तीला अर्ज करते वेळेस खाली नमूद केलेले सर्व कागदपत्रे व्यवस्थितरित्या अपलोड करणे आवश्यक असेल आवश्यक ती कागदपत्रे खालील प्रमाणे:
  • इयत्ता दहावी व बारावी किंवा पदवीचे मागील वर्षाचे गुणपत्रक
  • शासकीय प्रमाणपत्र जसे की आधार कार्ड
  • शाळेत प्रवेश घेतल्याचा पुरावा (यामध्ये कॉलेज किंवा शाळेच्या आयडी कार्ड), फी भरल्याची पावती, शाळा किंवा कॉलेजमध्ये जो खर्च होईल त्याचा मागील वर्षाच्या पावत्या जमा करणे आवश्यक राहील.
  • कुटुंबाचे एकत्रित उत्पन्नाचा पुरावा (यामध्ये आयटी रिटर्न, सॅलरी स्लिप किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला गृहीत धरण्यात येईल)
  • बँक अकाउंट ची माहिती अर्जदार किंवा पालकांची देता येईल
  • ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट
  • सरकारने दिलेले ट्रान्सजेंडर आयडी कार्ड, शाळा किंवा कॉलेजने ट्रांसजेंडर असल्याचा पुरावा, एनजीओ असल्यास एनजीओ ने दिलेले ट्रांसजेंडर चे प्रमाणपत्र, सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वतःचे हमीपत्र.
  • एनजीओ मध्ये राहत असल्यास एनजीओने दिलेले पत्र
  • अलीकडल्या काळातील फोटोग्राफ
अर्ज करण्याची पद्धत
  1. ऑनलाईन पद्धतीने https://www.buddy4study.com/page/ujjivan-small-finance-bank-transgender-scholarship या लिंक वर जाऊन अर्जदाराने अप्लाय नाऊ (Apply Now) या बटनाला क्लिक करावे अप्लाय नाऊ (Apply Now) या बटनाला क्लिक केल्यानंतर बडी फॉर स्टडीचे अकाउंट लॉगिन करावे (अकाउंट नोंदणी केलेले नसल्यास सर्वप्रथम त्याचे नोंदणी करून घ्यावी ई-मेल, मोबाईल किंवा जीमेल अकाउंट ने तुम्ही नोंदणी करू शकता )
  2. त्यानंतर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ट्रांसजेंडर स्कॉलरशिप 2024-25 याचा अर्ज ओपन होईल तेथे स्टार्ट अप्लिकेशन (Start Application) या बटनाला क्लिक करावे आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करावी.
  3. आवश्यक ती सर्व माहिती ऑनलाईन अर्ज मध्ये नमूद करावी
  4. सांगितलेले सर्व कागदपत्रे अर्जामध्ये अपलोड करावेत.
  5. अर्जामध्ये दिलेल्या अटी शर्ती (Terms & Conditions) व्यवस्थितरित्या वाचाव्यात व अर्ज प्रीविव् (Preview) या बटनाला क्लिक करावे, प्रीविव् या बटनाला क्लिक करून आपण भरलेली माहिती व्यवस्थित रित्या भरलेली आहे की नाही हे पडताळून पाहावे.
  6. आणि त्यानंतर सबमिट (Submit) या बटनाला क्लिक करून अर्ज जमा करावा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.शिष्यवृत्तीची निवड प्रक्रिया कशी असेल?

Ans : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ट्रांसजेंडर स्कॉलरशिप 2024 25 हे विद्यार्थ्यांच्या फायनान्शिअल बॅकग्राऊंड आणि मेरिटनुसार उमेदवाराची शॉर्टलिस्ट काढेल, त्यानंतर टेलिफोनिक इंटरव्यू घेतल्या जाईल, कागदपत्राचे पडताळणी होईल आणि उमेदवाराची निवड केल्या जाईल.

2.माझी निवड झाल्यास शिष्यवृत्तीचे रक्कम कशी मिळेल?

Ans : अर्जदाराची निवड झाल्यास त्या अर्जाचे स्टेटस तुम्ही बडी फॉर स्टडीच्या अकाउंट लॉगिन करून चेक करू शकता, निवड झालेल्या अर्जदारास दरवर्षी त्याच्या नमूद केलेल्या बँक अकाउंट वर रक्कम जमा करण्यात येईल.

3.या शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा?

Ans : या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो व त्याविषयीची संपूर्ण माहिती दिलेली आहे.

तुम्ही सुद्धा या शिष्यवृत्तीसाठी इच्छुक असाल व वर नमूद केलेली पात्रता धारण करत असाल तर आत्ताच वर दिलेल्या लिंकवर जाऊन लगेच अर्ज सादर करून या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा.

Leave a Comment