स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत 44 जागांसाठी भरती सुरु;पगार 64000 रुपये | Swachh Maharashtra Abhiyan Bharti

Swachh Maharashtra Abhiyan Bharti : स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 अंतर्गत विविध पदे करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात मध्ये QR कोड दिलेला आहे तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

हे अर्ज 07 ऑगस्ट 2025 संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सादर करू शकणार आहेत त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  1. राज्यस्तरीय तांत्रिक तज्ञ – 04 जागा
  2. विभागीय तांत्रिक तज्ञ – 06 जागा
  3. जिल्हा तांत्रिक तज्ञ – 34 जागा

एकूण 44 जागा

शैक्षणिक अर्हता व अनुभव

इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी कोणत्याही शाखेत बीई ,बी टेक, बी प्लान किंवा एमएससी एन्व्हायरमेंट किंवा तत्सम व समकक्ष अर्हता तसेच अतिरिक्त अर्हता म्हणजे संगणकीय ज्ञान एमएससीआयटी केलेले असणे आवश्यक आहे.

स्वच्छ भारत अभियान नागरी अंतर्गत तीन वर्षे किंवा जास्त अनुभव असावा किंवा महानगरपालिका, नगरपरिषदांतर्गत राष्ट्रीय राज्यस्तरीय प्रकल्पामध्ये कामाचा तीन वर्षाचा अनुभव असल्यास उमेदवारांना येथे प्राधान्य देण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत व कालावधी

या पदभारतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून हे अर्ज 24 जुलै 2025 पासून दिवस 07 ऑगस्ट 2025 पर्यंत सादर करायचे आहेत. ऑनलाईन अर्जाची लिंक तसेच QR कोड जाहिराती मध्ये दिलेला आहे आणि त्याची लिंक खाली दिलेली आहे. उमेदवाराचे वय 30 जून 2025 रोजी जास्तीत जास्त 40 वर्ष असावे त्यापेक्षा जास्त असल्यास उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.

इतर सूचना
व्हाट्सअप ग्रुप फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

उच्चतम शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. आवश्यकता पदाची संख्या कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार संबंधित विभागाकडे राखीव असेल निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्यात नेमणूक दिलेल्या ठिकाणी काम करावे लागेल.

निवड प्रक्रिया (Swachh Maharashtra Abhiyan Bharti)

प्राप्त अर्ज छाननी करून झाल्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखती करीत उपस्थित राहण्याबाबत ई-मेलवर कळवण्यात येईल.

मासिक वेतन

वर नमूद केलेल्या पदासाठी कमीत कमी 55 हजार आणि जास्तीत जास्त 64 हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

तुम्ही सुद्धा पद भरतीसाठी इच्छुक असेल तर खालील पीडीएफ दिलेली आहे त्या पीडीएफ मध्ये जाऊन तुम्ही सविस्तर जाहिरात वाचू शकता व खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता या पदाभरती मध्ये कोणत्याही शुल्कचा उल्लेख केलेला नाही संपूर्ण शहानिशा करूनच कोणतेहि शुल्क द्यावे, जॉब मिळवून देतो असे सांगून पैसे उकळणाऱ्यापासून सावध राहावे तुमच्या झालेल्या फसवणूकिस आमची टीम जबाबदार राहणार नाही.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

Leave a Comment