Suzlon Scholarship 2024 : सुझलॉन ग्रुप मार्फत 9वी, पदविका व पदवीच्या शिक्षणाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 1,20,000 रुपये शिष्यवृत्ती मिळेल

Suzlon Scholarship 2024 : सुझलॉन ग्रुपचे संस्थापक श्री तुलसी तंती यांच्या स्मृतिप्रत्यार्थ सुझलॉन ग्रुप श्री तुलसी तंती स्कॉलरशिप प्रोग्राम लॉंच करत आहे, सुझलॉन ग्रुप अंतर्गत नववी तसेच पदविका धारक विद्यार्थ्यांसाठी व पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षाला 01 लाख 20 हजार रुपये पर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे.

सुझलॉन ग्रुप रिन्यूएबल एनर्जी मध्ये एकूण 17 देशात कार्य करते सामाजिक जबाबदारी अंतर्गत व श्री श्री तुलसी तंती यांच्या स्मृतिप्रत्यार्थ स्कॉलरशिप दरवर्षी दिले जाते इयत्ता नववी, डिप्लोमा व पदवीला प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांना तब्बल 1,20,000 चे आर्थिक साहाय्य दिले जाते हि रक्कम विद्यार्थ्यांना थेट अकाउंटला मिळत असल्यामुळे आवश्यक ते सर्व शैक्षणिक खर्च विद्यार्थी या रक्कमेमधून करू शकतात.

शिष्यवृत्ती चे प्रकार

  1. श्री तुलसी तंती शक्ती स्कॉलरशिप प्रोग्राम इयत्ता नववी मुलींसाठी
  2. श्री तुलसी तंती उडान स्कॉलरशिप प्रोग्राम पदवीधर विद्यार्थ्यांसाठी
  3. श्री तुलसी तंती उडान स्कॉलरशिप प्रोग्राम पदविकेला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी.

शिष्यवृत्तीची रक्कम

  1. इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी साठी सहा हजार रुपये दरवर्षी दिले जाणार.
  2. पदवीधर विद्यार्थ्यांना 01 लाख 20 हजार रुपये
  3. पदविका धारक विद्यार्थ्यांना 60000 रुपये दरवर्षी दिले जाणार आहेत.

शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता

  • विद्यार्थी हा नववी मध्ये, पदवीकेला किंवा पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेला असावा.
  • विद्यार्थ्यांना अगोदरच्या वर्षी कमीत कमी 50 टक्के गुण मिळालेले असावे.
  • पदविकांसाठी बारावी मध्ये 50% तर पदविकाधारक उमेदवारांसाठी दहावी व बारावीला कमीत कमी 50 टक्के गुण असने आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांच्या पालकाचे एकत्रित उत्पन्न सहा लाख किंवा सहा लाखापेक्षा कमी असावे.
  • हि स्कॉलरशिप महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, दमन आणि पुद्दुचेरीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल.
  • बडी4स्टडी च्या कर्मचाऱ्यांचे पाल्य विद्यार्थी या स्कॉलरशिप साठी पात्र नसतील.
शिष्यवृत्तीच्या रकमेचा वापर

या शिष्यवृत्तीचा वापर शैक्षणिक खर्च, पुस्तके व आवश्यक वस्तू घेण्यासाठी करू शकणार आहात.

शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे (Suzlon Scholarship 2024)

  • ओळखीचा व पत्त्याचा पुरावा (यामध्ये आधार कार्ड चा समावेश असेल)
  • प्रवेश घेतल्याचा पुरावा (प्रवेश पात्र, आयडेंटिटी कार्ड किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट)
  • मागच्या वर्षीच्या अभ्यासक्रमाचे मार्कशीट
  • दहावी आणि बारावीचे मार्कशीट
  • कुटुंबाचा उत्पन्नाचा पुरावा (यामध्ये ग्रामपंचायत ने दिलेला उत्पन्नाचा पुरावा, तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा पुरावा, सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा पुरावा किंवा जर पालक निकरीला असेल तर मागच्या तीन महिन्याच्या सॅलरी स्लिप किंवा फॉर्म 16A ,बीपीएल रेशन कार्ड इत्यादी)
  • बँक अकाउंट डिटेल्स विद्यार्थ्यांचे किंवा पालकांचे (पासबुक अथवा कॅन्सल चेक)
  • पासपोर्ट साईज फोटो.

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा

  1. या शिष्यवृत्तीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल https://www.buddy4study.com/page/suzlon-scholarship-program या लिंक वर गेल्यानंतर तुम्हाला अप्लाय नाऊ (Apply Now) हे बटन दिसेल त्यानंतर बडी फोर स्टडी चे अकाउंट लॉगिन करायला लागेल.
  2. जर अकाउंट असेल तर सर्वप्रथम ईमेल आयडी, मोबाईल नंबर किंवा जीमेल अकाउंट ने नोंदणी करून घ्यावी त्यानंतर एप्लीकेशन फॉर्म (Application Form Page) पेज ओपन होईल.
  3. एप्लीकेशन फॉर्म पेजवरून श्री तुलसी तंती स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 हे पेज ओपन होईल तिथे तुम्हाला स्टार्ट अप्लिकेशन (Start Application) या बटनाला क्लिक करायचा आहे आणि आवश्यक ते सर्व माहिती भरायची आहे.
  4. सांगितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थितरित्या अपलोड करायचे आहेत.
  5. त्यानंतर खाली दिलेल्या अटी व शर्ती (Terms & Conditions) व्यवस्थित वाचायच्या आहेत आणि एक्सेप्ट (Accept) करायच्या आहेत, व अर्जाचा प्रीविव् (Preview) पाहायचा आहे.
  6. अर्जाच्या प्रीविव् (Preview) मध्ये तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित भरली का नाही हे तपासायची आहे आणि सबमिट (Submit) या बटनाला क्लिक करून अर्ज सबमिट करायचा आहे. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी 10 डिसेंबर 2024 पूर्वी अर्ज सादर करू शकतात

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.या शिष्यवृत्तीची निवड प्रक्रिया कशी आहे?

Ans : उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर कराव लागेल त्यानंतर वैयक्तिक माहिती भरावी लागेल काही प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागतील त्यानंतर आर्थिक व सामाजिक बॅकग्राऊंड चेक करून उमेदवाराची निवड केल्या जाईल.

2.मी दहावीला आहे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो का?

Ans : नाही, दहावीच्या कोणत्याहि विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती लागू नाही.

3.मी माझी बारावी मुंबईमध्ये पूर्ण केलेली आहे व पदवीचे शिक्षण मी दुसऱ्या राज्यात करत आहे तर मी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल का?

Ans : हो, वर दिलेल्या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर अर्ज करू शकता.

4.मला आठवीला मला आठवीला 40% गुण आहेत मी नववीच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकते का?

Ans : हो, नववीच्या शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही टक्केवारीची आवश्यकता नाही तुम्ही अर्ज सादर करू शकता.

5.मला स्कॉलरशिप सर्व वर्षासाठी मिळेल का?

Ans : हो, तुम्ही दोन वर्ष, तीन वर्षे किंवा चार वर्षाचा कोणत्या पदविका किंवा पदवीच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असल्यास ती शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.

Leave a Comment