SBI Scholarships 2024 : स्टेट बँकेमार्फत पहिली ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल 7.5 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती

SBI Scholarships 2024 : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत इयत्ता सहावी पासून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देत आहे सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना तब्बल साडेसात लाख रुपये पर्यंत या बँकेमार्फत सहाय्य पुरवले जाते.

एसबीआय फाउंडेशन मार्फत सामाजिक बांधिलकी जपताना वेगवेगळ्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ही बँक गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चा पुरवठा करते

शिष्यवृत्ती चा प्रकार

खालील प्रकारांतर्गत एसबीआय फाउंडेशन गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते

  1. एसबीआयएफ आशा स्कॉलरशिप प्रोग्राम फॉर स्कूल स्टूडेंट
  2. एसबीआयएफ स्कॉलरशिप प्रोग्राम फॉर अंडर ग्रॅज्युएट स्टुडन्ट
  3. एसबीआयएफ स्कॉलरशिप प्रोग्राम फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडन्ट
  4. एसबीआयएफ आशा स्कॉलरशिप प्रोग्राम फॉर आयआयटी स्टुडन्ट
  5. एसबीआयएफ एस स्कॉलरशिप प्रोग्राम फॉर आयआयएम स्टुडंट्स

शिष्यवृत्तीचे रक्कम

स्टेट बँक ऑफ इंडिया फाउंडेशन अंतर्गत शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकरक्कमी 15 हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती दिल्या जाते, पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 50000 पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.

पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 70 हजारापर्यंत शिष्यवृत्ती दिले जाते,आयआयटी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन लाखापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते तर आयआयएम मध्ये एमबीए किंवा पीसीडीएम करत असलेल्या विद्यार्थ्यांना 750000 रुपये एवढी शिष्यवृत्ती दिली जाते.

आवश्यक पात्रता

  • या शिष्यवृत्ती मध्ये अर्ज करणाऱ्या ने एन आय आर एफ रँकिंग मधल्या टॉप 100 इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतलेला असावा.
  • मागच्या शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांनी कमीत कमी 75 टक्के गुण मिळवलेल्या असावे.
  • विद्यार्थी च्या कुटुंबाची एकूण वार्षिक उत्पन्न 06 लाखापर्यंत असावे.
  • विद्यार्थी हा भारताचा नागरिक असावा.
  • तीन लाख किंवा तीन लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
  • 50% शिष्यवृत्तीची रक्कम ही महिला उमेदवारासाठी राखून ठेवलेली आहे.
  • अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
  • मागच्या सर्व शिक्षणाचे मार्कशीट व प्रमाणपत्र (ज्यामध्ये इयत्ता दहावी, इयत्ता बारावी, पदविका, पदवी, पदव्युत्तर जे आवश्यक असेल ते)
  • शासकीय ओळखपत्र (आधार कार्ड)
  • प्रवेश घेतलेल्या शाळेची फी भरल्याची पावती
  • यावर्षी प्रवेश घेतलेला व शिकत असल्याचा पुरावा जसे की (प्रवेश पत्र, ओळखपत्र किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट)
  • विद्यार्थ्याचे बँक अकाउंट ची डिटेल्स (ज्यामध्ये पासबुक किंवा कॅन्सल चेक जोडू शकता)
  • उत्पन्नाचा पुरावा (यामध्ये फॉर्म 16 ए, शासकीय अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला, सॅलरी स्लिप इत्यादी) जोडू शकतात.
  • विद्यार्थ्यांचा फोटोग्राफ
  • जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असल्यास

अर्ज कसा करावा

  1. या शिष्यवृत्तीसाठी पात्रता धारक विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे, ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी https://www.buddy4study.com/page/sbi-asha-scholarship-program या लिंक वर सर्वप्रथम जायचं आहे या लिंक वर गेल्यावर अप्लाय नाऊ या बटनाला क्लिक करायचं आहे.
  2. अप्लाय नाऊ या बटनाला क्लिक केल्यानंतर बडी फोर स्टडीचे एप्लीकेशन फॉर्म पेज ओपन होईल यावर तुम्हाला नोंदणी करायची आहे, अगोदर नोंदणी केलेल्या असल्यास लॉगिन करायचा आहे.
  3. त्यानंतर एसबीआयएफ आशा स्कॉलरशिप प्रोग्राम 2024 या एप्लीकेशन फॉर्मवर जायचे आहे तिथे गेल्यानंतर स्टार्ट अप्लिकेशन या बटनाला क्लिक करायचं आहे आणि अर्ज भरण्याची प्रोसेस चालू करायची आहे.
  4. सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे व अचूक भरायची आहे.
  5. सांगितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थितरित्या अपलोड करायचे आहेत त्यानंतर दिलेले सर्व अति-शर्ती वाचून अर्जाला प्रिव्हिव करायचा आहे.
  6. प्रिव्हिव करून सर्व माहिती आपण बरोबर भरली की नाही याची खात्री करायची आहे.
  7. खात्री केल्यानंतर सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1.निवड प्रक्रिया कशी असेल?

Ans : विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या अर्जानुसार विद्यार्थ्यांचे आर्थिक बॅकग्राऊंड तपासले जाईल व त्या आधारावर शॉर्टलिस्टिंग केल्या जाईल, त्यानंतर शॉर्टलिस्ट केलेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन कागदपत्राची पडताळणी करून निवड केल्या जाईल.

2.पैसे कसे मिळतील

Ans : निवड झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या नमूद केलेल्या बँक खात्यावर हे पैसे दिले जातील.

3.अर्जाची स्थिती कशी तपासता येईल?

Ans : वर दिलेल्या लिंक वर तुम्ही गेल्यानंतर किंवा बडी फर्स्ट स्टडी च्या अकाउंटला लॉगिन करून तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकता.

4.एसबीआय बँकेच्या शिष्यवृत्तीसाठी एसबीआय बँकेमध्येच खाते असणे आवश्यक आहे का?

Ans : नाही, कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचे खाद्य व त्याची डिटेल्स तुम्ही अर्जामध्ये सादर करू शकता

5.सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेत असल्यास व कोणतीही फी न भरल्यास शिष्यवृत्ती मिळेल का?

Ans : हो, तुम्ही जर वर दिलेल्या अटी व शर्ती मध्ये बसत असेल तुमच्या वार्षिक उत्पन्न कमी असेल तर तुम्ही अर्ज सादर करू शकता यासाठी शाळेकडून लेटर घेणे गरजेचे आहे ज्यामध्ये शाळेने कोणत्याही प्रकारची ही आकारलेली नाही याचा उल्लेख असावा.

Leave a Comment