शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका संचलित इंग्रजी/मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांसाठी सन २०२५-२६ करिता तात्पुरत्या स्वरुपात केवळ सहा महिनेपेक्षा कमी कालावधीकरिता दरमहा एकवट मानधन रक्कम रुपये २००००/- (अक्षरी वीस हजार रुपये फक्त) वर करार पद्धतीवरील इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक या पदाकरिता निवड, प्रतीक्षा यादी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या प्राप्त गुणानुक्रमे नेमणूक करण्यात येणार आहे.
विहित करण्यात आलेली शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचे विहित नमुन्यातील वैयक्तिक माहितीचे अर्ज, गुणपत्रक व प्रमाणपत्रांच्या प्रमाणित स्वयंसाक्षांकित, छायांकित प्रतीसह शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे ०५ येथे जाहिरात प्रसिद्ध झालेच्या दिनांकापासून ५ दिवसापर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११.०० ते २.०० या वेळेपर्यंत हस्त पोहोच स्वीकारण्यात येतील. पोस्टाने /टपालाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज सादर करतेवेळी उमेदवारांनी त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सोबत घेवन यावीत.
PDF जाहिरात – मराठी माध्यम | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात – इंग्लिश माध्यम | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात – विशेष मुलांची शाळा | येथे क्लिक करा |