PNB Education Loan Programme : पंजाब नॅशनल बँकेमार्फत भारतात व प्रदेशात शिक्षणासाठी कमीत कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध;असा करा अर्ज

PNB Education Loan Programme : पंजाब नॅशनल बँके अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कमीत कमी व्याजदरामध्ये शैक्षणिक कर्जाचा पर्याय सर्व विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध करून दिला आहे, जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी हे शैक्षणिक कर्ज अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे.

ज्या विद्यार्थ्याने पदवीला प्रवेश घेतलेला असेल किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेणार असेल त्यासाठी हे कर्ज पंजाब नॅशनल बँके अंतर्गत दिल्या जाते. पंजाब नॅशनल बँक यांतर्गत 8.20% इतक्या कमी व्याजदरापासून शैक्षणिक कर्जाचा पुरवठा केला जातो.

या बँकांतर्गत विविध योजना मार्फत या कर्जाचा पुरवठा केला जातो, पंजाब नॅशनल बँक भारतातली पहिली स्वदेशी बँके एप्रिल 1895 ला लाहोर मध्ये या बँकेची स्थापना झाली या बँकेचे अधिकृत कॅपिटल दोन लाख होते आणि वर्किंग कॅपिटल 20000 होते सगळ्यात अगोदर राष्ट्रीयकृत म्हणून बँकेचा दर्जा मिळालेली पंजाब नॅशनल ही बँक आहे.

शैक्षणिक कर्जाचे प्रकार

पंजाब नॅशनल बँक यांतर्गत वेगवेगळ्या तीन प्रकारांतर्गत शैक्षणिक कर्जचा पुरवठा केला जातो ते खालील प्रमाणे.

  • पीएनबी सरस्वती (PNB Saraswati)
  • पीएनबी प्रतिभा (PNB Pratibha)
  • पीएनबी उडान (PNB Udaan)

आवश्यक पात्रता

  • हे कर्ज घेण्यासाठी बँकेने संकेतस्थळावर काही अटी व शर्ती तसेच आवश्यक पात्रता नमूद केलेल्या आहेत या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला कमीत कमी व्याजदरामध्ये हे कर्ज दिले जाते, पात्रता खालील प्रमाणे
  • अर्जदाराने कोणत्याही पदविका, पदवीधर, पदव्युत्तर किंवा पदव्युत्तर पदविकेला केला मान्यताप्राप्त विद्यापीठात प्रवेश घेतलेला असावा.
  • अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.
  • अर्जदार एंट्रन्स एक्झाम किंवा मेरिट लिस्ट मध्ये आलेले असावे.
  • अर्जदार कमीत कमी बारावी पास असावा.

फायदे

या बँका अंतर्गत विविध प्रकाराला मध्ये शैक्षणिक कर्ज दिले जाते हे कर्ज कमीत कमी व्याजदरावर बँक पुरवठा करते 8.20% ते 11.25 टक्क्यापर्यंत त्यांच्या व्याजाचा दर असतो. महिला अर्जदारासाठी व्याजदर यापेक्षाही कमी असतो.

आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटोग्राफ
  • ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे त्या अभ्यासक्रमाचे फी स्ट्रक्चर
  • पॅन कार्ड
  • कॉलेजचा ऍडमिशन प्रूफ
  • मागच्या तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट सह कर्जदाराचे
  • तसेच इतर आवश्यक कागदपत्रे बँकेने विचारल्यास कर्ज प्रकरण करतेवेळी द्यावे लागते.

अर्ज कसा करावा

  1. या कर्जासाठी अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे, ऑनलाइन अर्जाची लिंक खाली उपलब्ध आहे. https://www.buddy4study.com/page/buddy4study-pnb-education-loan-programme या लिंक वर जाऊन तुम्ही अप्लाय नाऊ या बटनाला क्लिक केल्यानंतर बडी फोर स्टडी च्या अकाउंट वर तुम्ही जाल.
  2. तिथे तुम्हाला लॉगिन करावे लागेल लॉगिन होत नसल्यास नोंदणी करून लॉगिन करावे लागेल त्यानंतर ऑनलाईन एप्लीकेशन फॉर्म चे पेज ओपन होईल.
  3. एप्लीकेशन चे पेज ओपन झाल्यावर स्टार्ट अप्लिकेशन या बटनाला क्लिक करायचे आहे.
  4. आवश्यक ते संपूर्ण माहिती भरून सर्व कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायचे आहेत.
  5. या व्यतिरिक्त तुम्ही बँकेच्या या लिंक वर जाऊन सुद्धा शैक्षणिक कर्जासाठी अर्ज सादर करू शकता https://www.pnbindia.in/education.aspx या लिंक वर गेल्यावर तुम्हाला सविस्तर माहिती भरायची आहे, विचारलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थितरित्या अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर आजचे पूर्ण प्रक्रिया पार पाडायचे आहे.
  6. या कर्ज प्रक्रियेसाठी तुमची निवड झाल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यामार्फत तुम्हाला मेल किंवा कॉल येऊ शकतो या कालद्वारे इतर कागदपत्राची प्रक्रिया तुम्हाला पार पाडावी लागते.

पीएनबी शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत तुम्ही परदेशातील शिक्षणासाठी सुद्धा अर्ज सादर करू शकता या योजनेअंतर्गत पंजाब नॅशनल बँक कर्जाचा पुरवठा करते भारताबाहेर घेत असलेल्या शिक्षणासाठी तुम्ही अर्ज करू शकता.

हे कोर्सेस लंडन, यूएसए येथे करत असल्यास तुम्हाला कर्ज लवकरात लवकर मिळते हे कर्ज एमसीए, एमबीए, एमएस इत्यादी. शिक्षणासाठी मिळते.या कर्ज योजने अंतर्गत तुम्हाला सबसिडी सुद्धा दिल्या जाते.

बँकेचे प्रोसेसिंग शुल्क त्याचा व्याजदर तसेच कागदपत्राच्या शुल्कासाठी बँकेचे अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल.

हे कर्ज कॉलेज, शाळा किंवा हॉस्टेलची फी भरण्यासाठी एक्झाम फी भरण्यासाठी तुम्हाला मिळू शकते यासोबतच या कर्जातून तुम्ही बुक, इक्विपमेंट, इन्स्ट्रुमेंट, युनिफॉर्म, कॅम्पुटर इत्यादी साहित्य सुद्धा खरेदी करू शकता.

या कर्जाचा व्याजदर अधिकृत संकेतस्थळावर दिलेला आहे ते पाहून तुम्ही पात्र असाल व हे कर्ज तुम्हाला घेणे गरजेचे असेल तर त्यासाठी लगेच अर्ज सादर करू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.मी भारतात शिक्षण घेत असल्यास हे कर्ज मिळेल का?

Ans : हो, पंजाब नॅशनल बँके अंतर्गत भारतात आणि भारताबाहेर शिक्षणासाठी सुद्धा कर्ज दिले जाते.

2.या कर्जाचा व्याजदर किती असतो?

Ans : दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर या कर्जाचा व्याजदर 8.20% पासून 11.25% पर्यंत राहणार आहे तर आंतरराष्ट्रीय कर्जासाठी हा व्याजदर 9.25% ते 11.25 टक्के एवढा दाखवण्यात आलेला आहे.

3.या कर्जासाठी कधीपर्यंत अर्ज सादर करू शकतो?

Ans : हे कर्ज घेण्यासाठी तुम्ही 31 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करू शकणार आहात.

Leave a Comment