PMC Recruitment 2025 : पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करायचे आहेत. हे अर्ज 29 जुलै 2025 पर्यंत पोहोचतील अशा बेताने जमा करायचे आहेत. हे अर्ज तुम्हाला स्व-हस्ते द्यायचे असून पोस्टाने किंवा कुरियरने अर्ज पाठवू नये असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. सोबत खाली दिलेल्या आवश्यक कागदपत्राचा तपशील बघावा आणि त्यानंतर पात्र असल्यास अर्ज सादर करावा.
पदांचा तपशील
शिक्षक – एकूण 287 जागा
- मराठी माध्यम – 213 जागा
- इंग्रजी माध्यम – 71 जागा
- विशेष मुलांच्या शाळेत – 03 जागा
शिक्षण व इतर निकष (PMC Recruitment 2025)
इयत्ता पहिली ते बारावीचे शिक्षण संबंधित माध्यमातून झालेले असावे, तसेच डीएड बीएड सुद्धा त्याच माध्यमातून झालेले असणे आवश्यक आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अभयोग्यता (सीटीईटी/टीईटी) चाचणीच्या गुणानुक्रमे उत्तीर्ण उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल.
इयत्ता पहिली ते बारावीचे शिक्षण, डीएड, बीएड व इतर शिक्षण संबंधित माध्यमातून झालेले असावे, उमेदवार जाहिरात वय प्रसिद्ध झालेलय दिवसापासून ग्राह्य धरण्यात येईल सर्वसाधारण खुल्या गटासाठी जास्त जास्त वय 38 वर्ष व राखीव उमेदवारासाठी हे वय 45 वर्ष राहिल.
आवश्यक कागदपत्रे
जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र मागासवर्गीय उमेदवारांनी जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र
महिला विवाहित असल्यास विवाह प्रमाणपत्र जोडावे
आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र सोबत जोडावे
अर्ज करण्याची पद्धत (PMC Bharti 2025)
ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून खाली अर्जाचा नमुना तसेच पीडीएफ जाहिरात दिलेली आहे, पीडीएफ जाहिरात तुम्हाला व्यवस्थित डाऊनलोड करून व्यवस्थित भरून त्यानंतर खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.
अर्ज सादर करण्याचा कालावधी (PMC)
22 जुलै 2025 पासून ऑफलाईन अर्ज घेण्यात येत असून उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेला अर्ज व्यवस्थित रित्या वाचून व्यवस्थित रित्या भरून जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पाच दिवसाच्या आत सुट्टीचे दिवस वगळून म्हणजे 29 जुलै 2025 पर्यंत सकाळी 11 ते 2 या वेळेत पाठवावे, हे अर्ज शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे – 411005 या ठिकाणी सादर करावेत.
मानधन
या पदभरती मध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 20000 रुपये एवढे मानधन देण्यात येईल तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असेल तर खाली पीडीएफ ची जाहिरात दिलेली आहे ती जाहिरात व्यवस्थित रित्या वाचावी आणि पात्र असेल तरच अर्ज स्वतः वरील पत्त्यावर नेऊन द्यावा या पदभरतीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नसून कोणी पैशाची मागणी करत असेल तर अशा फसवणुकीस बळी पडू नये.
PDF जाहिरात – मराठी माध्यम | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात – इंग्लिश माध्यम | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात – विशेष मुलांची शाळा | येथे क्लिक करा |

मागील 5 वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे. नोकरी, नवीन योजना व बँकिंग क्षेत्रातील माहिती मी या ब्लॉगद्वारे देतो.सर्व माहिती ऑनलाईन स्रोतापासून मिळवून तुम्हाला देण्यात येते, काही अडचण असल्यास संपर्क साधावा.