NMMC : नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 44 जागांसाठी नवीन भरती सुरु

NMMC Recruitment 2025 : नवी मुंबई महानगरपालिकेचा (Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025) एकत्रित आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी व राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत 15 वित्त आयोगामार्फत शहरी आरोग्यवर्धन केंद्र अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

खाली नमूद केल्याप्रमाणे ठोक मानधनावर ही भरती जाहीर केली असून यासाठी थेट मुलाखतीला हजर राहायचे आहे. मुलाखतीला जाण्या अगोदर खाली दिलेली पीडीएफ जाहिरात व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यानंतर जाहिरातीमध्ये दिलेल्या पात्रता व अटी पूर्ण करत असल्यास 29 जुलै 2025 रोजी खाली नमूद केलेल्या पत्त्यावर मूळ कागदपत्र व त्याच्या एक झेरॉक्स प्रतिसह मुलाखतीला हजर राहावे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • वैद्यकीय अधिकारी – 44 जागा

(अनुसूचित जाती 6 जागा, अनुसूचित जमाती 4 जागा, विमुक्त जाती (ब) 2 जागा, भटक्या जमाती (ब) 01 जागा, भटक्या जमाती (क) 2 जागा, विशेष मागास प्रवर्ग 01 जागा, इतर मागास वर्ग 10 जागा, ईएसडब्लू 6 जागा, एसईबीसी 06 जागा, अराखीव 6 जागा) एकूण 44 जागा

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातील BAMS पदवीधर असावा, त्यासोबत महाराष्ट्र काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिकल ची नोंदणी बंधनकारक आहे. शासकीय किंवा खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक राहील. उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षा असावे. राखीव प्रवर्गासाठी हे वय 43 वर्षापर्यंत शथील राहील.

अर्ज भरण्याच्या सूचना (NMMC Bharti 2025)

उमेदवारांनी स्वतःचे पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्र प्रमाणे अचूकपणे नोंदवणे, अर्ज सोबत माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्र ची प्रत जोडावी, माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली जन्मतारीखच अर्जात नमूद करावी. जाहिरात प्रसिद्ध केलेले दिनांक पर्यंतच सर्व उमेदवाराचे वय (दिवस, महिने व वर्ष) अर्जात अचूक नमूद करावे, अर्जामध्ये उमेदवाराचे लिंग याबाबतची माहिती नमूद करावी.

सक्षम प्राधिकरणाने दिलेला अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, अनुभव, शैक्षणिक अर्हता, आवश्यक अतिरिक्त अर्हता प्राप्त केल्यानंतर फक्त शासकीय निम शासकीय व खाजगी अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. ज्या पदाकरिता अर्ज केला आहे त्या पदाकरिता आवश्यक असलेला अनुभव गृहीत धरण्यात येईल त्या व्यतिरिक्त इतर अनुभव असल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. एम एस सी आय टी प्रमाणपत्र धारक करीत असल्याचा तपशील नमूद करावा.

आवश्यक कागदपत्रे
व्हाट्सअप ग्रुप फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या स्वसाक्षांकीत केलेल्या प्रति अर्जाच्या नमुना सोबत जोडाव्यात, खालील कागदपत्रे अर्ज सोबत जोडणे आवश्यक आहे.

  1. वयाचे पुरावा
  2. शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  3. कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  4. शासकीय निवास शासकीय व खाजगी संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र
  5. राखीव संवर्गातील उमेदवाराने जात प्रमाणपत्र
  6. अधिवास प्रमाणपत्र
  7. आधार कार्ड
  8. पॅन कार्ड
  9. सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  10. अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र
  11. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
  12. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र

अर्ज करण्याची पद्धत (NMMC Recruitment 2025)

ही निवड मुलाखती द्वारे होणार असून मुलाखतीला जाताना खाली दिलेल्या नमुन्यातील अर्ज व्यवस्थित रित्या भरायचा आहे आणि त्यानंतर मुलाखतीला आवश्यक कागदपत्रासोबत हजर राहायचे आहे.

मुलाखतीचे ठिकाण व तारीख

ही मुलाखत 29 जुलै 2025 रोजी घेण्यात येईल ही मुलाखत येईल आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से.15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी. डी बेलापूर, नवी मुंबई 400614 येथे उपस्थित राहावे.

मासिक वेतन

या पद्भारतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मासिक वेतन 40 हजार रुपये पर्यंत दिले जाणार आहे सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचू शकता मूळ जाहिरातीमध्ये प्रवर्गानुसार रिक्त जागेचा तपशील इतर महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत मुलाखतीला जाण्या अगोदर सविस्तर जाहिरात वाचावी आणि त्यानंतर व्यवस्थित अर्ज भरून मुलाखतीला जावे, या मुलाखतीला तुम्हाला स्वखर्चाने जायचं असून कोणताही भत्ता महानगरपालिकेतर्फे दिल्या जाणार नाही.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

Leave a Comment