नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क व गट-ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी, प्रस्तुत जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत. सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरीता जाहिरात देण्यात येत आहे. सदर जाहिरातीनूसार गट ‘क’ व गट ‘ड’ मधील एकूण ६२० पदांकरीता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक २८.०३.२०२५ पासून ते दिनांक ११.०५.२०२५ रोजी पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ११.०५.२०२५ या दिवशी रात्री ११.५५ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावेत. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |