Created by Aditya, 19 May 2025
NMMC Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 600 हुन अधिक जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे , यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत, नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
A recruitment advertisement has been published for more than 600 vacancies of various posts in Navi Mumbai Municipal Corporation. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their online applications along with all the required documents from the link given below.
◾भरतीचा विभाग : हि भरती नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये राबविण्यात येत आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती
◾शैक्षणिक पात्रता : कमीत कमी १०वी पास ते पदव्युत्तर
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️वायरमन,लिपिक,वार्डबॉय,आय व इतर – 620 जागा (मूळ जाहिरात वाचावी)
◾नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई, महाराष्ट्र
◾शेवटची तारीख : 11 19 मे 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 47500 ते 112000 एवढे मासिक वेतन दिले जाईल.
◾अर्ज शुल्क : सविस्तर जाहिरात वाचावी
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.nmmc.gov.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. आणि महाराष्टात १५ वर्षे अधिवास (Domicile) करीत असल्याबाबतचे त्याने सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र (तहसिलदार यांचे कार्यालयाकडील) उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
◾कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवाशी असणा-या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे. तसाच अर्थ असेल.
◾जातीच्या दाव्याच्या पुष्टयर्थ महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतरमागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम) अधिनियम, २००० मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकारी यांचेकडून प्रदान करण्यात आलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |