Nikon Scholarship Program 2024-25 : निकोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत फोटोग्राफी रिलेटेड कोर्सेस करण्यासाठी तब्बल एक लाख रुपये पर्यंत स्कॉलरशिप देत आहे, निकोन स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 अंतर्गत निकोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही स्कॉलरशिप देत आहे.
जे विद्यार्थी बारावीनंतर फोटोग्राफीच्या कोर्ससाठी प्रवेश घेत आहेत त्यांच्यासाठी हि स्कॉलरशिप असणार आहे कमीत कमी तीन महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीसाठी कोर्स करणे आवश्यक असेल. निकोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जगभरातील नावाजलेले फोटोग्राफी क्षेत्रातील कंपन्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात हि कंपनी कार्यरत असून सामाजिक बांधिलकी म्हणून ही कंपनी फोटोग्राफीसाठी स्कॉलरशिप देते, हे कंपनी मागील भरपूर वर्षापासून शिक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारे साहाय्य करते.
यातीलच एक भाग म्हणून निकॉन स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 हे सुरु केलेला आहे, 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता, यासाठी पात्रता व इतर माहिती खाली दिलेली आहेत.
शिष्यवृत्तीसाठी पात्रता
- तीन महिने किंवा तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीचा फोटोग्राफी संबंधित कोणत्याही कोर्ससाठी ही शिष्यवृत्ती लागू असेल.
- या शिष्यवृत्ती मध्ये अर्ज करणारा अर्जदार हा कमीत कमी बारावी पास असावा.
- शिष्यवृत्तीसाठी जो अर्ज करत आहे त्याचे एकत्रित कौटुंबिक उत्पन्न हे सहा लाखापेक्षा कमी असावे.
- सर्व भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती खुली आहे कोणीही या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो ज्यांनी फोटोग्राफीसाठी अर्ज केला असेल.
- निकोन इंडिया प्राइवेट लिमिटेड आणि बडी फॉर स्टडी मध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांचा पाल्यांना या शिष्यवृत्ती मध्ये सहभाग घेता येणार नाही.
फायदे
या शिष्यवृत्ती अंतर्गत निकोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तब्बल एक लाख रुपये पर्यंतची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देऊ करते, एक लाख रुपये म्हणजे मोठे अर्थसहाय्य विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
- निकॉन स्कॉलरशिप मध्ये अर्ज करण्यासाठी वेगवेगळे कागदपत्र ऑनलाइन अपलोड करणे गरजेचे आहे आवश्यक कागदपत्र खाली दिलेल्या आहेत.
- शासकीय ओळखपत्र जसे की आधार कार्ड, वोटिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड.
- पासपोर्ट साईज फोटोग्राफ
- उत्पन्नाचा पुरावा (ज्यामध्ये फॉर्म 16A , उत्पन्नाचा दाखला, बीपीएल सर्टिफिकेट किंवा पगार पत्रक)
- प्रवेश घेतल्याचा पुरावा (प्रवेश घेतल्याचा पुरावा म्हणून कॉलेजचे आयडी कार्ड किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट)
- फी भरल्याचा पुरावा म्हणून (फी भरल्याची पावती, प्रवेश पत्र, इन्स्टिट्यूट चे आयडी कार्ड किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट)
- अर्जदाराच्या बँकेच्या डिटेल्स (कॅन्सल चेक किंवा पासबुक)
- बारावी व मागील इतर वर्षाच्या मार्कशीट व ग्रेड कार्ड
- अर्जदार अपंग असल्यास अपंगत्वाचा पुरावा
- अलीकडच्या काळातील अर्जदाराचा फोटो
अर्ज कसा करावा
- या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे https://www.buddy4study.com/page/nikon-scholarship-program या लिंक वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.
- वर दिलेल्या लिंक वर गेल्यानंतर अप्लाय नाऊ या बटनाला क्लिक करायचं आहे.
- बडी फोर स्टडीच अकाउंट लॉगिन करायचा आहे जर अकाउंट बनवलेले नसेल तर अकाउंट ची नोंदणी करून घ्यावे लागेल यासाठी ई-मेल, मोबाईल किंवा जीमेल चा वापर तुम्ही करू शकता.
- त्यानंतर तुम्ही निकोन स्कॉलरशिप प्रोग्राम 2024 25 या पेजवर जल तिथे गेल्यानंतर स्टार्ट अप्लिकेशन या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अर्ज भरायला सुरुवात करायची आहे.
- आवश्यक ती माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे सांगितलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून व्यवस्थित रित्या अपलोड करायचे आहेत.
- त्यानंतर अटी व शर्ती या बटनाला क्लिक करायचा आहे आणि एप्लीकेशन प्रीविव् करायच आहे, आपण सर्व माहिती बरोबर भरली की नाही हे प्रीविव् मध्ये तुम्हाला पाहायचे आहे.
- त्यानंतर सबमिट या बटनाला क्लिक करून अर्ज सबमिट करायचा आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)
1.या शिष्यवृत्तीसाठी कसा अर्ज करू शकतो?
Ans : या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता
2.या शिष्यवृत्तीची निवड प्रक्रिया कशी आहे?
Ans : या शिष्यवृत्तीसाठी तुम्ही अर्ज केल्यानंतर अर्जाची पूर्ण पडताळणी होईल त्यानंतर फायनान्शिअल व अकॅडमी बॅकग्राऊंड चेक केले जाईल. टेलिफोन इंटरव्यू घेतले जाईल आणि उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातील त्यानंतर फेस टू फेस मुलाखत घेऊन अंतिम निवड जाहीर केल्या जाईल.
3.माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी फोटोग्राफीचा कोर्स करत आहे त्यासाठी मला अर्थसाह्य मिळेल का?
Ans : हो, तुम्ही जर ग्रॅज्युएशन नंतर तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्याचा कोर्स करत असाल तर तुम्ही अर्ज करू शकता.
4.अर्ज करण्यासाठी बारावी किंवा इतर शिक्षणामध्ये किती टक्केवारी आवश्यक आहे?
Ans : यामध्ये कोणत्याही टक्केवारीची आवश्यकता नाही फक्त पास असलेल्या उमेदवार अर्ज करू शकतात परंतु कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे.
5.ही शिष्यवृत्ती रिन्यू कशी करता येईल?
Ans : तुम्ही वेगवेगळे अभ्यासक्रम दरवर्षी करत असाल तर ही शिष्यवृत्ती तुम्हाला मिळू शकते यासाठी तुम्ही शिक्षण कंटिन्यू करत असल्याची पोचपावती देणे आवश्यक आहे तसेच पुढच्या वर्षीची ट्युशन फीस भरल्याची पावती जमा करणे बंधनकारक राहील पुढच्या वर्षी शिष्यवृत्ती द्यायची की नाही हे सर्व निकॉन इंडिया ठरवेल.