New Districts in Maharashtra : महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती मिळण्यासाठी 21 नवीन जिल्ह्याची निर्मिती प्रस्तावित करण्यात आलेली आहे सध्या अस्तित्वात असलेल्या 35 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्याचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहेत ते येत्या 26 जानेवारी 2025 रोजी या संदर्भातील अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवीन कोणकोणते जिल्हे होणार आहेत त्याची यादी आपण पाहूयात यामध्ये 21 जिल्ह्याचा समावेश आहे ज्यातून पहिले काही मोठे तालुके होते त्याचा आता जिल्हा म्हणून महाराष्ट्र राज्यात समावेश केला जाणार आहे. या अगोदरचे 35 आणि हे 21 असे एकूण 56 जिल्हे महाराष्ट्रात होणार आहे याबाबत अधिकृत घोषणा 26 जानेवारी रोजी होऊ शकते.
संपूर्ण जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोणकोणते नवीन जिल्हे असतील
- जळगाव मधून भुसावळ
- लातूर मधून उदगीर
- बीडमधून आंबेजोगाई
- नाशिक मधून मालेगाव
- नाशिक मधून कळवण
- नांदेड मधून किनवट
- ठाणे मधून मीरा-भाईंदर
- ठाणे मधून कल्याण
- सांगली/सातारा/सोलापूर मधून मानदेश
- बुलढाणा मधून खामगाव
- पुण्यामधून बारामती
- यवतमाळ मधून पुसद
- पालघर मधून जव्हार
- अमरावती मधून अचलपूर
- भंडारा मधून साकुर
- रत्नागिरी मधून मंडणगड
- रायगड मधून महाड
- अहिल्यानगर मधून शिर्डी
- अहिल्यानगर मधूनच संगमनेर
- अहिल्यानगर मधूनच श्रीरामपूर
- गडचिरोली मधून अहिरे असे 21 जिल्हे होणार आहेत
महाराष्ट्राची थोडक्यात माहिती
महाराष्ट्राची स्थापना 01 मे 1960 रोजी झाली त्यावेळी राज्यात फक्त 25 जिल्हे होते त्यानंतर पुढील काळात वाढत्या लोकसंख्येमुळे प्रशासकीय गरजा मुळे नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. 2014 ला ठाणे जिल्ह्याचे विभाजनातून पालघर जिल्हा तयार करण्यात आला. 2018 मध्ये राज्य सरकारच्या समितीने 22 नव्या जिल्ह्याचा प्रसाद सादर केला होता सध्याच्या प्रस्ताव त्यापैकी भौतिक जिल्ह्यांचा समावेश आहे.
नवीन जिल्हा मुळे होणारे फायदे
प्रशासन सुलभ आणि कार्यक्षम होईल- प्रत्येक जिल्ह्याचा आकार कमी झाल्याने प्रशासन अधिक चपळ आणि प्रभावी बनेल
स्थानिक विकासाला गती मिळेल – गावागावापर्यंत विकास पोहोचेल रोजगार शिक्षण आरोग्य यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता आहे.
नागरिकेच्या समस्या लवकर सुटतील – प्रत्येक जिल्ह्याच्या प्रशासनासाठी विशेष लक्ष केंद्रित करता येईल त्यामुळे नागरिकाच्या समस्या सुद्धा जलद गतीने सुटणाऱ्या आहेत.
नवीन जिल्ह्यामुळे येणाऱ्या आव्हाने आणि अडचणी
नवीन जिल्ह्याचे निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक गरजेचे आहे जिल्ह्याचे मुख्यालय सरकारी कार्यालय त्याच्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी लागणारे भांडवल याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहेत याशिवाय प्रशासकीय पुनर्रचना करणे हे सुद्धा आव्हानात्मक काम ठरू शकते.