Maulana Azad Education Loan : मौलाना आझाद एज्युकेशन लोन स्कीम अंतर्गत महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना पाच लाखापर्यंत तीन टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध केले जाते, हे स्कीम मौलाना आझाद मायनॉरिटीज फायनान्स डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या आखत्यारित्या राबवली जाते.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना व आर्थिकदृष्ट कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना कमीत कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध व्हावे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेसाठी महाराष्ट्रातील कोणतेही अल्पसंख्यांक विद्यार्थी शिक्षणासाठी कर्ज घेऊ शकतात.
ही योजना वर्षभर राबवली जाते या योजनेसाठी कोणतीही शेवटची तारीख उपलब्ध नाही तुम्ही डिग्री किंवा डिप्लोमा ला ऍडमिशन घेतलेले असेल तर हे खर्च भागवण्यासाठी कर्जाची आवश्यकता असेल तर या कर्जासाठी तुम्ही सहजरीत्या अर्ज करू शकता. कर्जाची पात्रता, अति व शर्ती खाली नमूद केलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही बसत असाल तर सहजरीत्या कर्जासाठी अर्ज करू शकता.
कर्जासाठी आवश्यक पात्रता
- हे कर्ज घेण्यासाठी विद्यार्थी हा अल्पसंख्यांक अर्जदार असावा, अल्पसंख्याक मध्ये मुस्लिम, शीख,ख्रिश्चन, पारसी, नवबौद्ध व जैन या विद्यार्थ्यांचा समावेश असेल.
- हे कर्ज फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठीच उपलब्ध आहे.
- हे कर्ज घेण्यासाठी तुमचे वय कमीत कमी 16 ते जास्तीत जास्त 32 वर्ष दरम्यान असावे.
- अर्जदार हा मान्यताप्राप्त संस्थेमध्ये किंवा सरकारमान्य संस्थेमध्ये बीटेक, बी फार्म, एमबीए, एमसीए किंवा इतर कोर्स साठी प्रवेश घेतलेला असावा.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.
- बीए किंवा बीकॉम मध्ये प्रवेश घेतलेला असल्यास कर्ज मिळणार नाही.
- या कर्जासाठी सर्वप्रथम महिला व अपंग उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
या कर्जाचे फायदे
- विद्यार्थ्यांना शंभर टक्के कर्ज या योजनेअंतर्गत दिले जाते ज्यामध्ये पदविका किंवा पदवीचा संपूर्ण खर्चाचा समावेश आहे.
- हे कर्ज पाच हजारापासून पाच लाखापर्यंत दिले जाते या कर्जाची रक्कम तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित असते.
- या कर्जाचा व्याजदर तीन टक्के दरवर्षी एवढा असतो या व्यतिरिक्त विद्यार्थी सुद्धा या कर्जामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन म्हणून पाच टक्के रक्कम टाकू शकतात.
- शिक्षण झाल्यानंतर किंवा नोकरी लागल्याच्या सहा महिन्यानंतर कर्ज फेडायचे असते.
- कर्ज फेडण्याचा कालावधी पाच वर्षाचा आहे.
आवश्यक कागदपत्रे
हे कर्ज प्रकरण करण्यासाठी तुम्हाला काय कागदपत्रे संस्थेकडे देणे आवश्यक आहे हे कागदपत्र खालील प्रमाणे
विद्यार्थ्यांचे कागदपत्रे
- अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज कलर फोटो
- ओळखीचा पुरावा (जसे की इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन इत्यादी)
- पत्याचा पुरावा (इलेक्शन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, अधिवास प्रमाणपत्र किंवा इलेक्ट्रिसिटी बिल)
- जन्मतारखेचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट)
- अधिवास प्रमाणपत्र (ज्यामध्ये वोटर आयडी, रेशन कार्ड किंवा पासपोर्ट अपलोड करू शकता)
- बँकेच्या पासबुकची झेरॉक्स
- मागच्या वर्षीच्या मार्कशीट
- शाळेत प्रवेश घेतल्याचा पुरावा बोनाफाईड सर्टिफिकेट शाळा किंवा कॉलेजमधून घ्यावे.
- अल्पसंख्यांक असल्याबाबतचे प्रमाणपत्र सरकारी अधिकाऱ्याने दिलेले.
- संपूर्ण कोर्स साठी लागणाऱ्या फि ची माहिती.
- ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट
- फ्रीशिप फॉर्म ची प्रिंट (जर अर्जदाराने अगोदर कोणती स्कॉलरशिप घेतलेली असल्यास)
सहकर्जदार अथवा पालकाचे कागदपत्र
- अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो
- फोटो आयडी प्रूफ
- रहिवासी पुरावा
- उत्पन्नाचा पुरावा (ज्यामध्ये सॅलरी स्लिप किंवा उत्पन्नाचा दाखला असेल)
- रेशन कार्ड कलर झेरॉक्स लागेल
गॅरेंटर साठी आवश्यक कागदपत्रे
- अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो
- फोटो आयडी प्रूफ
- रहिवासी पुरावा
- गॅरेंटर ची माहिती दिलेल्या नमुन्यात.
- उत्पन्नाचा पुरावा यामध्ये फॉर्म 16A , सॅलरी स्लिप, मागील तीन ITR किंवा सातबारा त्यात देऊ शकता.
अर्ज कसा करावा
- अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना https://www.mamfdc.maharashtra.gov.in/maulana-azad-education-loan या लिंक वर सर्वप्रथम जावे लागेल या लिंक वर गेल्यानंतर मौलाना आझाद मायनॉरिटी एज्युकेशन लॉन्स स्कीम या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- हा पर्याय तुम्हाला स्कीम या सेक्शनमध्ये मिळेल तिथे एज्युकेशन लोन या पर्यायांमध्ये या कर्ज विषयी माहिती असेल.
- त्यानंतर ऑनलाईन एप्लीकेशन फॉर एज्युकेशन लोनला क्लिक करायचं आहे तेथे तुम्हाला YES चा मेसेज दिसेल तिथे YES ला क्लिक करून तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन च्या पेजवर नेल्या जाईल.
- तिथे तुमची नोंदणी करायची आहे आणि सबमिट करायचा आहे (ज्यांनी अगोदर नोंदणी केलेली असेल त्यांनी लॉगिन करावे) व्यवस्थित रित्या नोंदणी झाल्यानंतर आवश्यक ते सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे.
- वर सांगितलेले सगळं कागदपत्र व्यवस्थितरित्या संस्थेच्या फॉरमॅटमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)
1.मौलाना आझाद एज्युकेशन लोन साठी व्याजदर किती आहे?
Ans : ही योजना दरवर्षी तीन टक्के या दराने कर्जाचा पुरवठा करते.
2.हे लोन किती वेळात आम्हाला मिळेल?
Ans : या कर्जाचे प्रोसेस थोडी मोठी असल्यामुळे जवळपास दोन महिन्याचा कालावधी लागतो.
3.या कर्जासाठी काही तारण ठेवण्याची आवश्यकता आहे का?
Ans : या कर्जामध्ये सेक्युर आणि अनसेक्युर दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत तुम्ही सेक्युर लोन घेत असाल तर तुम्हाला तारण ठेवणे आवश्यक आहे, तुम्ही अनसेक्युर लोन घेत असाल तर तारण ठेवण्याची गरज नाही फक्त वर दिलेल्या पात्रता पळणे आवश्यक आहे.
4.या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी किती असेल?
Ans : मिळालेल्या कर्जाची रक्कम तुम्हाला जॉब लागल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पाच वर्षाच्या काळामध्ये फेडायचे आहे.
5.या कर्जाअंतर्गत काही टॅक्स बेनिफिट मिळेल का?
Ans : हे कर्ज घेतल्यानंतर तुमच्या रकमेवर आधारित तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळू शकतात सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे

मागील 5 वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे. नोकरी, नवीन योजना व बँकिंग क्षेत्रातील माहिती मी या ब्लॉगद्वारे देतो.सर्व माहिती ऑनलाईन स्रोतापासून मिळवून तुम्हाला देण्यात येते, काही अडचण असल्यास संपर्क साधावा.