LG Scholarship 2024 : एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कॉर्पोरेट सोशल रेस्पोंसिबिलिटी अंतर्गत लाइफस गुड स्कॉलरशिप प्रोग्राम 2024 राबवण्यात येत आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.
पदवीधर शिक्षणासाठी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असेल अशा विद्यार्थ्यांना ही रक्कम पुरवली जाते यासाठी विविध पात्रता तसेच अटी आणि नियमावली सुद्धा दिलेल्या आहेत याविषयीची सविस्तर माहिती खाली दिलेली असून ती माहिती तुम्ही वाचून अर्ज करू शकता.
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया भारतातील इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे, भारतामध्ये या कंपनीची स्थापना 1997 साली झाली. ही कंपनी मुळची साऊथ कोरियाची आहे या कंपन्या अंतर्गत एचव्हीएससी, आयटी हार्डवेअर, होम अप्लायन्सेस आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भारतीय बाजारात मिळतात.
त्यांचे स्लोगन लाइफस गुड हे असून कंपनी पूर्ण भारतभर कार्य करते महाराष्ट्रातील रांजणगाव या ठिकाणी एलजी कंपनीचा सर्वात मोठा कारखाना आहे तुम्ही सुद्धा या शिष्यवृत्तीसाठी पात्र असाल तर सविस्तर माहिती वाचा खालील पात्रता जाणून घ्या आणि अर्ज सादर करा.
या शिष्यवृत्तीसाठी पात्रता
- या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने पदवीधर किंवा पदवीधर शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असावा व हे प्रवेश मान्यता प्राप्त संस्थेमध्ये घेतलेला असणे आवश्यक आहे.
- या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी बारावीला कमीत कमी 60% मार्क मिळवलेले असणे आवश्यक आहे तसेच दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या वर्षी सुद्धा कमीत कमी 60 टक्के मार्क असतील तरच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.
- बडी फोर स्टडी आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड च्या कर्मचाऱ्यांचे पाल्य या शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार नाहीत.
- विद्यार्थिनीला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
- अर्जदाराने नोंदणीकृत विद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेला असावा या विद्यालयाची यादी अर्ज करते वेळेस पाहायला मिळेल.
- या शिष्यवृत्तीची निवड प्रथम येणाऱ्या प्राधान्य या पद्धतीने होणार आहे.
या शिष्यवृत्ती चे फायदे
- पदवीचे शिक्षण घेत असल्यास 50% ट्युशन फीस किंवा एक लाख रुपये जे कमी असेल ते शिष्यवृत्ती म्हणून मिळेल.
- पदव्युत्तर शिक्षण घेत असल्यास 50% ट्युशन फीस किंवा दोन लाख रुपये जे कमी असेल ते एवढी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
- ज्या विद्यार्थ्यांने कोणतीच फीज भरली नाही त्या विध्यार्थ्यांना पदवीच्या शिक्षणासाठी 50 हजार तर पदव्युत्तर शिक्षणासाठी एक लाख रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे
- बारावीचे गुणपत्रक व त्या अगोदरच्या वर्षाचे किंवा सत्रांचे गुणपत्रक (दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षाचे)
- सरकारी ओळखपत्र (यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड असेल)
- पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड)
- कुटुंबाचे उत्पन्नाचा पुरावा (ज्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न, फॉर्म १६, बी पी एल/रेशन कार्ड, तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला, ग्रामपंचायत ने दिलेले सर्टिफिकेट अपलोड करू शकता)
- प्रवेश घेतल्याचा पुरावा (त्यामध्ये कॉलेज/शाळेचे आयडी कार्ड व फी भरल्याची पावती तसेच शाळेचे फी स्ट्रक्चर सोबत जोडावे.)
- शाळा कॉलेज कडून बोनाफाईड सर्टिफिकेट घेणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या बँक अकाउंट डिटेल्स (यामध्ये पासबुक किंवा कॅन्सल चेक सादर करावा)
- अर्जदाराचा अलीकडल्या काळातील फोटोग्राफ अपलोड करावा.
अर्ज कसा करावा
- या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना तुम्हाला बडी4स्टडी च्या https://www.buddy4study.com/page/life-s-good-scholarship-program या लिंक वर जायचं आहे तिथे गेल्यानंतर अप्लाय नाऊ (Apply Now) या बटनाला क्लिक करायच आहे.
- बडी4स्टडी चे अकाउंट लॉगिन करायचे आहे. अकाउंट रजिस्टर केले नसेल तर सर्वप्रथम नोंदणी (Registration) करून घ्यायची आहे नोंदणी करण्यासाठी ई-मेल, मोबाईल किंवा गुगल अकाउंटचा वापर तुम्ही करू शकता.
- अकाउंट लॉगिन केल्यानंतर तुम्ही लाईफस गुड स्कॉलरशिप प्रोग्राम यांच्या एप्लीकेशन फॉर्म (Application Form) पेजवर जाल, तिथे गेल्यानंतर स्टार्ट अप्लिकेशन (Start Application) या बटनाला तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि अर्ज भरायला सुरुवात करायची आहे.
- आवश्यक ती सर्व माहिती अर्जामध्ये भरायची आहे व सांगितलेले सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्याखाली दिलेल्या अटी व शर्ती (Terms & Conditions) मान्य करून अर्जाचा प्रीविव् (Preview) बघायचा आहे अर्जाच्या प्रीविव् (Preview) मध्ये तुम्ही भरलेली माहिती व्यवस्थितरित्या भरलेली आहे की नाही हे तपासून पाहायचे आहे, आणि सबमिट या बटनाला क्लिक करून अर्ज ची प्रक्रिया समाप्त करायची आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)
1.या स्कॉलरशिप साठी निवड प्रक्रिया कशी असेल?
Ans : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आर्थिक बॅकग्राऊंड वर विद्यार्थ्याचे नाव शॉर्टलिस्ट करण्यात येईल त्यानंतर टेलिफोनिक इंटरव्यू घेऊन उमेदवाराचे निवड करून त्यांना पैसे दिले जातील.
2.माझी या शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यास पैसे कसे मिळतील?
Ans : या स्कॉलरशिप मध्ये निवड झाल्यास पैसे अर्जदारांच्या बॅंक अकाउंट मध्ये पाठवण्यात येतील व हे पैसे दरवर्षी देण्यात येतील.
3.ही शिष्यवृत्ती प्रत्येक वर्षी मिळते का?
Ans : हो, तुम्ही पदवीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला असल्यास व शिष्यवृत्ती मध्ये निवड झाल्यास सर्व वर्षासाठी तुम्हाला हि शिष्यवृत्ती लागू असेल.
4.ही शिष्यवृत्ती किती रुपयापर्यंत मिळते?
Ans : तुम्ही जर कॉलेजमध्ये ट्युशन फी भरलेली असल्यास रकमेच्या 50% एवढी ट्युशन फीस स्कॉलरशिप म्हणून तुम्हाला मिळते जर फी भरलेली नसल्यास व कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असल्यास पदवीधर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास 50 हजार व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्या विद्यार्थ्याला 01 लाख रुपये एवढे आर्थिक साहाय्य दिले जाते.