KVB Scholarship 2024-25 : करूर वैश्य बँकेमार्फत दरवर्षी 1,00,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार; या पद्धतीने करा अर्ज

KVB Scholarship 2024-25 : करूर वैश्य बँक (केव्हीबी) प्रथम वर्षामध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला एक लाखापर्यंत आर्थिक साहाय्य पुरवते केव्हीबी स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 अंतर्गत करूर वैश्य बँक हे शिष्यवृत्ती देते. हि बँक संपूर्ण भारतात कार्यरत असून संपूर्ण भारतभरात ही बँक शिष्यवृत्ती देते.

या शिष्यवृत्ती मध्ये अर्ज करणारा अर्जदार हा सरकारी किंवा अनुदानित शाळेमध्ये प्रवेश घेतलेला असावा या विद्यार्थ्याने मेडिकल, इंजिनिअरिंग, एग्रीकल्चर, आर्ट, सायन्स, बँकिंग रिलेटेड फायनान्शिअल कोर्सेस किंवा AI एरिया म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग इत्यादीसाठी प्रवेश घेतलेला असावा.

तमिळनाडू, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यामध्ये राहणारे व शिक्षण घेणारे विद्यार्थी/विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल या शिष्यवृत्ती अंतर्गत दरवर्षी एक लाख रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते प्रायव्हेट सेक्टरची बँक असून 1916 साली या बँकेची स्थापना झालेली आहे.

याचे मुख्य कार्यलय करूर तमिळनाडू या ठिकाणी आहे, केव्हीबी बँक विविध फायनान्स सर्विसेस, कार्पोरेट बँकिंग, वेल्थ मॅनेजमेंट यावर कार्य करते. शैक्षणिक क्षेत्र, औद्योगिक क्षेत्रात तसेच हॉस्पिटलमध्ये प्रगती व्हावी या उद्देशाने सीएसआर अंतर्गत केव्हीबी बँक कार्य करते.

शिष्यवृत्ती साठी पात्रता

  • या शिष्यवृत्ती मध्ये अर्ज करणारा अर्जदार मेडिकल, इंजिनिअरिंग, एग्रीकल्चर, आर्ट, सायन्स, बँकिंग रिलेटेड कोर्सेस तसेच मशीन लर्निंग इत्यादी कोर्सेस मध्ये प्रवेश घेतलेला असावा.
  • पहिल्या वर्षाच्या अंडर ग्रॅज्युएट असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
  • अर्जदार हा तमिळनाडू, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यात राहणारा असावा.
  • अर्जदाराने मागच्या वर्षी कमीत कमी 60 टक्के एवढे गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न सहा लाखापेक्षा जास्त नको.
  • केव्हीबी बँक आणि बडी फॉर स्टडी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पाल्य या शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार नाहीत.
  • वर नमूद केलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती लागू नाही
  • सरकारी किंवा अनुदानित शाळेमध्ये विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असल्यासच ही शिष्यवृत्ती दिली जाईल.

फायदे

या शिष्यवृत्ती अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्याला दरवर्षी एक लाख रुपये याप्रमाणे आर्थिक सहाय्य दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज करण्यासाठी विविध कागदपत्रे लागणार आहेत ते कागदपत्रे खालील प्रमाणे
  • ओळखीचा शासकीय पुरावा (ज्यामध्ये आधार कार्ड, वोटिंग कार्ड किंवा वाहन चालवण्याचा परवाना)
  • सध्याच्या वर्षाचा प्रवेश घेतल्याचा पुरावा (ज्यामध्ये फी भरल्याची पावती, कॉलेजचे आयडेंटिटी कार्ड आणि बोनाफाईड सर्टिफिकेट)
  • दहावी बारावीच्या गुणपत्रिका स्वसाक्षांकीत करून अपलोड करावे.
  • कुटुंबा चा उत्पन्नाचा पुरावा (यामध्ये सॅलरी स्लिप, शासकीय अधिकाऱ्याने दिलेला पुरावा, पालकांचे फॉर्म 16A किंवा मागच्या सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट)
  • अर्जदाराच्या बँक अकाउंट ची डिटेल्स ज्यामध्ये कॅन्सल चेक किंवा बँक स्टेटमेंट टाकू शकतात.
  • अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटोग्राफ
अर्ज कसा करावा
  1. या शिष्यवृत्ती साठी तुम्हाला बडी फॉर स्टडी च्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे, ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
  2. सर्वप्रथम बडी फॉर स्टडी च्या https://www.buddy4study.com/page/kvb-scholarship-program या लिंकवर जाऊन तुम्हाला रजिस्टर आयडीने लॉगिन करून घ्यावे लागेल व एप्लीकेशन फॉर्म पेज याला क्लिक करून अर्ज भरणे सुरू करावे लागेल.
  3. तुम्ही या अगोदर नोंदणी केलेली नसल्यास तुम्हाला बडी फॉर स्टडीच्या अकाउंट ची नोंदणी करायला लागेल ही नोंदणी तुम्ही मेल, मोबाईल किंवा गुगलचा अकाउंट वापरून करू शकता.
  4. त्यानंतर तुम्ही केव्हीबी स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 या स्कॉलरशिपच्या एप्लीकेशन फॉर्म पेजवर जाल तिथे गेल्यानंतर स्टार्ट अप्लिकेशन या बटनाला दाबून तुम्हाला अर्ज भरण्याचा प्रक्रिया सुरू करावी लागेल.
  5. सर्व माहिती नीट भरून विचारलेल्या आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला त्यामध्ये अपलोड करायच्या आहेत.
    त्यानंतर कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहेत.
  6. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अटी व शर्ती या बटनाला क्लिक करून प्रीविव् बटनाला क्लिक करायचं आहे प्रीविव् या बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्ही भरलेला अर्ज व्यवस्थित रित्या दिसेल हा अर्ज तुम्ही नीट भरला की नाही याची खात्री करावी.
  7. आणि त्यानंतर सबमिट या बटनाला क्लिक करावे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.या शिष्यवृत्ती अंतर्गत किती रक्कम दिल्या जाते?

Ans : केव्हीबी स्कॉलरशिप 2024-25 या प्रोग्राम अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला एक लाखापर्यंतचा आर्थिक सहाय्य दिले जाते.

2.या शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा?

Ans : या शिष्यवृत्तीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे वर त्याविषयीची संपूर्ण माहिती अर्ज ची लिंक वर दिलेली आहे.

3.मी खाजगी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून या शिष्यवृत्तीसाठी पात्र राहील का नाही?

Ans : फक्त सरकारी व अनुदानित शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थीची पात्र असतील.

4.ही शिष्यवृत्ती फक्त एकदाच मिळेल का?

Ans : नाही, शिष्यवृत्ती जो तुम्ही जोपर्यंत शिक्षण चालू आहे तोपर्यंत दरवर्षाला एक लाख याप्रमाणे दिल्या जाईल ही शिष्यवृत्ती रिन्यू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अकाउंट लॉगिन करून चेक करावे लागेल संपूर्ण माहिती भरल्यानंतर या शिष्यवृत्तीसाठी तुम्ही अर्ज करू शकता, त्यानंतर तुम्हाला ते रक्कम बॅंक अकाउंट ला दिली जाते

5.शिष्यवृत्तीची निवड प्रक्रिया कशी असेल?

Ans : या शिष्यवृत्ती मध्ये अर्ज केलेला अर्जदाराची मेरिट लिस्ट नुसार व फायनान्शिअल बॅकग्राऊंड तपासल्यानंतर निवड केल्या जाईल त्या अगोदरचे त्या विद्यार्थ्यांचे मिळालेले गुण सुद्धा या ठिकाणी गृहीत धरले जातील.

6.किती रक्कम मिळते?

Ans : या शिष्यवृत्ती अंतर्गत दरवर्षी निवड झालेल्या विद्यार्थ्याला एक लाखापर्यंत अर्थसहाय्य पुरवल्या जाते.

Leave a Comment