Infosys Scholarship 2024 : इन्फोसिस फाउंडेशन मार्फत विद्यार्थिनींना दरवर्षी 1,00,000 रुपयांची शिष्यवृत्ती; सोप्या पद्धतीने करा अर्ज

Infosys Scholarship 2024 : इन्फोसिस फाउंडेशन तर्फे विद्यार्थिनींना भारतामध्ये पदवीचे शिक्षण घेण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य पुरवले जाते, विद्यार्थ्यांनी सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग किंवा मॅथेमॅटिक्स मध्ये ऍडमिशन घेतलेल्या किंवा मेडिकल सायन्स, डेंटल सर्जरी, बॅचलर ऑफ फार्मसी या पदवीसाठी सुद्धा ही स्कॉलरशिप देण्यात येते.

या शिष्यवृत्तीची रक्कम दरवर्षी एक लाख रुपये एवढी असणार आहे. यामध्ये ट्युशन फीज, राहण्याचा खर्च व इतर शैक्षणिक खर्चाचा समावेश असेल. इन्फोसिस फाउंडेशन ची स्थापना 1996 साली झाली व रुरल डेव्हलपमेंट, इन्स्टिट्यूट अँड डिझास्टर साठी कार्य करते.

इन्फोसिस फाउंडेशन त्यांच्या कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत फाउंडेशन इन्फोसिस स्टेम स्टार स्कॉलरशिप प्रोग्रॅम 2024-25 हे इनिशिएटिव्ह घेण्यात आला आहे.

शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता

  • अर्जदार ही महिला असावी व भारतात वास्तव्यास असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने बीटेक, एमबीबीएस, बी फार्म, बीडीएस, बी टेक, एम टेक या पदवीधर अभ्यासक्रमासाठी पहिल्या वर्षाला नोंदणी केलेली असावी व हि नोंदणी NIRF रँकिंगच्या कॉलेजमध्ये असणे आवश्यक आहे (एन आय आर एफ रँकिंगच्या कॉलेजची यादी अर्ज भरते वेळेस तुम्हाला पाहायला मिळेल.
  • NIRF रँकिंग मध्ये समाविष्ट असलेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेल्या असावे व विद्यार्थिनीने बारावी पूर्ण केलेली असावी.
  • अर्जदारांचे एकत्रित कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे किंवा आठ लाख रुपये पर्यंत असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने शैक्षणिक खर्चासाठी या अगोदर कोणतीही शिष्यवृत्ती घेतलेले नसावी.

शिष्यवृत्ती रिन्यू करण्यासाठी पात्रता

  • शिष्यवृत्ती रिन्यू करण्यासाठी काही पात्रता दिलेलय आहेत खालील प्रमाणे विद्यार्थ्याने अभ्यासक्रमाच्या वर्षाला CGPA ७ चा असणे गरजेचे आहे व विद्यार्थिनीने ज्या कोर्समध्ये प्रवेश घेतलेला आहे ते कोर्स पूर्णपणे पास होणे आवश्यक आहे.
  • हि शिष्यवृत्तीच्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांनीला दरवर्षी एक लाख रुपये एवढे शिष्यवृत्ती देण्यात येईल. यामध्ये ट्युशन फीज, राहण्याचा खर्च, स्टडी मटेरियलचा खर्च इत्यादींचा समावेश असेल.
  • हे शिष्यवृत्ती चार वर्षं साठी असून दरवर्षी एक लाख याप्रमाणे चार लाख रुपये शिष्यवृत्ती देण्यात येईल.
  • फी भरल्याच्या सर्व पावत्या तुम्हाला जमा करावे लागतील.
  • प्रत्येक एमबीबीएस किंवा मास्टर डिग्री साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना चार वर्ष, पाच वर्ष अनुक्रमे शिष्यवृत्ती देण्यात येईल. त्यासाठी वर नमूद केलेली आवश्यक पात्रता धारण करणे आवश्यक असेल.

आवश्यक कागदपत्रे

  1. अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटोग्राफ
  2. इयत्ता बारावीचे मार्कशीट
  3. JEE , NEET , CET चे स्कोर कार्ड जे विद्यार्थी एमबीबीएस किंवा बीडीएस मध्ये प्रवेश घेत असतील त्यांच्यासाठी.
  4. शासनाचे ओळखपत्र यामध्ये (आधार कार्ड, वोटर आयडी कार्डचा समावेश असेल)
  5. प्रवेश घेतल्याचा पुरावा (फी भरल्याची पावती, प्रवेश पत्र किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट)
  6. उत्पन्नाचा पुरावा (अर्जदाराच्या कुटुंबाच्या उत्पन्न वर दिल्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे यासाठी उत्पन्नाचा पुरावा म्हणून सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेले उत्पन्नाचे दाखले, बीपीएल किंवा त्याच्याशी समकक्ष कार्ड किंवा आयुष्मान भारत कार्ड स्वीकारल्या जाईल)
  7. बँक अकाउंट डिटेल्स अर्जदाराचे (ज्यामध्ये बँक पासबुक किंवा कॅन्सल चेकचा समावेश करू शकता)
अर्ज कसा करावा (Infosys Foundation Scholarship 2024)
  1. या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे सर्वप्रथम तुम्ही शिष्यवृत्ती च्या https://www.buddy4study.com/page/infosys-stem-stars-scholarship या लिंक वर गेल्यावर अप्लाय नाऊ या बटनाला क्लिक करायचं आहे.
  2. त्यानंतर बडी फर्स्ट स्टडी च्या अकाउंट लॉगिन करायचे आहे जर लॉगिन नसेल तर सर्वप्रथम नोंदणी करायचे आहे ही नोंदणी मोबाईल, ईमेल आयडी किंवा जीमेल अकाउंट वापरून तुम्ही नोंदणी करू शकता.
  3. त्यानंतर लॉगिन करायचा आहे लॉगिन केल्यावर एप्लीकेशन फॉर्म पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला इन्फोसिस फाउंडेशन स्टीम स्टार स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 यांचा एप्लीकेशन फॉर्म पेज ओपन करायचं आहे.
  4. तिथे तुम्हाला स्टार्ट अप्लिकेशन या बटनाला क्लिक करायचा आहे आणि अप्लिकेशन भरण्याची प्रोसेस चालू करायचे आहे. आवश्यक ती माहिती तुम्हाला अर्जामध्ये भरायची आहे.
  5. विचारलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहेत.
  6. सर्व भरल्यानंतर अटी व शर्ती एक्सेप्ट करायच्या आहेत आणि प्रीविव् बटनाला क्लिक करायचं आहे.
  7. प्रीविव् बटनाला क्लिक करून भरलेले सर्व माहिती तपासायची आहे सर्व माहिती व्यवस्थित असल्यास सबमिट या बटनाला क्लिक करून अर्ज सबमिट करायचा आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.मी बीटेक च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला असून मी पुरुष उमेदवार आहे अर्ज करू शकतो का?

Ans : नाही, हे शिष्यवृत्ती फक्त महिला अर्जदारांसाठी/महिला विद्यार्थ्यांसाठीच राहणार आहे.

2.मी डिस्टन्स लर्निंग मध्ये STEM कोर्समध्ये प्रवेश घेतला आहे, मी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो का?

Ans : नाही, हि शिष्यवृत्ती फक्त फुल टाईम रेगुलर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस साठी आहे.

3.मला ही शिष्यवृत्ती सर्व वर्षासाठी मिळेल का?

Ans : हो, ही शिष्यवृत्ती तुम्हाला चार किंवा पाच वर्षासाठी म्हणजे जेवढे वर्ष अभ्यासक्रम आहे तेवढे सर्व वर्षाला दरवर्षी एक लाख याप्रमाणे मिळेल यासाठी शिष्यवृत्ती रिन्यू करावे लागेल त्याची पात्रता वर दिलेली आहे त्या पात्रतेमध्ये तुम्ही बसणे आवश्यक राहील.

4.या शिष्यवृत्तीच्या रक्कमेचा वापर मी कुठे करू शकते?

Ans : या रक्कमेचा वापर तुम्ही कॉलेज खर्च, राहण्याचा खर्च, स्टडी मटेरियलचा खर्च व इतर शैक्षणिक खर्चासाठी करू शकता.

Leave a Comment