HDFC Bank Parivartan ECSS Scholarship : एचडीएफसी बँकेमार्फत पहिली ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 75000 रुपयांची शिष्यवृत्ती; पहा सविस्तर माहिती

HDFC Bank Parivartan ECSS Scholarship : शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना पैशाच्या भरपूर अडचणी येत असतात मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण घेण्यासाठी लागणारा पैसा मिळत नाही. दहावीपर्यंत कसेतरी शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या निधी घरून मिळण्याची शक्यता खूपच कमी असते.

गरीब होतकरू विद्यार्थ्यांना सरकारतर्फे या सोबतच इतर संस्थेमार्फत चांगल्या प्रकारची मदत मिळू शकते विविध क्षेत्रात शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना जवळपास 75 हजारापर्यंत शिष्यवृत्ती दिल्या जाते ही शिष्यवृत्ती भारतातील नामांकित असलेली बँक एचडीएफसी मार्फत दिल्या जाते.

एचडीएफसी बँक परिवर्तन ईसीएसएस प्रोग्राम अंतर्गत ही शिष्यवृत्ती पहिली ते बारावी, पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांना सुद्धा देण्यात येते या शिष्यवृत्तीसाठी सर्व पात्रता धारक विद्यार्थी अर्ज करू शकतात.

शिष्यवृत्ती चे प्रकार

खालील तीन वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक निधी पुरवण्यात येतो.

  1. एचडीएफसी बँक परिवर्तन पदव्युत्तर शिष्यवृत्ती
  2. एचडीएफसी बँक परिवर्तन अंडरग्रॅज्युएट शिष्यवृत्ती
  3. एचडीएफसी बँक परिवर्तन शालेय शिष्यवृत्ती

शिष्यवृत्तीची रक्कम

पदव्युत्तर उमेदवारासाठी 35000, पदवीची शिक्षण घेत असलेल्या अर्जदारांसाठी 30000 तर पहिली ते बारावी ,डिप्लोमा, आयटीआय किंवा पॉलिटेक्निक मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 15000 एवढी शिष्यवृत्ती एचडीएफसी बँकेमार्फत दिल्या जाते.

आवश्यक पात्रता

  • अर्ज करणारा विद्यार्थी हा पहिले ते बारावी, डिप्लोमा, पॉलिटेक्निक, आयटीआय, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असावा.
  • अर्जदाराने मागील वर्षी कमीत कमी 55% गुण मिळवून पास झालेला असावा.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  • ही शिष्यवृत्ती भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.
  • या ठिकाणी भूकंप, आपत्ती, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी प्राधान्य देण्यात येते.
आवश्यक कागदपत्रे
  1. विद्यार्थ्यांचा फोटो
  2. 2023 24 मधील मार्कशीट
  3. ओळखीचा पुरावा
  4. ज्या संस्थेमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या संस्थेत ची फी भरल्याची पावती.
  5. प्रवेश पत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा ओळखपत्र जोडावे.
  6. अर्जदाराच्या बँकेचे पासबुक किंवा कॅन्सल चेक सोबत जोडावा.
  7. उत्पन्नाचा पुरावा म्हणून ग्रामपंचायत, वार्ड कौन्सिलर किंवा सरपंचाने दिलेला उत्पन्नाचा दाखला किंवा तहसीलदार डीएम/सीओ/एसडीएम यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला किंवा कुटुंबाचे अफेडेविट सुद्धा स्वीकारले जाईल.
  8. दुष्काळग्रस्त भागातून येत असेल तर त्याविषयीचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे, ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी https://www.buddy4study.com/page/hdfc-bank-parivartans-ecss-programme या लिंक वर जाऊन अप्लाय नाऊ (Apply Now) या बटणाला क्लिक करायचा आहे.
  • त्यानंतर आपली नोंदणी करून घ्यायची आहे ही नोंदणी केल्यानंतर एचडीएफसी बँकेच्या शिष्यवृत्तीच्या पोर्टलला तुम्ही जाल तिथे गेल्यानंतर स्टार्ट अप्लिकेशन (Start Application) या बटनाला दाबून अर्ज भरायचा आहे.
  • अर्ज भरते वेळेस आवश्यक ती सर्व माहिती त्यात टाकायची आहे सांगितलेल्या सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायच्या आहेत.
  • डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर संकेतस्थळावर दिलेले सर्व अटी व शर्तीच्या (Terms & Conditions) वाचन करून प्रीव्हीव (Preview) बटनाला क्लिक करायचं आहे.
  • प्रीव्हीव (Preview) मध्ये तुम्ही भरलेला सर्व फॉर्म व्यवस्थित रित्या भरला आहे की नाही हे चेक करायचे आहे आणि त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे.

पैसे कसे मिळतील (HDFC Bank Parivartan ECSS Scholarship)

वर दिल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या तुम्ही अर्ज भरल्यानंतर एचडीएफसी बँक परिवर्तन इसीएसएस प्रोग्राम अंतर्गत जे विद्यार्थी पात्र असतील त्या विद्यार्थ्यांना त्यांनी नमूद केलेल्या बँकेच्या अकाउंट मध्ये लाभ हस्तांतरित केला जाईल.

ही शिष्यवृत्ती एचडीएफसी बँक (HDFC Bank Scholarship 2024) दरवर्षी सर्व विद्यार्थ्यांना देत असते या शिष्यवृत्ती मार्फत एकूण 75 हजाराचे आर्थिक सहाय्य गरीब विद्यार्थ्यांना केले जाते विविध शैक्षणिक उपक्रमासाठी एचडीएफसी बँक हा निधी विद्यार्थ्यांना देते.

यामध्ये पहिली ते सहावी साठी सहावी ते बारावी साठी, डिप्लोमा मध्ये शिकत असल्यास आयटीआय करत असल्यास, पॉलीटेक्निक मध्ये शिकत असल्यास, पदवीधर शिक्षण घेत असल्यास किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असल्यास त्या विद्यार्थ्यांना हा लाभ दिला जातो.

या शिष्यवृत्तीमध्ये दुष्काळग्रस्त, भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांना अधिक प्राधान्य दिले जाते ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक कारणामुळे शिक्षण घेता आले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी एचडीएफसी बँक या माध्यमातून हातभार लावत असते एचडीएफसी बँकेने 2021 पासून शिष्यवृत्तीची सुरुवात केली असून ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देऊन मोलाचं कार्य हे बँक बजावत आहे.

तुम्ही सुद्धा या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर वर लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन ३१ ऑक्टोबर २०२४ 31 डिसेंबर 2024 पूर्वी अर्ज सादर करायचा आहे, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख वाढवली जाऊ शकते परंतु त्याविषयी आणखी कोणतिही अपडेट संकेतस्थळावर उपलब्ध नाही, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करावा व एचडीएफसी बँक देत असलेल्या या शिष्यवृत्तीचा लाभ होतकरू व गरजू विद्यार्थ्यांनी घ्यावा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न?(FAQ’s)

1.या शिष्यवृत्तीचे रक्कम कशा प्रकारे दिली जाते ?

Ans: या शिष्यवृत्तीची रक्कम निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या नमूद केलेल्या बँक अकाउंट वर पाठवली जाते ही दरवर्षी दिली जाते.

2.ही शिष्यवृत्ती सर्व वर्षांसाठी दिली जाते का?

Ans: हो. एचडीएफसी बँक परिवर्तन ईसीएसएस प्रोग्राम हे दरवर्षी दिली जाणारी स्कॉलरशिप आहे एकदा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाल्यानंतर दरवर्षीही स्कॉलरशिप रिन्यू केल्या जाते.

3.कोणत्याही कॉलेजमधील विद्यार्थी अर्ज करू शकता का?

Ans : हो., विद्यार्थ्यांनी शासन मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतील.

Leave a Comment