GSK Scholarship 2024 : ग्लॅक्षोस्मिथक्लाईन फार्मास्युटिकल्स लिमिटेड अंतर्गत दरवर्षी 1,00,000 रुपयाची शिष्यवृत्ती; पहा पात्रता व इतर माहिती

GSK Scholarship 2024 : आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्यासाठी ग्लॅक्षोस्मिथक्लाईन फार्मास्युटिकल्स लिमिटेड अंतर्गत त्यांच्या सीएसआर इनिशिएटिव्ह तर्फे जीएसके स्कॉलर्स प्रोग्राम हे शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येते. हे शिष्यवृत्ती एमबीबीएस मध्ये प्रवेश घेतलेल्या तसेच शासकीय कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे.

या शिष्यवृत्ती अंतर्गत साडेचार वर्षासाठी दरवर्षी एक लाख रुपये एवढे आर्थिक सहाय्य जीएसके मार्फत देण्यात येते, जीएसके फार्मासिटिकल लिमिटेड ही कंपनी जीएसके पी एल सी ची सबसिडीरी कंपनी आहे. भारतामध्ये फार्मासिटिकल उत्पादनामध्ये हि कंपनी अग्रेसर आहे या कंपनी अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना कॉर्पोरेटरी सोशियल रिस्पॉन्सिबिलिटी मार्फत ही शिष्यवृत्ती देण्यात येते.

जीएसके च्या स्किल बिल्डिंग प्रोग्रॅम अंतर्गत सायन्स,टेकनॉलॉजि,इंजिनीरिंग आणि मॅथेमॅटिकस च्या विदयार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरवले जाते, या शिष्यवृत्तीची रक्कम दार वर्षी एक लाख रुपये एवढी आहे व हि रक्कम विविध खर्चासाठी विद्यार्थी वापरू शकणार आहेत.

जीएसके मार्फत देण्यात येणाऱ्या या शिष्यवृत्तीमधून आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या खर्चाची चिंता करायची गरज राहणार नाही, हि शिष्यवृत्ती तुम्हाला मिळावी असे वाटत असेल तर खाली सविस्तर माहिती दिलेली आहे ती वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता

  • अर्जदाराने एमबीबीएस च्या प्रथम वर्षाला कोणत्याही शासकीय कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला असावा.
  • अर्जदाराला बारावी मध्ये कमीत कमी 65 टक्के गुण असावे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न सहा लाखापेक्षा जास्त नसावे.
  • संपूर्ण भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती खुली आहे MMBS मध्ये प्रवेश घेतलेले कोणतेही विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
  • बडी फोर स्टडी आणि जीएसके फार्मच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी ही शिष्यवृत्ती लागू नाही.

शिष्यवृत्तीचे फायदे

या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना दरवर्षी एक लाख रुपये याप्रमाणे साडेचार वर्षाला 4.5 लाख रुपये एवढी रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. ही रक्कम विद्यार्थी शाळेच्या ट्युशन फीस साठी, परीक्षा फी साठी, पुस्तकासाठी, प्रोजेक्ट व सेमिनारसाठी, स्टेशनरी, ऑनलाईन लर्निंग, इंटरनेट डाटा पॅक पेमेंट करण्यासाठी वापरू शकणार आहेत.

आवश्यक कागदपत्रे

  1. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करते वेळेस काही आवश्यक कागदपत्राची पूर्तता करणे गरजेचे आहे, हि कागदपत्र ऑनलाईन स्कॅन करून अर्ज भरतेवेळेस अपलोड करावे लागतील, या कागदपत्रांमध्ये खालील कागदपत्रांचा समावेश आहे.
  2. शासकीय ओळखपत्र (यामध्ये आधार कार्ड, वोटिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्डचा समावेश असेल)
  3. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा (फी भरल्याची पावती, प्रवेश पत्र, इन्स्टिट्यूटचे आयडी कार्ड व बोनाफाईड सर्टिफिकेट)
  4. कुटुंबाच्या उत्पन्नाचा पुरावा
  5. मागच्या वर्षीचे मार्कशीट
  6. अर्जदाराच्या बँकेच्या डिटेल्स(बँकेचे पासबुक किंवा कॅन्सल चेक)
  7. अलीकडच्या काळातील फोटोग्राफ

अर्ज कसा करावा (GSK Scholarship 2024)

  1. या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे बडी4स्टडी च्या https://www.buddy4study.com/page/gsk-scholars-programme या लिंक वर गेल्यानंतर तुम्ही अप्लाय नाऊ (Apply Now) हे बटन दिसेल या बटणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  2. त्यानंतर बडी4स्टडी लॉगिन करायचे आहेत जर अगोदर नोंदणी (Registration) केलेली नसेल तर सर्वप्रथम नोंदणी करून नंतर लॉगिन करायचा आहे.
  3. त्यानंतर एप्लीकेशन फॉर्म (Application Form) पेज ओपन होईल तिथे तुम्हाला जीएसके स्कॉलर प्रोग्राम च्या एप्लीकेशन फॉर्म पेजवर जाल.
  4. तिथे गेल्यानंतर स्टार्ट अप्लिकेशन (Start Application) बटनाला क्लिक करून अर्जाची प्रक्रिया सुरू करायची आहे आवश्यक ते सर्व माहिती ऑनलाईन अर्जामध्ये भरायचे आहे.
  5. सांगितलेली आवश्यक ती कागदपत्र अपलोड करायचे आहेत त्यानंतर अटी व शर्ती (Terms & Conditions) एक्सेप्ट करून अर्जाचा प्रीविव् (Preview) पाहायचा आहे.
  6. अर्जाचा प्रीविव् (Preview) पाहिल्यानंतर माहिती सर्व बरोबर भरली आहे की नाही याची चाचपणी करायची आहे आणि अर्ज सबमिट करायचा आहे, सबमिट (Submit) या बटनाला क्लिक करून अर्जाची प्रोसेस पूर्ण करायची आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.या शिष्यवृत्तीची निवड प्रक्रिया कशी असेल?

Ans : या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती,सामाजिक परिस्थिती व शैक्षणिक परिस्थितीची तपासणी केली जाईल, त्यानंतर उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातील, कागदपत्राचे वेरिफिकेशन केल्या जाईल व टेलिफोन वर इंटरव्यू घेऊन उमेदवाराची निवड केली जाईल.

2.स्कॉलरशिप ची रक्कम कशी मिळेल?

Ans : स्कॉलरशिप ची रक्कम ही थेट अर्जदाराच्या खात्यावर देण्यात येईल.

3.ही रक्कम दरवर्षी मिळेल का?

Ans : दरवर्षी ही रक्कम विद्यार्थ्यांना मिळणार आहे, दरवर्षी एक लाख रुपये याप्रमाणे सर्व वर्षासाठी ही रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात येईल.

4.मी बीडीएस प्रोग्राम मध्ये प्रवेश घेतलेला आहे मी अर्ज करू शकतो का?

Ans : नाही, ही कॉलरशिप फक्त एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच उपलब्ध आहे.

5.माझ्याकडे फी भरल्याचा कोणताही पुरावा नाही मी अर्ज करू शकतो का?

Ans : फी भरल्याचा कोणताही पुरावा नसेल तर इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटी कडून त्याबाबतचे पत्र तुम्हाला घ्यावे लागेल,त्यावर पत्रावर तुम्ही फी भरल्याची सर्व माहिती असणे आवश्यक आहे.

Leave a Comment