10 वी पासवर सीजीएसटी भवन मुंबई येथे भरती; पगार 56900 रुपये मिळेल | CGST Mumbai Bharti 2025

CGST Mumbai Bharti 2025 : सीजीएसटी व सेंट्रल एक्ससाइज मुंबई विभागांतर्गत दहावी पासवर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. मुंबई झोनसाठी ही भरती राबविण्यात येत असून यामध्ये एकूण 15 रिक्त जागांचा समावेश आहे.

इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि खाली दिलेल्या लिंक करून व्यवस्थित जाहिरात वाचावी आणि त्यानंतर आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रासह 31 जुलै 2025 पूर्वी अर्ज सादर करावा. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. पोस्टाने कुरियरने अर्ज पाठवू शकता त्यासाठी लवकरात लवकर अर्ज भरून पाठवावा जेणेकरून अर्ज वेळेवर पोहचेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • हवालदार – 15 जागा

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

अर्ज करणारा उमेदवार हा कमीत कमी दहावी पास किंवा समकक्ष अर्हता धारण केलेला असावा, उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. 31 जुलै 2025 रोजी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे जास्तीत जास्त 27 वर्ष असावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 03 वर्ष तर अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारासाठी 05 वर्ष शिथिलता देण्यात आलेली आहे.

अर्ज पद्धती

इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खालील लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करावी तसेच अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा आणि पात्रता धारण करत असल्यास जॉईंट कमिशनर, सीसीए सीजीएसटी अँड सेंटर एक्साईज, जीएसटी भवन, ११५, एम के रोड, चर्चगेट, मुंबई – 400020 या ठिकाणी कुरिअरद्वारे किंवा पोस्टाने दिनांक 31 जुलै 2025 पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावे.

शारीरिक क्षमता (CGST Mumbai Bharti 2025)

पुरुष : उमेदवाराची उंची कमीत कमी 157.5 सेंटीमीटर असावी यामध्ये आसामी, गोरखा व एसटीच्या उमेदवारांना पाच सेंटीमीटर ची सूट देण्यात येईल तसेच पुरुष उमेदवाराची छाती 81 cm असावी व पूर्ण फुगवलेली छाती हे 86 मीटर असणे आवश्यक आहे. पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर चालण्याची चाचणी असेल ते पंधरा मिनिटात पार करायचे आहे तर सायकलिंग 08 किलोमीटर तुम्हाला अर्ध्या तासात पार करावे लागेल.

महिला : उमेदवारांसाठी उंची 152 सेंटीमीटर राहील तर वजन 48 किलोग्राम असणे आवश्यक आहे महिलासाठी 1000 मीटर चालणे 20 मिनिटात पार करायचा आहे तर सायकलिंग 03 किलोमीटर 25 मिनिटात पूर्ण करायचे आहे.

आवश्यक कागदपत्रे

व्हाट्सअप ग्रुप फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

उमेदवाराने अर्जासोबत दहावीचे गुणपत्रक तसेच प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा, आधार कार्ड किंवा पासपोर्ट सोबत जोडावा. शैक्षणिक अर्हतेचे सर्व कागदपत्र सोबत जोडावेत. जातीचे प्रमाणपत्र, खेळामध्ये प्राविण्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, सध्या काम करत असल्यास एम्पलोयर कडून NOC घेणे आवश्यक आहे.

मासिक वेतन

या पदा भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला लेवल एक प्रमाणे कमीत कमी 18000 ते 56900 रुपये एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे. CGST Recruitment 2025

तुम्ही या पदभरतीसाठी इच्छुक असाल तर खाली दिलेली जाहिरात व अर्जाचा नमुना व्यवस्थित भरून वर दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे. सविस्तर माहितीसाठी https://cgst.clientsdemo.in/ या अधिकृत संकेतस्थळ भेट द्यावी. या पदभरती साठी कोणत्याही प्रकारच्या अर्ज शुल्काचा उल्लेख जाहिरातीमध्ये केलेला नसून सर्व शहानिशा करून अर्जाचे शुल्क भरावे, अर्जाच्या शुल्का व्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क किंवा आर्थिक देवाण-घेवाण करू नये.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

Leave a Comment