CGFSEL Education Loan : नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट कंपनी लिमिटेड एनसीजीटीसी अंतर्गत एज्युकेशन लोन स्कीम हा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयामार्फत ही योजना राबवली जाते. भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर शिक्षणासाठी व उच्च शिक्षणासाठी सात लाख पन्नास हजार रुपयांचा आर्थिक सहाय्य या योजनेमार्फत दिल्या जाते.
या योजनेमार्फत दोन टक्के या बेस रेट वर हे कर्ज उपलब्ध आहे बेस रेट म्हणजे बँकेमध्ये लागू असणारा कमीत कमी व्याजदर आहे, हा दर आरबीआय च्या गाईडलाईनुसार कर्ज देण्यासाठी सेट केलेला असतो.
या कर्जसाठी काही पात्रता, अटी तसेच नियम सुद्धा आहेत या नियमाचं तुम्हाला पूर्णपणे पालन कराव लागेल तरच तुम्हाला हे कमी व्याज दराचं कर्ज उपलब्ध होते यासाठी कोणत्याही प्रकारची डेडलाईन नाही तुम्ही कधीही या कर्जासाठी अर्ज करू शकता जर तुम्ही खाली दिलेल्या पात्रता पूर्ण करत असाल तर.
कर्जासाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
- अर्जदाराने कमीत कमी बारावी किंवा त्याच्या समकक्ष अर्हता धारण केलेली असावी.
- अर्जदाराने उच्च शिक्षणासाठी मान्यताप्राप्त संस्थेमध्ये भारतात किंवा भारताच्या बाहेर प्रवेश घेतलेला असावा.
- विद्यार्थ्यांची निवड कोणत्यातरी इंटर्न्स टेस्ट द्वारे किंवा मेरिट लिस्ट द्वारे झालेली असणे आवश्यक आहे.
- ज्या विद्यार्थ्यांची निवड मेरिट लिस्ट किंवा इंटर्न्स टेस्ट द्वारे झाले नसेल किंवा ही टेस्ट लागू नसेल अश्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे मागील वर्षाचे गुण ग्राह्य धरले जातील.
- कर्ज घेणाऱ्या अर्जदारावर या अगोदरचे कोणतेही कर्ज देय नसावे.
- चार लाखापर्यंत या कर्जासाठी कोणतीहि मार्जिन गरजेची नाही.
- चार लाखाच्या वर कर्ज घेत असाल तर पाच टक्के मार्जिन राहील व भारताच्या बाहेर शिक्षण घेत असाल तर हे मार्जिन 15 टक्के राहणार आहे.
इतर आवश्यक पात्रता
- वर दिलेल्या पात्रता व्यतिरिक्त इतर काही आवश्यक पात्रता क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम साठी धारण करणे आवश्यक आहे त्या खालील प्रमाणे –
- भारतामध्ये शिक्षण घेत असाल तर भारतामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने मान्यता प्राप्त विद्यापीठातून प्रवेश घेतलेला असावा.
- हे विद्यापीठ किंवा कॉलेज यूजीसी ,गव्हर्मेंट, एआयसीटीइ, आयसीएमआर इत्यादी संस्थेकडून मान्यता मिळवलेली असावी व या कॉलेजमध्ये तुम्ही पदवी, पदव्युत्तर किंवा पदविकेसाठी प्रवेश घेतलेला असावा.
- किंवा तुम्ही कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया,चार्ट्रेंड अकाउंटंट किंवा चार्टर्ड फायनान्स अनालिस्ट या कोर्ससाठी प्रवेश घेतलेला असावा
- किंवा आयआयएम, आयआयटी, आयआयएससी, एनआयआरएफ अश्या नामांकित कॉलेजेस मध्ये प्रवेश घेतलेला असावा किंवा रेगुलर पदवी, डिप्लोमा तुम्ही एरोनॉटिकल पायलट, ट्रेनिंग, नर्सिंग किंवा इतर विभागात करत असेल कर्ज मिळू शकते.
- तसेच फॉरेनच्या युनिव्हर्सिटीने मान्यता दिलेल्या भारतातील कोर्सेस मध्ये विद्यार्थी प्रवेश घेत असल्यास असे विद्यार्थी सुद्धा यासाठी पात्र असतील.
- भारताबाहेर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, पदवीच्या शिक्षणासाठी भारताबाहेर तुम्ही शिक्षण घेत असाल तर भारताबाहेर शिक्षण देणाऱ्या नामांकित विद्यापीठांमध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला असावा.
- हा प्रवेश तुम्ही पदव्युत्तर शिक्षणासाठी घेतलेला असावा यामध्ये MCS MBA MS किंवा त्याच्या समकक्ष डिग्री साठी प्रवेश घेतलेला असावा.
- या व्यतिरिक्त भारतामधील विद्यापीठाने मान्यता दिलेले भारताबाहेरील प्रशिक्षणासाठी सुद्धा हे कर्ज मिळू शकत वर नमूद केलेल्या सर्व कोर्सेस मध्ये 100% कर्ज मिळेल याची खात्री राहणार नाही.
- हे सर्व कर्ज प्रकरण बँक चेक करून नंतरच याला मान्यता देऊ शकते हे कर्ज नाकारण्याचं किंवा मान्यता देण्याचे सर्वाधिकार या संस्थेकडे राखून ठेवलेले आहेत.
या कर्जाचे फायदे
- हे कर्ज घेतल्यानंतर याचा व्याजदर दोन टोक्यापासून चालू होतो व चार लाखापर्यंत या कर्जासाठी कोणते मार्जिन नाही.
- चार लाखाच्या वर तुम्ही कर्ज घेत असाल तर भारतामध्ये 5 टक्के व भारताच्या बाहेर 15 टक्के अशी मार्जिन बँक ठेवते, म्हणजे तुम्ही जर चार लाख कर्ज घेत असाल तर वीस हजार रुपये एवढी रक्कम तुम्हाला त्यामध्ये भरणे आवश्यक असेल.
कर्जाचा वापर
- या कर्जाचा वापर तुम्ही ट्युशन फीज, होस्टेल, एक्झामिनेशन, लायब्ररी किंवा लोबोरेटरी च्या खर्चासाठी करू शकता.
- भारताबाहेर बाहेरचा शिक्षण घेत असाल तर ट्रॅव्हल किंवा ट्रॅव्हल्स खर्च भरण्यासाठी करू शकता.
- इन्शुरन्स प्रीमियम भरायचे असेल तर त्यासाठी वापरू शकता.
- डिपॉझिट, बिल्डिंग फंड्स, नापरतावा डिपॉझिट साठी कर्जचा वापर करू शकता.
- पुस्तके, वस्तू खरेदी करण्यासाठी याचा वापर करू शकता.
- कॅम्पुटर/लॅपटॉप खरेदी करण्यासाठी तुम्ही या कर्जाचा वापर करू शकणार आहात.
नियम व अटी
चार लाखाच्या आत कर्ज घेत असाल तर :
- पालक सहकर्जदार असावेत.
- कोणत्याही तारणाची आवश्यकता नाही.
- गॅरेंटरची आवश्यकता नाही
चार लाखापेक्षा जास्त आणि साडेसातला पेक्षा कमी कर्ज घेत असाल तर :
- पालक सहकर्जदार असावेत.
- तारण व गॅरेंटर ची आवश्यकता राहील.
- काही प्रकरणांमध्ये बँक तारण किंवा गॅरेंटर मागणी न करता कर्ज देऊ शकतील.
कर्ज साडेसात लाखापेक्षा जास्त असेल तर :
- पालक सहकर्जदार असावेत
- कोणतीही फिक्स असेल तुम्हाला तारण म्हणून बँकेकडे ठेवावि लागेल व विद्यार्थ्यांचे भविष्यामध्ये येणारे पेमेंट इन्स्टॉलमेंट साठी द्यावे लागतील.
- जे वस्तू तारण ठेवणार आहेत त्या वस्तूमध्ये लँड, बिल्डिंग, गव्हर्मेंट सेक्युरिटीज, बॉण्ड्स, इन्शुरन्स पॉलिसीज, गोल्ड, म्युच्युअल फंड इत्यादी स्वीकारले जाते.
- कर्ज फेडण्याचा कालावधी शिक्षण झाल्यानंतर एका वर्षांनी कर्ज परतफेड करावे लागेल जास्तीत जास्त हे कर्ज परतफेड साठी तुम्ही शिक्षण नंतर दोन वर्षापर्यंत वेळ मागवू शकता.
- हे कर्ज परतफेड करण्यासाठी तुम्हाला दहा वर्षाचा कालावधी दिला जातो 7.5 लाखापेक्षा जास्त कर्ज घेत असाल तर कालावधी 15 वर्षाचा राहील.
- हे कर्ज तुम्हाला इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट(EMI) मध्ये देणं आवश्यक राहणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
हे कर्ज प्रकरण करताना तुम्ही खाली दिलेल्या फॉर्म व्यवस्थित रित्या भरायचा आहे व त्या संदर्भातील सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत. या कागदपत्रांमध्ये
- सरकारी ओळखपत्र
- पत्याचा पुरावा
- मागील वर्षाचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र
- सहकर्जदाराचे ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा
- उत्पन्नाचा पुरावा (यामध्ये उत्पन्नाचा दाखला, सॅलरी स्लिप किंवा फॉर्म 16A देऊ शकता)
- बँकेचा तपशील (यामध्ये कॅन्सल चेक किंवा पासबुक जोडू शकता)
अर्ज कसा करावा
- अर्ज करण्यासाठी तुम्हाला बडी4स्टडीच्या https://www.buddy4study.com/page/cgfsel-education-loan-scheme या लिंक वर जायचं आहे. तिथे गेल्यानंतर अप्लाय नाऊ (Apply Now) या बटणाला क्लिक करायचा आहे.
- जर नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी करून लॉगिन करायचा आहे लॉगिन केल्यानंतर अप्लाय नाऊ (Apply Now) या बटनाला क्लिक करायचं आहे.
- आवश्यक ते सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे व ते डिटेल्स तुम्हाला सबमिट करायची आहे, डिटेल सबमिट केल्यानंतर स्टुडन्ट लॉगिन या टॅबवर जायचा आहे.
- तिथं ईमेल आयडी, पासवर्ड आणि कॅपचा टाकून लॉगिन करायचा आहे.
- लॉगिन केल्यानंतर या अर्जामध्ये तुम्हाला तुमचं नाव, ईमेल आयडी, फोन नंबर आणि इतर महत्त्वाची कागदपत्र जोडायचे आहेत व हे अर्ज सबमिट करायचा आहे.
- अर्ज सबमिट केल्यानंतर भविष्यातील रेफरन्स साठी जपून ठेवायचा आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1.या कर्जासाठी कशाप्रकारे अर्ज करू शकतो?
Ans : या कर्जासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा बँकेमध्ये जाऊन अर्ज सबमिट करू शकता यासाठी तुम्हाला बँकेमधून अर्ज उपलब्ध केला जाईल.
2.मी डिस्टन्स लर्निंग साठी या कर्जाचा वापर करू शकतो का?
Ans : हो, हे कर्ज ऑनलाईन कोर्सेस साठी उपलब्ध आहे हे शिक्षण तुम्ही मान्यता प्राप्त विद्यापीठातून घेणे गरजेचे आहे.
3.या कर्जासाठी कोणती वयोमर्यादा आहे का?
Ans : नाही, या कर्जासाठी कोणती वयोमर्यादा नाही परंतु बँकेने वर दिलेली पात्रता धारण करणे आवश्यक आहे.
4.या कर्जाची परतफेड मला किती वर्षात करायला लागते?
Ans : सात लाखापेक्षा कमी कर्ज घेत असाल तर दहा वर्ष व सात लाखापेक्षा जास्त कर्ज घेत असाल तर पंधरा वर्षांमध्ये कर्ज तुम्हाला फेडायचे असते.
5.कोणत्या बँका हे कर्ज देऊ करतात?
Ans : ग्रामीण बँका, राष्ट्रीयीकृत बँका व प्रायव्हेट सेक्टरमधील काही बँकांच्या यामध्ये समावेश आहे हे बँकेची यादी तुम्ही खालील लिंक वरून तपासू शकता.