BYPL SASHAKT Scholarship 2024 : पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 30000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते, ऑनलाईन अर्ज करावा लागेल

BYPL SASHAKT Scholarship 2024 : बीएसईएस यमुना पावर लिमिटेड अंतर्गत बी.वाय.पी.एल. सशक्त स्कॉलरशिप प्रोग्राम 2024 राबवण्यात येत आहे, शिक्षणासाठी ज्या विद्यार्थी/विद्यार्थिनीने पदवीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे. त्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.

जे विद्यार्थी पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत त्या विद्यार्थ्यांना तीस हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्य दिल्या जात आहे, बीएसईएस यमुना पावर लिमिटेड ही पावर डिस्ट्रीब्यूशन कंपनी आहे. ही कंपनी दिल्लीमध्ये कार्यरत आहे.

त्यांच्या कार्पोरेट सोशियल रेस्पोंसिबिलिटी अंतर्गत ते ही स्कॉलरशिप राबवत आहेत, यामध्ये विविध अभ्यासक्रमासाठी पदवीच्या शेवटच्या वर्षाला ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांना हे लाभ देण्यात येत आहेत.

या शिष्यवृत्तीसाठी काही पात्रता, अटी व शर्ती दिलेल्या आहेत त्याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे व इतर महत्त्वाची माहिती सुद्धा या लेखांमध्ये दिलेली आहे, या शिष्यवृत्तीसाठी कश्या पद्धतीने अर्ज करावा.

काय पात्रता असेल ये तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे, तुम्ही सुद्धा त्या पात्रतामध्ये बसत असाल तर या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करू शकता.अर्ज करण्यागोदर हा लेख सविस्तर वाचावा आणि त्यानंतर अर्ज सादर करावा.

या शिष्यवृत्तीसाठी पात्रता

  • सर्व भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती खुली आहे, पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकता.
  • या शिष्यवृत्ती मध्ये अर्ज करणारा विद्यार्थी हा पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिकत असावा व तो मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असावा.
  • विद्यार्थ्यांनी मागील वर्षात कमीत कमी 55% गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा जास्त नसावे, उत्पन्न जास्त असल्यास तो विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र नसेल.
  • बी वाय पी एल आणि बडी फोर स्टडी च्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही.
  • या शिष्यवृत्तीमध्ये नर्सिंग,पॅरा मेडिकल, बीएड, इंजीनियरिंग,सीए इत्यादी कोर्सेस करण्याऱ्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
  • ही शिष्यवृत्ती 30 हजार रुपयापर्यंत मिळणार आहे,या शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थी ट्युशन फी, फूड, हॉस्टेल फी, इंटरनेट, बुक स्टेशनरी, ऑनलाईन लर्निंग इत्यादीसाठी वापरू शकतात.

आवश्यक कागदपत्रे

या शिष्यवृत्तीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल ऑनलाइन अर्ज सादर करते वेळेस काही कागदपत्रे सुद्धा अपलोड करावी लागणार आहेत त्याची माहिती खालील प्रमाणे

  1. अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो
  2. सरकारी ओळखीचा पुरावा (जसे कि.आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना इत्यादी)
  3. कुटुंबाचा उत्पन्नाचा पुरावा (ज्यामध्ये सॅलरी स्लिप, फॉर्म १६, सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला, किंवा इन्कम टॅक्स रिटर्न अपलोड करू शकता)
  4. मागच्या वर्षाच्या मार्कशीट तसेच दहावी व बारावीच्या मार्कशीट
  5. शैक्षणिक खर्चाचा तपशील (ज्यामध्ये पुस्तके किंवा इतर ऑनलाईन गोष्टीसाठी केलेल्या खर्चाची माहिती असावी)
  6. सध्या शिकत असलेल्या कॉलेजची फी भरल्याची पावती
  7. अर्जदाराच्या बँकेची माहिती (ज्यामध्ये अर्जदाराच्या बँकेचा कॅन्सल चेक किंवा पासबुक देऊ शकता)

अर्ज कसा करावा (BYPL SASHAKT Scholarship 2024)

  1. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला बडी फोर स्टडीच्या https://www.buddy4study.com/page/bypl-sashakt-scholarship या लिंक वर किंवा बी वाय पी एल च्या https://www.bsesdelhi.com/web/bypl/events या लिंक वर जाऊन अर्ज भरू शकता.
  2. बडी फॉर स्टडीच्या वर दिलेल्या लिंक वर गेल्यानंतर अप्लाय नाऊ या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  3. बडी फोर स्टडी चे अकाउंट बनवलेले असल्यास लॉगिन करायचे आहे, अकाउंट बनवलेले नसल्यास नोंदणी करावी लागेल, ही नोंदणी तुम्ही मोबाईल नंबर, ईमेल किंवा जीमेल टाकून करू शकता.
  4. त्यानंतर तुम्ही शिष्यवृत्तीचे पेजवर जाल तिथे तुम्हाला स्टार्ट अप्लिकेशन या बटनाला क्लिक करायच आहे व सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे.
  5. विचारलेले सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहे.
  6. त्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या अटी व शर्ती मान्य करून अर्जाचा प्रीविव् बघायचा आहे.
  7. सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरली की नाही याची तपासणी करायची आहे आणि सर्व माहिती व्यवस्थित भरलेली असल्यास सबमिट या बटनाला क्लिक करून अर्ज पूर्ण करायचा आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.या शिष्यवृत्ती मध्ये निवड प्रक्रिया कशी असेल?

Ans : या शिष्यवृत्ती मध्ये अर्ज केलेल्या अर्जदाराची आर्थिक परिस्थिती तपासली जाईल, शैक्षणिक माहिती पहिली जाईल व टेलिफोनिक इंटरव्यू घेऊन अर्जदाराची निवड केल्या जाईल.

2.या शिष्यवृत्ती चा निकाल कधी लागतो

Ans : या शिष्यवृत्ती चा निकाल जानेवारी 2025 मध्ये लागेल, त्यावेळेस निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी सुद्धा प्रकाशित केली जाईल.

3.या शिष्यवृत्तीचे पैसे कसे मिळतील?

Ans : या शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट खात्यावर एकरकमी जमा केली जाईल त्यासाठी विद्यार्थ्याने बँकेचा तपशील व्यवस्थित भराव.

4.ही स्कॉलरशिप प्रत्येक वर्षी मिळेल का?

Ans : नाही, ही स्कॉलरशिप फक्त एकदाच मिळणार आहे त्यानंतर ही स्कॉलरशिप ऑटोमॅटिक रिन्यू केल्या जात नाही.

Leave a Comment