Buddy4Study Education Loan : बडी4स्टडी अंतर्गत 40 लाखापर्यंत विनातारण शैक्षणिक कर्जाचा पुरवठा केला जातो बडी4स्टडी एज्युकेशन लोन प्रोग्राम अंतर्गत भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर शिक्षण घेण्यासाठी चाळीस लाखापर्यंत विनातारण लोन दिल्या जाते.
बडी4स्टडी भारतातील विविध बँका व नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या अंतर्गत या कर्जाचा पुरवठा करते विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये कोणताही अडथळा येऊ नये व त्यांना पैशाची गरज भासली तेव्हा पैसे उपलब्ध व्हावे त्यासाठी बडी4स्टडी कार्य करत आहे.
बडी फोर स्टडी विविध क्षेत्रातील बँकासोबत नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांसोबत टाय-अप करून विद्यार्थ्यांना कर्जाचा पुरवठा करते याचा व्याजदर सुद्धा 8.1% पासून चालू होत असून विनातारण कर्ज तुम्हाला मिळते, कर्जाचे प्रकरण करते वेळेस तुम्हाला तारण ठेवायचा आहे का नाही हे तुमच्या कोर्सवर आणि कॉलेज च्या रँकिंग वर अवलंबून असणार आहे.
त्यामुळे पालकांनी अर्ज करायच्या अगोदर चौकशी करून अर्ज सादर करावा या कर्जासाठी तुम्ही परतफेडीचा कालावधी स्वतः निवडू शकता, यासोबतच यामध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळणार आहेत. हे कर्ज घेण्यासाठी विविध अटी शर्तीचे पालन तुम्हाला करायला लागते यासोबतच काही आवश्यक पात्रता सुद्धा दिलेल्या आहेत त्या पात्रतांच सुद्धा पालन करणे गरजेचे राहणार आहे.
आवश्यक पात्रता
- पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी भारतात किंवा भारताबाहेर प्रवेश घेतलेला असावा.
- तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे व मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेला असावा.
- ज्या कोर्ससाठी तुम्ही प्रवेश घेत आहात त्या कोर्ससाठी आवश्यक ते शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त असावे व साडेसात लाखापेक्षा उत्पन्न कमी असावे.
- या कर्जासाठी कमीत कमी कर्ज रक्कम एक लाख रुपये असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक कर्जाच्या फायदे
- विनातारण 40 लाखापर्यंत कर्ज (कमीत कमी एक लाखापासून सुरुवात)
- वर्षाला 8.1 टक्के व्याजदर
- जलद गतीने व सोप्या प्रक्रियेमध्ये लोन अकाउंटला जमा होईल.
- दोन करोड रुपयापर्यंत लोन ची व्यवस्था
- आयकर सेक्शन 80E अंतर्गत 100% इन्कम टॅक्स मध्ये बेनिफिट मिळेल.
शैक्षणिक कर्जाचा वापर
विविध खर्चासाठी या कर्जाचा वापर तुम्ही करू शकता ते खालील प्रमाणे
कॉलेज रिलेटेड खर्च
- ट्युशन फीज व इन्स्टिट्यूट चे इतर शुल्क.
- परीक्षा शुल्क, लायब्ररीची फी, लॅबोरेटरीची फी.
- पुस्तके, वस्तू, युनिफॉर्म खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च
- होस्टेलचा खर्च इत्यादी.
इतर खर्च
- जाण्या येण्यासाठी ट्रॅव्हलिंग चा खर्च
- कॅम्पुटर लॅपटॉप घेण्यासाठीचा खर्च.
- बाहेर देशात शिकत असाल तर ट्रॅव्हल इन्शुरन्स खर्च.
- तसेच हेल्थ इन्शुरन्स खर्च सुद्धा यामध्ये मिळू शकतो.
- विद्यार्थ्यांना NIRF रँकिंग किंवा टॉप एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतलेला असल्यास व्याजदरामध्ये कपात केली जाऊ शकते.
आवश्यक कागदपत्रे
- अर्ज करते वेळेस अर्जदाराने खालील कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायची आहेत या कागदपत्रांमध्ये
- अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो
- पत्त्याच्या पुराव्यामध्ये (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट, वोटर आयडी किंवा पालकांचे NREGA कार्ड लागेल)
- प्रवेश घेतल्याचा पुराव्यामध्ये (कॉलेज आयडी, ऍडमिशन लेटर ,बोनाफाईड लेटर)
- कॉलेजची फी दाखवणारे फी स्ट्रक्चर सोबत जोडणे आवश्यक असेल.
अर्ज कसा कराल
- या कर्जासाठी ऑनलाईन पद्धतीने https://www.buddy4study.com/page/buddy4study-education-loan-programme या लिंकवरून अर्ज सादर करायचा असून हे कर्ज बडी4स्टडी अंतर्गत विविध बँका किंवा एन बी एफ सी अंतर्गत तुम्हाला हे कर्ज दिले जाते या कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करताना बडी फोर स्टडीचे अकाउंट तुम्हाला लॉगिन करावे लागते.
- बडी फोर स्टडी च्या अकाउंट तुम्ही जर बनवले नसेल तर ईमेल आयडी, मोबाईल किंवा जीमेल अकाउंट लॉगिन करून तुम्ही हे अकाउंट बनवू शकता.
- हे अकाउंट बनवल्यानंतर लॉगिन करायला लागेल लॉगिन केल्यावर एप्लीकेशन फॉर्म पेज ओपन होईल.
- त्यानंतर तुम्ही बडी फोर स्टडी एज्युकेशन लोन प्रोग्राम मध्ये प्रवेश कराल तिथे गेल्यानंतर स्टार्ट अप्लिकेशन या बटनाला क्लिक करून अर्ज भरण्याची प्रक्रिया तुम्हाला करायला लागेल.
- ऑनलाईन पद्धतीने सर्व डिटेल्स तुम्हाला भरायला लागतील आवश्यक ते विचारलेले सगळे कागदपत्र जोडावे लागतील.
- बडी4स्टडी च्या अटी व शर्ती वाचून तुम्हाला ते एक्सेप्ट करायला लागतील व आपल्या अर्जाचा प्रीविव् बघायला मिळेल.
- अर्जाच्या प्रीविव् मध्ये तुम्ही अर्ज व्यवस्थित रित्या भरलेला आहे की नाही हे चेक करावे.
- नंतर सबमिट या बटना क्लिक करून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)
1.बडी4स्टडी एज्युकेशन लोन साठी कोण पात्र असेल?
Ans : बडी4स्टडी मध्ये लोन घेण्यासाठी अर्ज करणारा भारतीय नागरिक असावा, अर्जदाराने भारतात किंवा भारताच्या बाहेर अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम मध्ये प्रवेश घेतलेला असावा, कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न तीन लाख पेक्षा जास्त असावे व शैक्षणिक कर्ज रक्कम एक लाखापेक्षा जास्त असावी.
2.कर्जाचा व्याजदर किती असेल?
Ans : तुम्ही बडी4स्टडी अंतर्गत शैक्षणिक कर्ज घेत असल्यास याचा व्याजदर 8.1% दरवर्षी असा लागू होतो हा दर तुम्ही घेतलेल्या कोर्स वर आणि कॉलेजच्या रँकिंगवर अवलंबून आहे.
3.हे कर्ज घेण्यासाठी काही तारण ठेवावे लागते का?
Ans : बडी4स्टडी अंतर्गत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज मध्ये काहीही तारण ठेवण्याची आवश्यकता नाही जर कर्ज 40 लाखाच्या आत असेल तर, जर कर्ज 40 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तारण ठेवण्यासाठी बँक विचारेल त्या पद्धतीने पुढच्या प्रक्रिया पार पाडावी लागेल.
4.या कर्जासाठी सहकर्जदार याची आवश्यकता आहे का?
Ans : हो, हे कर्ज घेण्यासाठी सह-कर्जदार असणे आवश्यक आहे.
5.सहकर्जदार कोण होऊ शकतात?
Ans : सहकर्जदारांमध्ये तुमचे पालक, भाऊ बहीण, पती-पत्नी, सासू-सासरे, आजी-आजोबा यांचं समावेश राहू शकतो.