BMC Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयांमध्ये चौथीपासून नोकरीची संधी उपलब्ध झाल्या असून यासाठी ऑफलाइन पद्धतीने विहित नमुना उमेदवाराला सादर करायचे आहे 14 जुलै 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाले असून यासाठी 01 ऑगस्ट 2025 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
चर्मकार – 02 जागा
शैक्षणिक पात्रता व इतर निकष
उमेदवार कमीत कमी इयत्ता सातवी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवाराला मराठी लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक आहे, उमेदवारच चामड्याचे काम करता येणे आवश्यक राहील, मान्यता प्राप्त सरकारी संस्थेतील सामन्याचे जुते बनवणे, दुरुस्त करण्याची प्रशिक्षण व प्रमाणपत्र असणारा उमेदवारला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.
निवड प्रक्रिया
चर्मकार हि रिक्त पदे भरण्यासाठी निवडीचा निकषांमध्ये तोंडी परीक्षा राहणार आहे, यासोबतच व्यावसाय चाचणी सुद्धा असेल चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी निवड समिती समोर ठेवण्यात येईल व त्यानंतर सेवा जेष्ठतेनुसार निवड यादी तयार केली जाईल.
अर्ज पद्धती
खाली दिलेल्या अर्जाच्या वहीत नमुन्यातच उमेदवाराला अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज सादर करते वेळेस आवश्यक ते सर्व कागदपत्रे अर्ज सोबत सोडावीत व हा अर्ज बृहन्मुंबई महानगरपालिका लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय शिव, मुंबई -400 022 या ठिकाणी सादर करावा.
मासिक वेतन
या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला महानगरपालिकेमध्ये फक्त 20700 ते 65800 रुपये एवढी मासिक वेतन देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त इतर काही भत्ते किंवा इतर लाभ असल्यास त्याचे सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये पहावी व मुलाखतीच्या वेळेस या गोष्टीची खात्री करून घेणे आवश्यक राहील.
उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना
सर्व कागदपत्राच्या मूळ प्रत्येक पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे अन्यथा उमेदवार निवडीकरिता पात्र समजला जाणार नाही याची नोंद घ्यावी. पडताळणीच्या वेळी कर्मचारी उपस्थित न राहिल्यास निवडीकरिता पदासाठी इच्छुक नाही असे समजण्यात येईल व सदर प्रकरणी कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही जबाबदारी सर्वस्वी उमेदवाराचे असल्याचे नोंद घ्यावी. कागदपत्रे पडताळणी व व्यवसाय चाचणीसाठी स्वखर्चाने हजार राहावे. चर्मकार या पदासाठी कागदपत्र पडताळणी व व्यवसायाचाचणी करिता वेळ व दिनांक उमेदवाराला कळवण्यात येईल.
अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी आणि अर्ज सादर करावा व त्या सर्व प्रक्रिया पार पाडाव्यात. जाहिरातीमध्ये दाखविल्या व्यतिरिक्त कोणतेही वेगळे शुल्क कोणालाही देऊ नये, कोणत्याही एजंट द्वारे हि पदे भरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी व कोणत्याही भूलथापांना बाली पडू नये.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |

मागील 5 वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे. नोकरी, नवीन योजना व बँकिंग क्षेत्रातील माहिती मी या ब्लॉगद्वारे देतो.सर्व माहिती ऑनलाईन स्रोतापासून मिळवून तुम्हाला देण्यात येते, काही अडचण असल्यास संपर्क साधावा.