वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी करीता ज्या स्थावर मालमत्ता धारकांनी प्रत्यक्षात या कृषि विद्यापीठाकरीता जमिनी / घरे शासन धोरणानुसार अधिगृहीत केलेल्या आहेत, अशा प्रकल्पग्रस्तामधुन शासन निर्णय दिनांक १४ ऑक्टोंबर २०२४ नुसार कृषि विद्यापीठातील गट क व गट ड संवर्गातील एकुण भरावयाच्या पदांपैकी ५० टक्के रिक्त पदे त्याच कृषि विद्यापीठांने बाधीत प्रकल्पग्रस्तांमधुन भरण्याकरीता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आलेली आहे..
सदर शासन निर्णयान्वये तसेच भरती प्रक्रिये संबंधी प्रचलीत शासन निर्णय, वेळोवेळी निर्गमित शासन निर्णयातील तरतुदीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (महाराष्ट्र राज्य) अंतर्गत प्रकल्पग्रस्त सरळसेवा विशेष भरती मोहीमे अंतर्गत सोबतच्या विहित नमुन्यामध्ये पात्र उमेदवाराकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज खालील वेळापत्रकाप्रमाणे मागविण्यात येत आहे. सदरील सविस्तर जाहिरात व आवेदन पत्राचा नमुना विद्यापीठ संकेतस्थळ www.vnmkv.ac.in वर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |