Anjum Chopra Sports Scholarship 2024 : भारतामध्ये कोणत्याही खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या तरी संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळणे किंवा आर्थिक मदत मिळणं खूप अवघड जाते. गरीब व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातून कोणी खेळाडू निर्माण होत असेल तर तो पैसा नसल्यामुळे आपला खेळ पूर्ण करू शकत नाही.
अशातच मुलींना खेळण्याची परवानगी देणे म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे, घरात पैशाची चणचण असताना सुद्धा आपल्या स्वबळावर नशिबानेच कोणीतरी खेळाडू तयार होतात. परंतु भारतामध्ये खेळाडूसाठी सुद्धा शिष्यवृत्ती दिली जाते हे क्वचितच कोणाला तरी माहित असेल. शिक्षणासाठी भरपूर संस्था काम करत असतात परंतु खेळासाठी काही मोजक्या संस्था शिष्यवृत्ती प्रदान करतात.
यामध्ये पुश स्पोर्ट्स म्हणून एक संस्था आहे या संस्थेमार्फत क्रिकेट खेळणाऱ्या मुलींसाठी एक लाख रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य पुरवले जाते, तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे आर्थिक सहाय्य पुरेसे नसले तरी यामुळे खूप मोठा हातभार तुम्हाला लागू शकतो.
पुश स्पोर्ट्स अंतर्गत अंजुम चोप्रा स्कॉलरशिप राबविली जाते यासाठी दरवर्षी भारतातून दहा महिला खेळाडू सिलेक्ट केला जातात. दरवर्षी ही प्रक्रिया राबवली जाते या प्रक्रियेमध्ये फक्त क्रिकेट चा समावेश आहे. क्रिकेट खेळणाऱ्या कोणत्याही 14 ते 25 वय असलेल्या मुलींसाठी ही स्कॉलरशिप दिली जाते.
मुलगी राज्यस्तरावर खेळत असेल तर हे शिष्यवृत्ती त्या मुलींना दिल्या जाते याची नोंदणी 11 जानेवारी 2023 पासून सुरू झालेली असून दरवर्षी या शिष्यवृत्तीसाठी दहा मुलींची निवड केल्या जाणार आहे. यासाठी काही पात्रता दिलेल्या आहेत त्या संदर्भातील माहिती खाली दिलेली आहे.
पुश स्पोर्ट्स भारतामध्ये खेळाचे शिक्षण देणारे तसेच फिटनेस प्रमोट करणारी कंपनि आहे. हे कंपनी क्रिकेट वर फोकस करते लहान मुलांसाठी किंवा मुलींसाठी ही संस्था काम करते. पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलेल्या अंजुम चोप्रा यांच्या नावे पुश स्पोर्ट्स हि शिष्यवृत्ती राबवत आहे.
दरवर्षी एक लाख रुपयापर्यंतचे आर्थिक सहाय्य ही कंपनी प्रशिक्षणासाठी देते. यासाठी तुम्ही अर्ज करू इच्छित असाल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वरून तुम्ही जाऊन या शिष्यवृत्तीसाठी सहजरित्या अर्ज सादर करू शकता.
आवश्यक पात्रता
- कोणतीही महिला क्रिकेटर ज्या मुलींचे वय 14 ते 25 दरम्यान असावे व ही मुलगी राज्यस्तरावर क्रिकेट खेळणारी असावी. या व्यतिरिक्त इतर कोणतीही शिक्षणाची अट पुश स्पोर्ट्स अंतर्गत ठेवण्यात आलेली नाही.
- त्यामुळे कोणतीही महिला खेळाडू यासाठी अर्ज सादर करू शकते, फक्त वयोमर्यादा 14 ते 25 असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया (Anjum Chopra Sports Scholarship)
- पात्रता धारक मुलींनी https://pushsports.in/anjum-chopra-scholarship-by-push-sports/ या लिंक वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी अर्ज करायचा असेल तर वर दिलेल्या लिंक वर क्लिक करायचं आहे व अप्लाय नाऊ या बटनाला क्लिक करायच आहे.
- तिथे गेल्यानंतर रजिस्टर या बटनाला क्लिक करून आवश्यक ती माहिती भरायची आहे जर तुम्ही अगोदरच नोंदणी केलेली असेल तर लॉगिन करून अर्ज भरू शकता, परंतु नोंदणी केलेली नसेल तर फक्त जीमेल किंवा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकून तुम्ही नोंदणी करू शकता.
- आवश्यकती सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही रजिस्टर या बटनाला क्लिक करून या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करू शकता.
शिष्यवृत्तीचे फायदे
- या शिष्यवृत्ती मार्फत निवड झालेल्या मुलींना एक लाख रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते या आर्थिक सहाय्यामध्ये उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक असलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय टूर्स साठी या शिष्यवृत्तीचा वापर करू शकता.
- दरवर्षी दहा खेळाडू यामध्ये सिलेक्ट केले जातात यासाठी पुश स्पोर्ट्स चे अनुभवी प्रशिक्षक पूर्ण वर्षभर ट्रेनिंग देतात व त्यांची मेंटॉरशिप सुद्धा त्यांना मिळते,दिल्ली महिला U23 संघाचे माजी प्रशिक्षक श्री. पुरु सिंग यांच्यामार्फत हे प्रशिक्षण दिले जाते.
- शिष्यवृत्तीसाठी कोणतीही शेवटची तारीख दिलेली नाही ही शिष्यवृत्ती दरवर्षी मुलींसाठी खुली राहणार आहे.
- दरवर्षाला दहा मुली या शिष्यवृत्तीसाठी निवडल्या जातील व त्यांना शिष्यवृत्ती व इतर खर्च साठी आर्थिक साहाय्य दिले जाईल.
निवड प्रक्रिया
- वर नमूद केलेली पात्रता धारण करत असल्यास महिला उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात,आलेल्या सर्व अर्जामधून खेळाडूची मुलाखत घेऊन त्यांची निवड केल्या जाते.
- मुलाखत झाल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये निवड झाली की नाही याची माहिती दिली जाते, निवड झाल्यानंतर निवड झालेल्या अर्जदारांना एक एग्रीमेंट साइन करून द्यावे लागते. ज्यामध्ये शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये कोणते फायदे दिले जातील याची माहिती व इतर आवश्यक माहिती तुम्हाला मिळते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)
1.निवड झाल्यानंतर पैसे कसे मिळतात?
Ans : कोणतीही रक्कम तुम्हाला आर्थिक स्वरूपात मिळत नाही. परंतु तेवढ्या रकमेचे प्रशिक्षण अथवा इतर होणाऱ्या खर्चाचा मोबदला दिला जातो.
2.यासाठी अर्ज कसा करावा लागेल?
Ans : वर ऑनलाईन अर्जाची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करू शकता.
3.माझी निवड झालेली आहे हे कसे समजेल?
Ans : मुलाखतीनंतर निवड झाली की नाही याविषयीची माहिती तुम्हाला मेल द्वारे देण्यात येईल, पंधरा दिवसांमध्ये हा निकाल लागतो.
4.या शिष्यवृत्तीसाठी कधीपर्यंत अर्ज करू शकतो?
Ans : या शिष्यवृत्तीसाठी संपूर्ण वर्षभरात कधीही अर्ज करू शकतात, या शिष्यवृत्तीसाठी कोणतीही शेवटची तारीख दिलेली नाही.
5.मी राज्यस्तरावरील पुरुष उमेदवार खेळाडू आहे मला हे शिष्यवृत्ती मिळेल का?
Aनाही, हे शिष्यवृत्ती फक्त महिला खेळाडूसाठी असून त्यांचे वय 14 ते 25 दरम्यान असावे