Talathi Bharti 2025 : राज्याच्या महसूल विभागामध्ये सुमारे 3000 पर्यंत रिक्त जागा आहेत, यामध्ये सर्वाधिक रिक्त पदे तलाठ्यांची आहेत, सध्याच्या परिस्थितीत एक तलाठ्याकडे तीन-चार गावाचा कारभार दिलेला आहे.
प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठी जातो अनेकदा एखाद्या गावात तलाठी पंधरा दिवसातून कधीतरी फेरी मारतो, यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा चावडीच्या पायऱ्या चढाव्या लागतात तलाठ्याचा हा भार अनेकदा कोतवालावर देखील येत असतो.