Tata Steel Scholarship 2024 : टाटा स्टील मार्फत 10 वी पास विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी 50,000 शिष्यवृत्ती; लगेच करा अर्ज

Tata Steel Scholarship 2024 : टाटा स्टील डाऊनस्ट्रीम प्रॉडक्ट्स लिमिटेड अंतर्गत आयटीआय व डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 50 हजार पर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. यासाठी 03 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच होतकरू विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप देण्यात येते, आयटीआय कोर्सेस व डिप्लोमा मध्ये फिटर, इलेक्ट्रिकल, वेल्डर किंवा सेफ्टी मध्ये कोणी ऍडमिशन घेतलेले असेल तर अशा विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप देण्यात येते.

हि स्कॉलरशिप जमशेदपूर, कलिंगानगर, पंतनगर, फरीदाबाद, पुणे, चेन्नई, टाडा आणि कोलकत्ता मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, या विद्यार्थ्याला दर वर्षाला 50 हजार रुपये स्कॉलरशिप टीएसडीपीएल तर्फे मिळते.

टीएसडीपीएल सिल्वर जुबली स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत हा इनिशिएटिव्ह टाटा ग्रुप कडून चालू केलेला आहे यासाठी पात्रता व आवश्यक अटी सुद्धा दिलेल्या आहेत त्या खाली नमूद केलेल्या आहेत, टाटा स्टील डाऊन स्ट्रीम प्रॉडक्ट्स लिमिटेड हे 100% टाटा स्टीलची सबसिडीरी कंपनी आहे व भारतातील स्टील प्रोसेसिंग करणाऱ्या कंपनीमध्ये अग्रगण्य कंपनी आहे.

या शिष्यवृत्तीसाठी पात्रता

  • ही शिष्यवृत्ती सर्व विद्यार्थ्यांसाठी ओपन आहे जी विद्यार्थी कलिंगनगर, पंतनगर फरीदाबाद, पुणे, चेन्नई, टाडा किंवा कोलकत्ता येथे राहतात.
  • अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी एका वर्षाचा डिप्लोमा किंवा आयटीआय सरकारी मान्यता प्राप्त संस्थांमध्ये ऍडमिशन घेतलेले असावे.
  • हे ऍडमिशन फिटर, इलेक्ट्रिकल, वेल्डर किंवा सेफ्टी साठी घेतलेले असणे आवश्यक आहे.
  • मागच्या वर्षी कमीत कमी 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक असेल.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी असावे.
  • टी एस डी पी एल आणि बडी4स्टडी मध्ये कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पाल्य आहे शिष्यवृत्ती लागू नाही.
  • अनुसूचित जाती/जमातीच्या उमेदवारांना तसेच अपंग उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर स्पोर्ट्स मध्ये चांगले खेळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे.

शिष्यवृत्ती चे फायदे

या शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी 50 हजार रुपये एवढे आर्थिक साहाय्य दिले जाते.

हि स्कॉलरशिपची रक्कम तुम्ही कॉलेजच्या खर्चासाठी, ट्युशन फीस साठी, बुक, स्टेशनरी, होस्टेल, मेसचे चार्जेस देण्यासाठी किंवा इतर खर्च देण्यासाठी करू शकता.

आवश्यक कागदपत्र

  1. दहावीची मार्कशीट व पासिंग सर्टिफिकेट
  2. सरकारी ओळखपत्र (ज्यामध्ये आधार कार्ड, वोटिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड चा समावेश असेल)
  3. प्रवेश घेतल्याचा पुरावा (फी भरल्याची पावती, प्रवेश पत्र, आयडेंटी कार्ड किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करू शकता)
  4. कुटुंबाच्या उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म 16A ,सरकारी अधिकाऱ्याकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला व सॅलरी स्लिप इत्यादी)
  5. बँक अकाउंट ची माहिती (यामध्ये कॅन्सल चेक व पासबुक अपलोड करू शकता)
  6. अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटोग्राफ

अर्ज कसा करावा (Tata Steel Scholarship 2024)

  1. या शिष्यवृत्तीसाठी तुम्हाला बडी4स्टडीच्या https://www.buddy4study.com/page/tsdpl-silver-jubilee-scholarship-program या लिंक वर जाऊन अप्लाय नाऊ (Apply Now) या बटनाला क्लिक करायच आहे, अप्लाय नाऊ (Apply Now) या बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्ही एप्लीकेशन फॉर्म पेजवर जाल व तुम्हाला तिथे लॉगिन करावे लागेल.
  2. जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर तुम्हाला लॉगिन करता येणार नाही, त्यामुळे लॉगिन करायच्या अगोदर तुम्हाला नोंदणी करायची आहे. ही नोंदणी ई-मेल, मोबाईल किंवा जीमेल अकाउंटने तुम्ही करू शकता.
  3. त्यानंतर तुम्ही टीएसडीपीएल सिल्वर जुबली स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 एप्लीकेशन फॉर्म पेजवर जाल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला स्टार्ट अप्लिकेशन (Start Application) या बटनाला क्लिक करायचं आहे.
  4. त्यानंतर आवश्यक ते सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे सर्व माहिती भरल्यानंतर वर नमूद केलेले सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत व या स्कॉलरशिप साठीच्या अटी व शर्ती (Terms & Conditions) ला मान्य करून अर्ज चा प्रीविव् (Preview) बघायचा आहे.
  5. अर्जाच्या प्रीविव् (Preview) मध्ये तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरलेली आहे की नाही हे चेक करायचे आहे व त्यानंतर सबमिट या बटनाला क्लिक करून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.या स्कॉलरशिप साठी निवड प्रक्रिया कशी असेल?

Ans : मागच्या वर्षीचा अकॅडमी रेकॉर्ड व आर्थिक परिस्थिती बघून निवड केल्या जाईल या बेसिस व सर्वप्रथम अर्जदार शॉर्टलिस्ट केले जातील. त्यानंतर टेलिफोनिक इंटरव्यू घेतला जाईल फायनल निवड यादी जाहीर केली जाईल.

2.माझी निवड झाल्यानंतर पैसे कसे मिळतील?

Ans : या स्कॉलरशिप साठी तुमची निवड झाल्यानंतर ही रक्कम तुम्ही दिलेला बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल.

3.भारतातील कोणीही या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो का?

Ans : नाही जे विद्यार्थी फक्त जमशेदपूर, कलिंगानगर, पंतनगर, फरीदाबाद, पुणे, चेन्नई, टाडा व कोलकत्ता येथे राहतात असेच विद्यार्थी असेच विद्यार्थी अर्ज करू शकतात.

4.ही स्कॉलरशिप दरवर्षी रिन्यू करता येते का?

Ans : नाही, टीएसडीपीएल सिल्वर जुबली स्कॉलरशिप प्रोग्राम हे फक्त एक वेळ मिळणारी एकरकमी शिष्यवृत्ती आहे.

5.मी इंजिनिअरिंगच्या पदवीला ऍडमिशन घेतलेले आहे यासाठी अर्ज करू शकतो का?

Ans : नाही, हे शिष्यवृत्ती फक्त आयटीआय किंवा डिप्लोमा साठी राहणार आहे. आयटीआय किंवा डिप्लोमा तुम्ही फिटर, इलेक्ट्रिकल, वेल्डर किंवा सेफ्टी मध्ये करणे आवश्यक असेल.

Leave a Comment