Rajarshi Shahu Maharaj Shishyavrutti 2024-25 : राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती 2024-25 साठी ऑनलाईन अर्ज सुरु

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Shishyavrutti 2024-25 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत महाराष्ट्र मधील उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना अमलात आणलेली आहे.

उच्च शिक्षण घेणाऱ्या मध्ये जे उमेदवार पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असतील असे उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेमध्ये ट्युशन फीज व परीक्षा शुल्क पूर्णपणे विद्यार्थ्यांना परत मिळणार आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पात्रता काय असेल?

या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे, त्यासोबतच तुम्ही कोणतेही शासनमान्य अभ्यासक्रमांमध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठात प्रवेश घेतलेला असावा, तुम्ही आर्थिक मागास प्रवर्गातून किंवा इतर प्रवर्गातून येत असल्यास अर्ज करू शकणार आहात. कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.

जर उमेदवाराला या अगोदर कोणतीही स्कॉलरशिप मिळत असेल किंवा विद्यार्थ्यांनी मिळत असेल तर असे विद्यार्थी यासाठी पात्र राहणार नाहीत त्यासोबतच जे विद्यार्थी डिस्टन्स लर्निंग, पार्ट टाइम कोर्सेस किंवा वर्चुअल लर्निंग घेत असेल तर अशा विद्यार्थी सुद्धा यासाठी अर्ज करू शकणार नाहीत. या शिष्यवृत्ती मध्ये अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या संस्थेमध्येच शिक्षण घेत असणे आवश्यक आहे.

कागदपत्रे काय लागतील?

यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा अधिवास प्रमाणपत्र, अधिकृत अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस संदर्भातील कागदपत्रे, दोन मुले असल्याबाबतचे कुटुंबाचे ना हरकत प्रमाणपत्र, हजेरी प्रमाणपत्र व मागच्या वर्षीचे गुणपत्रक.

हे हि वाचा… Kotak Life Insurance Scholarship : कोटक लाईफ इन्शुरन्स तर्फे बीकॉम मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 30,000 रुपये शिष्यवृत्ती

अर्ज कसा कराल?

या योजनेत या शिष्यवृत्तीमध्ये तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक असाल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन अप्लाय नाऊ या बटनाला तुम्हाला क्लिक करायचा आहे, त्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण करायची आहे जर तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर सर्वप्रथम ईमेल आयडी किंवा फोन नंबर टाकून नोंदणी करायची आहे व नंतर अप्लाय नाऊ बटनाला क्लिक करायचं आहे.

ही नोंदणी झाल्यानंतर तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता या शिष्यवृत्तीसाठी 31 मार्च 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत जे उमेदवार वर नमूद केलेल्या अटी शर्तीचे पालन करत असेल तेच विद्यार्थी यासाठी निवडले जातील याची उमेदवाराने नोंद घ्यावी.

इतर सविस्तर माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागास संपर्क साधू शकता त्याविषयीची माहिती खाली लिंक वर दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन सविस्तर माहिती घ्यावी व पात्र असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा .

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा  

महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय : येथे क्लिक करा  

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Leave a Comment