PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिकेमध्ये 12वी,आयटीआय व पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी;येथे करावा लागेल अर्ज

PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातील प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध पदांसाठी एकवट मानधन तत्वावर बॅचनिहाय सेवा देण्यासाठी अनुभवधारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत,पदांची संपूर्ण माहिती त्याच्यानुसार आवश्यक असलेले शैक्षणिक अर्हता, आवश्यक असलेला अनुभव, त्या पदभरतीसाठी आवश्यक असलेल्या अटी व शर्ती, गुणदान पद्धतीची माहिती, उमेदवाराने सादर करायचा अर्ज नमुना अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे.

उमेदवार जर शैक्षणिक पात्रता धारण करत असेल तसेच अनुभव धारक असेल तर त्या उमेदवाराने 24 डिसेंबर 2024 पासून 2 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांबाबत माहिती

समाज विकास विभागातील प्रशिक्षण केंद्रातील एकूण 16 पदे भरायचे आहेत या पदामध्ये फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग व फोटो लॅमिनेशन ऍडव्हान्स कोर्स कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक, वायरिंग मोटर रिवायडींग व विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षक, फ्रिज एसी दुरुस्ती प्रशिक्षक, मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षक, फॅशन डिझाइनिंग प्रशिक्षक, एम्ब्रॉयडरी प्रशिक्षक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक, दुचाकी वाहन प्रशिक्षक, दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, चार चाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक, चार चाकी दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, जेंट्स पार्लर (बेसिक व ॲडव्हान्स) प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर (लिनक्स, रेड हॅट) प्रशिक्षक, संगणक बेसिक एमएससीआयटी टॅली इरा डीटीपीसी प्लस प्लस प्रशिक्षक ही पदे भरायची आहे.

विविध रिक्त जागांचा तपशील पीडीएफ मध्ये नमूद केलेल्या जाहिरातीत दिलेला आहे ती जाहिरात खालील लिंक वरून उमेदवारांनी डाऊनलोड करून व्यवस्थित वाचून अर्ज सादर करायचा आहे. या पदभरती साठी शैक्षणिक पात्रता ही वर नमूद केलेल्या पदांसाठी वेगवेगळ्या आहेत.

यासाठी एक वर्ष कालावधीचा सामान्य प्रशिक्षण डिप्लोमा, आयटीआय, पदवीधर तसेच पदव्युत्तर उमेदवार सुद्धा अर्ज सादर करू शकणार आहेत सर्व पदांसाठी एकूण दोन वर्षाचा अनुभव आवश्यक असून जर हा अनुभव तुमच्याकडे असेल तरी या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहात.

अटी शर्ती व इतर माहिती

वर नमूद केलेल्या पदासाठी शैक्षणिक पात्रता, शासकीय/निमशासकीय विभागाकडे काम केल्याचा अनुभव व समाज विकास विभागाकडे कामाचा अनुभव इत्यादीच्या आधारे परीक्षण करून गुणानुक्रमे निवड व प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे व त्यानंतर सहा महिने मुदती करिता उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

जर तुमच्याकडे जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक पात्रता असेल अनुभव असेल तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहेत.

अर्ज करताना उमेदवारांनी जन्म तारखेच्या पुरावासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत, जन्म तारखेची नोंद असलेली शालांत परीक्षेच्या उत्तीर्ण सर्टिफिकेटची जोडणे आवश्यक असेल.

अर्जासोबत एक पासपोर्ट आकाराचा फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रतेचे दाखले, अनुभवाचे दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे साक्षांकित करून पानवारी करून व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, शिवाजीनगर गावठाण, पुणे -05 या ठिकाणी अर्जदाराने स्वतः उपस्थित राहायचं आहे हे अर्ज ठिकाणी 02 जानेवारी 2025 पर्यंत सकाळी 11 ते 02 वाजेपर्यंत अर्ज सादर करायचा आहे.

टपालाने आलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हता धारण करणारा न आढळल्यास गैरवर्तन करणारा आढळल्यास दबाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास अशा उमेदवाराची उमेदवारी रद्दबातल करण्यात येईल तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणती पूर्व सूचनां न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.

वर दिलेली माहिती अर्धवट असू शकते उमेदवाराने संपूर्ण पीडीएफ जाहिरात वाचून त्यानुसार आपला अर्ज सादर करावा.

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

1 thought on “PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिकेमध्ये 12वी,आयटीआय व पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी;येथे करावा लागेल अर्ज”

Leave a Comment