Kotak Life Insurance Scholarship : कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरवले जाते, यासाठी कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्राम 2024 -25 या स्कॉलरशिप अंतर्गत महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये बीकॉमच्या पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी ला तीस हजार रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.
दरवर्षी विद्यार्थ्यांना हे साहाय्य मिळत राहते, कोटक महिंद्रा लिफे इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही शंभर टक्के कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचे सबसिडीरी कंपनी आहे, कोटक महिंद्राची कोटक कन्या स्कॉलरशिप आपण या अगोदर बघितलेली आहे.
हे कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप आहे या अंतर्गत फक्त बीकॉम मध्ये ऍडमिशन घेतलेले विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते, 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहात. याची तारीख पुढे वाढवली जाऊ शकते त्याची अपडेट तुम्हाला वेळोवेळी दिली जाईल.
शिष्यवृत्तीसाठी काही आवश्यक पात्रता अटी व शर्ती आहेत त्या खाली दिलेल्या आहेत अर्ज करण्या अगोदर विद्यार्थ्याने सविस्तर माहिती वाचावी आणि त्यानंतर पात्र असाल तरच अर्ज सादर करावा.
शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता
- तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हि शिष्यवृत्ती असणार आहे.
- या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने बीकॉमच्या पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतलेल्या असावे व हे ऍडमिशन नामांकित विद्यालयामध्ये घेतलेल्या असणे गरजेचे आहे.
- विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी मध्ये कमीत कमी 60 टक्के गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांने 2023-24 मध्ये बारावी उत्तीर्ण झालेली असावी.
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न तीन लाख साठ हजार किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- या शिष्यवृत्तीसाठी जे विद्यार्थी गव्हर्मेंट कॉलेजमध्ये शिक्षण घेतात व अनाथ विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
- कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी आणि बडी4स्टडी च्या कर्मचाऱ्यांच्या पाल्याना हि शिष्यवृत्ती लागू नाही याची नोंद घ्यावी.
शिष्यवृत्ती चे फायदे
दरवर्षी तीस हजार रुपये पर्यंत शैक्षणिक खर्चासाठी रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात येते, एकूण तीन वर्षाला हि शिष्यवृत्ती दरवर्षी प्रदान करण्यात येते. त्यासाठी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
आवश्यक कागदपत्रे
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करते वेळेस आवश्यक ती कागदपत्रे ऑनलाईन अर्ज करतेवेळेस अपलोड करणे गरजेचे आहे, अपलोड करायची कागदपत्रे खालील प्रमाणे.
- दहावी बारावीच्या मार्कशीट आणि प्रमाणपत्र
- शासकीय ओळखीचा पुरावा (त्यामध्ये आधार कार्ड, वोटिंग कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना व पॅन कार्डचा समावेश असेल)
- प्रवेश घेतल्याचा पुरावा (कॉलेजमध्ये फी भरल्याची पावती किंवा प्रवेश पत्र विद्यार्थ्यांचे किंवा संष्ठेचे आयडी कार्ड याचा समावेश असेल)
- उत्पन्नाचा पुरावा (ज्यामध्ये फॉर्म 16A आहे, उत्पन्नाचा दाखला किंवा सॅलरी स्लिप चा समावेश आहे)
- अर्जदाराच्या बँकेचे डिटेल्स (बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक सोबत जोडाव)
- अलीकडच्या काळातील पासपोर्ट फोटोग्राफ
अर्ज कसा करावा (Kotak Life Insurance Scholarship)
- या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा बडी फॉर स्टडी च्या https://www.buddy4study.com/page/kotak-life-insurance-scholarship-program या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.
- वर दिलेल्या लिंक वर गेल्यानंतर एप्लीकेशन फॉर्म पेज ओपन होईल तुम्ही या अगोदर नोंदणी केली नसेल तर तुम्हाला सर्वप्रथम मोबाईल, ईमेल किंवा जीमेल टाकून नोंदणी करणे आवश्यक असेल.
- नोंदणी करून लॉगिन केल्यानंतर तुम्हाला कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 चे ॲप्लिकेशन फॉर्म पेज ओपन होईल.
- तिथे तुम्हाला स्टार्ट अप्लिकेशन बटन ला क्लिक करून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करायची आहे.
- आवश्यक ती सर्व माहिती अर्जामध्ये नमूद करणे गरजेचे आहे, त्यानंतर वर सांगितलेले सर्व कागदपत्रे व्यवस्थितरित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर खाली अटी व शर्ती दिलेल्या स्टील त्याला तुम्हाला एक्सेप्ट करायचे आहे आणि त्यानंतर अर्जाचा प्रीविव् बघायचा आहे.
- अर्जाच्या प्रीविव् मध्ये तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरली की नाही ते तपासायचे आहे आणि त्यानंतर अर्ज सबमिट करून अर्जाची प्रक्रिया समाप्त करायची आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)
1.या शिष्यवृत्तीसाठी निवड कशा पद्धतीने केली जाते?
Ans : कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 अंतर्गत सर्वप्रथम पात्रतेनुसार विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्ट तयार केली जाईल, कागदपत्राचे वेरिफिकेशन केले जाईल व टेलिफोनिक इंटरव्यू घेऊन उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातील.आणि नंतर कोटक लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही अंतिम यादी जाहीर करेल.
2.ही शिष्यवृत्ती सर्व वर्षासाठी मिळेल का?
Ans : हो, ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दरवर्षी दिली जाईल सर्व तीन वर्षासाठी हि शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळेल.
3.ही शिष्यवृत्ती भारतातील सर्व राज्यातील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे का?
Ans : नाही, हि शिष्यवृत्ती फक्त महाराष्ट्र व तामिळनाडू मधील विद्यार्थ्यांसाठी लागू राहणार आहे.
4.या शिष्यवृत्तीची रक्कम कशी मिळेल?
Ans : निवड झाल्यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम थेट शाळेला देण्यात येईल.