Kotak Kanya Scholarship : कोटक महिंद्रा ग्रुप अंतर्गत विद्यार्थिनींना दरवर्षी 1,50,000 रुपयांची शिष्यवृत्ती; पहा पात्रता, अटी व नियम

Kotak Kanya Scholarship 2024-25 : कोटक महिंद्रा बँक हे नाव तुम्ही कुठे ना कुठे ऐकल असेल किंवा बघितलं असेल, कोटक महिंद्रा बँक हे सामाजिक क्षेत्रात सुद्धा भरभरून कार्य करते कोटक महिंद्रा बँक मुलींसाठी कोटक कन्या स्कॉलरशिप 2024-25 देत आहे.

या शिष्यवृत्ती अंतर्गत दरवर्षी विद्यार्थिनीला एक लाख पन्नास हजार एवढे आर्थिक सहाय्य पुरवल्या जाते कोटक महिंद्रा बँकेच्या सीएसआर प्रोजेक्ट अंतर्गत कोटक कन्या स्कॉलरशिप चालवली जाते, ही स्कॉलरशिप कोटक महिंद्रा ग्रुप कंपनीज आणि कोटक एज्युकेशन फाउंडेशन हे प्रमोट करते.

समाजातील विविध उपक्रमासाठी तसेच विद्यार्थिनी साठी हे स्कॉलरशिप आहे यासाठी आर्थिक सहाय्य हि कंपनी देते, बारावीनंतर प्रोफेशनल शिक्षणसाठी ही मदत विद्यार्थिनींना दिली जाते. यासाठी इच्छुक विद्यार्थिनीने 30 डिसेंबर 2024 पूर्वी अर्ज सादर करावेत.

या स्कॉलरशिप अंतर्गत बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व इंजीनियरिंग एमबीबीएस,बीडीएस, एलएलबी, बी.फार्मसी, बीएससी, नर्सिंग, बीएएमएस, बीएस रिसर्च, आयएसआर, आयआयएससी किंवा इतर कोणत्याही प्रोफेशनल कोर्सेस साठी कोटक महिंद्रा हे शिष्यवृत्ती देते.

ज्या विद्यार्थ्याने कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे अश्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिष्यवृत्ती दिल्या जाते, कोटक महिंद्रा ग्रुप 1985 पासून कार्य करते, कोटक महिंद्रा ग्रुप आर्थिक देवाण-घेवाणीचे कार्य संपूर्ण भारतभर करते.

2003 मध्ये कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली व या कंपनीला रिझर्व बँकेकडून लायसन्स देण्यात आले नंतर ही नॉन बँकिंग फायनान्स कंपनी भारतामध्ये सर्वात अगोदर रिझर्व बँकेने राष्ट्रीयकृत बँकेचा दर्जा दिला व त्यानंतर या बँकेचे नाव कोटक महिंद्रा बँक लिमिटेड असे पडले.

कोटक महिंद्रा बँक संपूर्ण जगभरात म्हणजे युके, युएसए, गल्फ, सिंगापूर, मॉरिसरस येथे ऑफिसेस असून त्या ठिकाणी सुद्धा कार्य करते तसेच लंडन, न्यूयॉर्क, दुबई, सिंगापूर येथे सुद्धा ही बँक कार्य करते.

31 मार्च 2024 रोजी कोटक महिंद्रा बँकेने 1948 शाखा स्थापन केल्या तर 3291 एटीएम सह हे बँक संपूर्ण जगभरात कार्यरत आहे.कोटक महिंद्रा बँकेअंतर्गत हि शिष्यवृत्ती मुलींना दिले जाते.

आवश्यक पात्रता

ही शिष्यवृत्ती घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी खाली दिलेले पात्रता पूर्ण केलेल्या असणे गरजेचे आहे. आवश्यक पात्रता खालील नमूद केलेली आहे.

  1. भारतभरातील कोणत्याही विद्यार्थिनींसाठी हि शिष्यवृत्ती लागू राहील.
  2. अर्जदाराने मागच्या वर्षी कमीत कमी 75 टक्के मिळवलेल्या असणे गरजेचे आहे किंवा त्याच्या समांतर सीजीपीए एवढा स्कोर बोर्डातील परीक्षेत मिळवणे आवश्यक असेल.
  3. कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न सहा लाखापेक्षा जास्त नसावे.
  4. ज्या पदवी किंवा पदविकेसाठी विद्यार्थी अर्ज करत असतील त्याकरिता त्यांचे कॉलेज NACC किंवा यांना NIRF असावे त्या कॉलेजची पूर्ण यादी या लिंक वर दिलेली आहे.
  5. कोटक महिंद्रा ग्रुप किंवा बडी फॉर स्टडी मधील जे कर्मचारी आहेत त्यांच्या पाल्यासाठी कोटक कन्या स्कॉलरशिप लागू नाही.

शिष्यवृत्तीचे फायदे

  1. या शिष्यवृत्ती अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थिनींना दरवर्षी दीड लाख रुपये दिले जातात, जोपर्यंत हा कोर्स पूर्ण होत नाही तोपर्यंत दरवर्षाला १.५ लाख एवढे आर्थिक सहाय्य दिले जाते.
  2. ही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च, ट्युशन फीस, हॉस्टेल फीज, इंटरनेट, ट्रान्सपोर्टेशन, लॅपटॉप, बुक किंवा स्टेशनरी खरेदी करण्यासाठी दिली जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे (Kotak Kanya Scholarship)

  • या शिष्यवृत्ती मध्ये अर्ज करायचा असल्यास मागच्या वर्षाचे मार्कशीट
  • पालकांचा उत्पन्नाचा पुरावा (2023-24 चा आयटी रिटर्न चा पुरावा)
  • कॉलेजची फी स्ट्रक्चर
  • विद्यार्थ्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा कॉलेजमधून पत्र घ्यावे
  • कॉलेज सीट लोकेशन डॉक्युमेंट सोबत जोडावे
  • कॉलेज एंट्रन्स एक्झामिनेशन चा स्कोर कार्ड
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो व घराचा फोटो
  • अपंगत्व असल्यास अपंगत्वाचा पुरावा
  • आई-वडील नसल्यास मृत्यूचे प्रमाणपत्र सोबत जोडावे

अर्ज कसा करावा

  1. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून https://www.buddy4study.com/page/kotak-kanya-scholarship या लिंक वर गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्या ठिकाणी अप्लाय नाऊ हे बटन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  2. तुमचा रजिस्ट्रेशन आयडी टाकल्यानंतर तुम्ही ऑनलाईन एप्लीकेशन फॉर्म पेजवर जाल जर तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर सर्वप्रथम ई-मेल, मोबाईल किंवा जीमेल अकाउंट ने नोंदणी करून घ्यावी.
  3. त्यानंतर तुम्ही कोटक कन्या स्कॉलरशिप 2024-25 च्या एप्लीकेशन फॉर्म पेजवर जाल तिथे गेल्यानंतर स्टार्ट अप्लिकेशन या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
  4. ऑनलाइन स्कॉलरशिप एप्लीकेशन चा फॉर्म मध्ये दिलेली सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरायची आहे
  5. आवश्यक असलेले सगळे कागदपत्र त्यामध्ये अपलोड करायचे आहेत
  6. त्यानंतर अटी व शर्ती वाचून प्रीविव् या बटनाला क्लिक करायचं आहे प्रीविव् मध्ये सर्व माहिती बरोबर भरलेली आहे की नाही चेक करायचा आहे आणि सर्व माहिती बरोबर भरलेली असल्यास सबमिट या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.कोटक कन्या स्कॉलरशिप 2024 25 ची निवड प्रक्रिया कशी असेल?

Ans : कोटक कन्या 2024-25 च्या स्कॉलरशिप मध्ये अर्ज करणाऱ्या अर्जदाराची मेरिट नुसार निवड केली जाईल सर्वप्रथम शॉर्टलिस्टिंग केल्या जाईल त्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बॅकग्राऊंड चेक केले जाईल.

आर्थिक बॅकग्राऊंड चेक केल्यानंतर विद्यार्थिनीची मुलाखत घेतल्या जाईल व या मुलाखतीच्या आधारावर अंतिम यादी जाहीर करण्यात येईल.

2.ही शिष्यवृत्ती दरवर्षी मिळते का?

Ans : हो, ही शिष्यवृत्ती दरवर्षी दीड लाख पर्यंत विद्यार्थिनींना मिळते संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ही शिष्यवृत्ती कोटक कन्या स्कॉलरशिप अंतर्गत दिली जाते.

या शिष्यवृत्ती मध्ये लाभ घेणाऱ्या विद्यार्थिनींनीचे कोणतेही वर्ष ड्रॉप आउट नसावे किंवा या विद्यार्थ्यांचा कोणत्या डीसीपिलिनरी प्रॉब्लेम शाळेमध्ये नसावा.ही शिष्यवृत्ती रिन्यू करण्याचे करण्याचे सर्वाधिकार कोटक महिंद्रा ग्रुप वर राखून ठेवलेला आहे.

3.मी या शिष्यवृत्तीसाठी निवडल्यानंतर मलाही रक्कम कशा प्रकारे मिळते?

Ans : या शिष्यवृत्ती मध्ये तुमची निवड झालेली असल्यास तुम्ही अर्जामध्ये नमूद केलेल्या बँकेमध्ये ही रक्कम तुम्हाला दिली जाते हे रक्कम तुमचं संपूर्ण फी स्ट्रक्चर, तुमच्या सेमिस्टर च्या मार्कशीट व एक्झाम यांच्या आधारावर असेल.

4.मी जर एंट्रन्स एक्झाम साठी एका वर्षाचा ब्रेक घेतल्यास मला स्कॉलरशिप मिळेल का?

Ans : हो, बारावी नंतर तुम्ही एक वर्ष गॅप घेऊन परत परीक्षा देत असाल तरी शिष्यवृत्ती तुम्हाला दिली जाईल.

Leave a Comment